At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Sunday, December 31, 2017
Friday, December 29, 2017
Editors view published in Online Lokmat on 28 Dec, 2017
‘समृद्धी’चा पिळ सैल!
किरण अग्रवाल
नाशिक दौºयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘समृद्धी’ बाधीत शेतकºयांनी काळे झेंडे दाखविले असले तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र या मार्गाला नाशिकसाठी समर्पित जोड रस्ता (डेडिकेटर कनेक्टर) देण्याचा विचार करण्याचे आश्वासन दिल्याने यासंदर्भातील लोकभावनांना सकारात्मकता लाभण्याची अपेक्षा उंचावून गेली आहे.
नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी दृतगती महामार्ग साकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या प्रकल्पाकडे खुद्द मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून पाहिले जाते. त्यामुळे या मार्गासंदर्भात येणाºया भूसंपादनापासून ते अन्य कोणत्याही अडचणींवर व्यवहारिक तडजोडीचा मार्ग काढण्याची भूमिका शासनातर्फे घेतली गेली आहे. अगदी जमिनीचा मोबदला देताना तो तब्बल पाचपट देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रारंभात या मार्गासाठी जमिनी देण्याकरिता ठिकठिकाणी झालेला विरोध आता बºयाचअंशी मावळल्याचे दिसत आहे. ‘समृद्धी’ बाधीत शेतकºयांची यासाठी स्वेच्छा संमती घेतानाच अन्य घटकांमध्येही या मार्गाबाबत सकारात्मक मनोभूमिका निर्माण करण्याचे यंत्रणांचे प्रयत्न असून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशकातल्या आपल्या दौºयात या मार्गाला नाशिकशी जोडण्यासाठी ‘डेडिकेटर कनेक्टर’ देण्याची जी तयारी दाखविली त्याकडेही याच संदर्भाने बघता येणारे आहे. कारण शेतकºयांच्या विरोधाचा सामना करतानाच अन्य वर्गाला या महामार्गामुळे होणारे फायदे लक्षात आणून देऊन त्यांची यासाठीची सकारात्मकता निर्माण करणे अनेक अर्थाने गरजेचे झाले आहे. नाशकातील ‘क्रेडाई’ आयोजित शेल्टर २०१७ प्रदर्शनाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्र्यांनी तिच संधी घेतली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यातून समृद्धी महामार्ग जाणार असून, ४६ गावांमधील काही शेतकºयांची जमीन यात जाणार आहे. त्यामुळे जेव्हा या प्रकल्पाची घोषणा झाली त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध समोर आला होता. प्रकल्प बाधितांनी शेतांमध्ये सरण रचून व झाडांना गळफास लटकवून आपल्या शेतजमिनींची मोजणीच न होऊ देण्याची भूमिका घेतली होती. काही शेतकºयांनी या संदर्भात उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. दरम्यान, भूसंपादनाबाबत व्यवहारिक निर्णय घेताना शासनाने पाचपट मोबदला देण्याची भूमिका घेतल्यानंतर समृद्धी बाधितांचा विरोध काहीसा कमी झाला. ज्या गावात गळफास टांगले गेले होते तेथीललच काही शेतकºयांनी स्वखुशीने आपली शेतजमीन या मार्गासाठी शासनाकडे सोपविली. त्यापोटीचा मोबदला शासनातर्फे तत्काळ संबंधितांच्या खात्यावर जमाही करण्यात आला. यासाठी राज्यातील सुमारे पन्नास टक्के जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून फेब्रुवारी २०१८ पर्यंत या मार्गाच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हा महामार्ग महाराष्ट्राला देशाच्या नकाशावर २० वर्षे पुढे घेऊन जाणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय या प्रकल्पाची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली होती ते राधेश्याम मोपलवार यांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे त्यांच्याचकडे पूर्ववत ‘समृद्धी’चे काम सोपविले जाण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांची स्वप्नपूर्ती करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जाणे अपेक्षित आहे.
एकूणच, शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांनी वाहतूक सुलभतेचा लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून समृद्धी महामार्गाला नाशिकशी जोडण्यासाठी समर्पित जोडरस्ता करण्याची जी अपेक्षा व्यक्त केली त्याबाबत अनुकुलता दर्शवून मुख्यमंत्र्यांनी समृद्धीचा पीळ सैल करण्याचाच प्रयत्न केल्याचे म्हणावे लागेल. यासाठी जमिनी जाणाºया शेतकºयांची नाराजी एकिकडे दिसून येत असताना दुसरीकडे अन्य घटकाला या प्रकल्पाशी जोडून घेण्याचेच प्रयत्न यातून दिसून येणारे आहेत.

Saturday, December 23, 2017
Thursday, December 21, 2017
Editors view published in Online Lokmat on 21 Dec, 2017
उधळलेल्या वारूला वेसण!
किरण अग्रवाल
गुजरातेत भाजपाने सत्ता राखली असली तरी, काँग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प घेऊन निघालेल्या व एकापाठोपाठ एक विविध राज्यांत दिग्विजयाची नोंद करणा-या नरेंद्र मोदी व अमित शहा या नेतृत्वाच्या जोडगोळीला त्यांच्याच घरच्या अंगणात वेसण घालण्याचे काम तेथील मतदारांनी केल्याने यापुढच्या राष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ बदलण्याची अपेक्षा करता येणारी आहे.
२०१३च्या हिवाळ्यात राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढमध्ये सत्ता राखल्याच्या पाठोपाठ गोवा व हरियाणासोबतच उत्तर प्रदेशमध्येही ‘कमळ’ फुलविल्याने भाजपाचा आत्मविश्वास अधिकच दुणावला होता. आता गुजरात पुन्हा राखताना हिमाचलही ताब्यात आल्याने भाजपा व त्याच्या मित्रपक्षांकडे असलेल्या राज्यांची संख्या १९ झाली आहे, तर काँग्रेस केवळ ५ राज्यात उरली आहे. म्हणायला ही भाजपाच्या संकल्पानुसार काँग्रेसमुक्त भारताकडे होत असलेली वाटचाल म्हणता यावी; परंतु ती होत असताना या मोहिमेवर निघालेल्या मोदी-शहांच्या गृह राज्यातच त्यांची जी दमछाक झाली, त्यातून मिळून जाणारे संकेत भविष्यातील राजकारणावर परिणामकारक ठरू शकणारेच म्हणता यावेत. गुजरातमध्ये सर्वार्थाने ‘तगड्या’ असलेल्या भाजपाच्या प्रचार यंत्रणेपुढे काँग्रेसची अवस्था तशी विकलांगच होती. तीन-चार दशकांचा राजकीय राबता असलेली व देशाचे नेतृत्व करणारी मोदी-शहा यांची जोडी, त्यांच्या सोबतीला संपूर्ण केंद्रीय व राज्यातील मंत्रिमंडळ; तेही कमी म्हणून की काय भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी मातब्बरांची फौज व त्यापुढे कुचेष्ठेने पप्पू प्रतिमा रंगविले गेलेले काँग्रेसचेे युवा नेते राहुल गांधी, त्यांना लाभलेली हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर व जिग्नेश मेवानीसारख्या तरुणांची साथ एवढेच काय ते विरोधकांचे बळ होते. त्याला काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत व प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांच्या सूक्ष्म नियोजनाची साथ होतीच; पण २२ वर्षांच्या भाजपाच्या सत्तेमुळे ग्रामपातळीपर्यंतची काँग्रेस तशी मरणासन्नच होती. परंतु तरी तिने उभारी घेत यश मिळविले. प्रचाराच्या पातळीवरच काँग्रेसला जे समर्थन लाभताना दिसले त्यामुळेच पंतप्रधानांना गुजरातेत तळ ठोकावा लागला व तब्बल सुमारे तीन डझन सभा घेण्याची वेळ आली. कोणत्याही पंतप्रधानाने एखाद्या राज्याच्या निवडणुकीत एवढ्या सभा व वेळ देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तरी भाजपाला अपेक्षित १५०चा आकडा गाठता आला नाही. उलट ११५वरून ते ९९वर घसरले, तर काँग्रेस ६१वरून ७७वर पोहोचली. हे ‘अॅण्टी इन्कम्बन्सी’तून घडून आलेले आहे असे जरी म्हटले, तरी त्यात एक इशारा दडला आहे. भाजपा व तिच्या नेत्यांनी तो गांभीर्याने घेण्यासारखा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या इशा-याचेही सूतोवाच तसे प्रचारकाळात होऊन गेलेच होते. देशभरातील मोदींच्या सभा या औत्सुक्याचे विषय ठरत असताना गुजरातमधील त्यांच्या काही सभांतील समर्थक ओसरलेले पहावयास मिळाले. अधिक काळच्या सत्तेतून ओढवलेली तेथील राजकीय दहशत चर्चेत असतानाही मेहसाना, राजकोट, नवसारी व सुरत परिसरातील सुमारे चार हजार गावांत भाजपा नेत्यांना प्रचारास संचारबंदीच्या पाट्या झळकलेल्या दिसून आल्या, ते कशाचे लक्षण होते? विकासाच्या गुजरात मॉडेलचा देशभर डंका पिटला गेला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्याच आधारे केंद्रातील सत्ता काबीज केली गेली; पण या निवडणुकीतून विकासच हरवल्याचे दिसून आले. विकासाऐवजी औरंगजेब, खिलजींची नावे घेऊन प्रचार केला गेला. राहुल गांधी यांनी सोमनाथ ममंदिर भेटीप्रसंगी कोणत्या रजिस्टरमध्ये सही केली, यासारखे मुद्दे उपस्थित करून व पाकिस्तानलाही प्रचारात ओढून पुन्हा धार्मिक ध्रुवीकरणाचे फंडे वापरले गेले. इतकेच नव्हे तर दभोई या मतदारसंघातील भाजपा उमेदवाराने ‘दाढी-टोपींच्या व्यक्तींची संख्या कमी करावी लागेल’ अशी वक्तव्ये केल्याने त्याला नोटीस बजावण्याची वेळ निवडणूक आयोगावर आली. हे सर्व का करावे लागले, याचे उत्तर जेव्हा शोधायला घेतले जाते तेव्हा काँग्रेसला लाभणाºया समर्थनाने भाजपात व्यक्त झालेली चिंताच त्यामागे राहिल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या चिंतेतूनच हार्दिक पटेलचे काही आपत्तीजनक व्हिडीओ प्रसारित करण्याच्या घाणेरड्या खेळीपासून तर काँग्रेसचे सौराष्ट्रातील प्रभारी, खासदार राजीव सातव यांना बेदम मारहाण करेपर्यंतच्या घटना घडून आलेल्या दिसल्या. ही भाजपाचा धीर सुटल्याचीच लक्षणे होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व २६ जागा खिशात घालणारा व देशात एकूण २७६ खासदार असलेला पक्ष व त्याचे नेते अवघ्या ४६ खासदारांचा पक्ष असलेल्या काँग्रेस व राहुल गांधींमुळे एवढा चिंताक्रांत व्हावा? हेच पुरेसे बोलके होते.
गुजरातेत भाजपाने कशीबशी सत्ता राखली ती नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेच्या बळावर हे निर्विवाद सत्य आहे. परंतु खुद्द मोदींच्या जन्मगावाचा समावेश असलेल्या उंझा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. २०१४ मध्ये पंतप्रधान होईपर्यंत मोदी ज्या मणीनगरमधून तीनवेळा विधानसभेत गेले होते, त्या मतदारसंघातील भाजपा उमेदवार धापा टाकत म्हणजे अवघ्या ७५ मतांच्या फरकाने विजयी झाला. शिवाय, गुजरात मंत्रिमंडळातील चार मंत्री पराभूत झाले. कधी नव्हे ते राज्यातील सुमारे सव्वापाच लाख मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नसल्याचा ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला तसेच भाजपा व काँग्रेसमधील मतांच्या टक्केवारीचे अंतर घटून ९ वरून ७ टक्क्यांवर आले. या सा-या बाबी भाजपाला सत्ता मिळूनही आनंद लाभू न देणा-याच आहेत. नव्हे, भाजपाच्या दिग्विजयाचा जो वारू देशभर उघळू पाहात आहे, त्याला त्या वेसण घालणा-याही आहेत. त्यामुळे पुढीलवर्षी आठ राज्यांमध्ये होणा-या निवडणुकांत काँग्रेस अशीच आत्मविश्वासाने सामोरी गेली व सोशल इंजिनिअरिंग घडवून आणण्याच्या दृष्टीने आतापासून कामाला लागली तर गुजरातच्या निकालाची परिणामकारकता तेथेही अनुभवयास मिळू शकेल. तेव्हा, सारांशात मांडायचे तर‘देश बदल रहा है’ असे म्हणणाºयांना अगोदर घराकडे लक्ष द्या; तुमचा ‘गुजरात बदल रहा है....’ असा इशारा देणारीच ही निवडणूक ठरली आहे.

Tuesday, December 19, 2017
Monday, December 18, 2017
Thursday, December 14, 2017
Editors View published in Online Lokmat on 14 Dec, 2017
राणे यांच्या वाटेत काटेच !
किरण अग्रवाल
राजकारणात ‘आक्रमकता’ ही बाब एखाद्या दागिन्यासारखी मिरवली जात असली तरी, त्यातून ओढवणारी नाराजी कधी कधी पुढील प्रवासाची वाट कशी अवरुद्ध करणारी ठरते हे नारायण राणे यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने अन्य कुणाला सांगता येऊ नये. राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या या ‘फायर ब्रॅण्ड’ नेत्याला विधिमंडळातील पुनर्प्रवेशासाठी ताटकळण्याची वेळ आली आहे, आणि त्यासंदर्भात जी काही संधी अगर शक्यता वर्तविली जात आहे, त्या मार्गातही निर्धोकता दिसत नाही ती त्यामुळेच.
काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांना आपल्या पक्षातर्फे विधिमंडळात घ्यावयास भाजपाही उत्सुक असली तरी, शिवसेनेच्या विरोधामुळे अद्याप ते शक्य झालेले नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सहयोगी पक्षाच्या आक्षेपामुळेच राणेंऐवजी भाजपातर्फे प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली गेली. पण असे असले तरी, संधी संपलेली नाही. राणे यांना स्वस्थता मानवणारी नाही आणि भाजपाला कोकणात ‘कमळ’ फुलवायचे आहे, असा हा उभयपक्षी मान्यतेचा मामला असल्याने राणे यांचे विधिमंडळात येणे नक्कीच आहे. त्यांची ‘एन्ट्री’ तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे स्थानही नक्की आहे, पण प्रश्न केवळ विधिमंडळातील प्रवेशाचा आहे. त्यादृष्टीनेच ज्या शक्यता चाचपून पाहिल्या जात आहेत त्यातील एक म्हणजे, आता आणखी सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणणे. राणे थेट भाजपात दाखल नसले तरी, त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीस पाठिंबा दिलाा आहे. त्यामुळे राणे यांना पुरस्कृृत करून ध्येयसिद्धी साधता येणारी आहे. त्यासाठी नाशिक मतदारसंघाचे नाव घेतले जात असल्याने नाशिकचे राजकीय वातावरण ढवळून निघणे स्वाभाविक म्हटले पाहिजे.
नाशिकमध्ये तशीही बाहुबली नेत्यांना स्वीकारार्हता लाभण्याची परंपरा आहे. अलीकडच्या काळात छगन भुजबळ यांना ती लाभलेली होती, त्याचप्रमाणे ‘मनसे’ नेते राज ठाकरे यांनाही ती लाभली. दोघांत फरक इतकाच की, भुजबळ स्वत: थेट रणांगणात होते तर राज यांच्या भरवशावर नाशिककरांनी गेल्यावेळी महापालिकेतील सत्ता त्यांच्या शागीर्दांकडे सोपविली होती. गेल्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केल्याने नाशिककरांनी भाजपाला महापालिकेत सत्ता दिली. इतिहासात डोकवायचे तर, हिमालयाच्या मदतीकरिता सह्याद्रीला धावून जाण्याची वेळ आली होती तेव्हा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध दिल्लीत निवडून पाठविले होते. तेव्हा, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात राजकीय मातब्बरांना हात देण्याचीच नाशिककरांची मानसिकता राहिल्याचे यातून स्पष्ट होणारे आहे. या यादीत आता नारायण राणे यांची भर पडणार असेल तर नाशिकच्या राजकीय परिघावर त्याचे तरंग उमटणारच!
विशेषत: यापूर्वीच्या राजकीय मातब्बरांना जितक्या सहज व सहर्षपणे स्वीकारले गेले, तशी स्थिती राणे यांच्या बाबतीत मात्र होण्याची शक्यता नसल्याने यासंबंधीचा गलबला वाढून गेला आहे. नाशिकमध्ये स्थानिक तीन व जिल्ह्यातील एक असे चार आमदार आणि धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेला काही परिसर पाहता दिंडोरीसह दोन खासदार भाजपाकडे असले तरी, यापैकी एकाचीही राज्यस्तरीय मातब्बरी नाही. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारीसाठी जी नावे पक्षात घेतली जात आहेत, त्यात निवडून येण्याबद्दल खात्री बाळगावी असे कोणतेही नाव नाही. त्यामुळे नाशकातून राणे यांना पुरस्कृत करण्यात भाजपामध्ये तशी काही अडचण वा विरोध होण्याची शक्यता नाही. स्थानिक पातळीवर शिवसेना ही भाजपाला नेहमी डिवचतांना दिसते. तसेच, भुजबळ कारागृहातून बाहेर आल्यावर त्यांचा प्रभाव पुन्हा निर्माण करू शकतील, या पार्श्वभूमीवर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी व भुजबळांचे वर्चस्व रोखण्यासाठी ‘राणे अस्त्र’ भाजपाला कामी येऊ शकणारे आहे. पण या अस्त्राचा हा संभाव्य उपयोगच विरोधकांच्या एकीचे कारण ठरू पाहत असल्याने राणेंच्या मार्गात आतापासूनच काटे पेरले जाण्याची शक्यता बळावून गेली आहे.
राणे यांचे शिवसेनेशी असलेले राजकीय वितुष्ट सर्वज्ञात आहे, तसे शिवसेनेचे राष्ट्रवादीशी जमू शकणारे सख्यही सर्वांच्या लक्षात आले आहेच. त्यामुळे राणेंना रोखण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. नव्हे, त्यांचे सद्यस्थितीतले वर्चस्व राखण्यासाठी ते गरजेचेही असल्याने आताच स्थानिक पक्ष नेत्यांकडून तशी शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. काँग्रेसला राणेंनी सोडचिठ्ठी दिलेली असल्याने तो पक्षही राणे विरोधकांच्या आघाडीत सामील होण्यास उत्सुक असेल. नाही तरी स्थानिक स्वराज्य संस्थांतले संख्याबळ पाहता शिवसेना क्रमांक एकवर व भाजपा क्रमांक दोनवर असून, राष्ट्रवादी तिसºया व काँग्रेस चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे काँग्रेसला स्वत:चा कसला लाभ शक्य नसल्याने ते राणे विरोधात ठाम राहण्याचेच आडाखे आहेत. अर्थात, अपक्षांचे संख्याबळ तब्बल ३१ इतके असल्याने ते निर्णायक भूमिकेत असतील व राणे यांच्यादृष्टीने तो अवघड विषय नसेल हे खरे, परंतु भाजपेतर पक्षांची मोट बांधली जाण्याची जी शक्यता यानिमित्ताने लागलीच पुढे आली आहे, ती पाहता राणे यांच्या विधिमंडळातील पुनर्प्रवेशासाठी नाशकातून जाणारा संभाव्य मार्गही खात्रीशीर म्हणता येऊ नये, अशीच एकूण स्थिती आहे.

Tuesday, December 12, 2017
Saturday, December 9, 2017
Friday, December 8, 2017
Editor's View published in Online Lokmat on 07 Dec, 2017
कळतं; पण वळत का नाही?
किरण अग्रवाल
‘लग्न म्हणजे लईभारी लाडू; पण भलतं जोखमीचं लचांड, तेव्हा सांभाळून रे बाबाऽऽ...’, असे अनेक अनुभवसंपन्न रथी-महारथी सांगत असतानाही कुणी ऐकतं का त्यांचं? नाही ना? मग तस्सच स्मार्ट फोनचं आहे. त्याच्या अतिवापराने मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, वगैरे काहीही संशोधन पुढे येऊ द्या; पण ते वापरल्याखेरीज हल्लीच्या युगात राहणण्यास आपण पात्र नसल्याचीच प्रत्येकाची भावना झाली आहे जणू. त्यामुळे धोका स्वीकारून प्रत्येकजण त्यासंबंधीच्या अतिरेकाकडे दुर्लक्ष करतो. कळतं; पण वळत का नाही, असा प्रश्न सुजाण मनाला पडतो तो त्यामुळेच !
मोबाइल क्रांतीने जग माणसाच्या मुठीत आणले आहे हे खरेच; पण या तंत्राच्या अतिरेकी वापराने आपण स्वत:हून मृत्यूला कसे आमंत्रण देत आहोत, याबद्दल डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक अहवाल नुकताच समोर येऊन गेला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल विविध याचिकांच्या संदर्भाने केंद्रीय दूरसंचार विभागाने स्थापन केलेल्या एका समितीने हा अहवाल सादर केला असून, त्यानुसार स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता तब्बल ४०० टक्क्यांनी वाढली आहे. अर्ध्या तासाहून अधिककाळ स्मार्ट फोनचा वापर करणे धोक्याचे असून, या फोनमधून होणारा किरणोत्सर्ग शरीरावर विपरीत परिणाम करीत असल्याचे व त्यातून निद्रानाश, पार्किन्सन व अल्झायमरसारख्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचेही निरीक्षण या अहवालात नोंदविले गेले आहे. सदान्कदा मोबाइल फोनला चिपकून असलेल्या तरुणपिढीच्या आरोग्याबद्दलची चिंता वाढविणाराच हा अहवाल असला तरी तो गांभीर्याने घेतला जाणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण, धोक्याचा इशारा देणारा हा असा एकमेव अहवाल नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनीही संशोधनाअंती एक अहवाल अलीकडेच सादर केला असून, त्यानुसार स्मार्ट फोनवर जेवढा वेळ घालविला जातो, तेवढी त्या व्यक्तीमधील नैराश्यग्रस्तता वाढून आत्महत्येचा धोका वाढतो. दररोज पाच किंवा त्यापेक्षा अधिक तास इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर घालविणा-या मुलांपैकी ४८ टक्के मुलांमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती आढळून आल्याची बाबही या शास्त्रज्ञांनी नोंदविली आहे. मुलांच्या भवितव्याबद्दलच्या चिंतेत भर घालणा-या या बाबी आहेत. कारण, एकीकडे ही अशी वास्तविकता समोर येत असली तरी, नवीन पिढी यातून काही बोध घेण्याचा प्रयत्नसुद्धा करताना दिसत नाही. चिंतेत भर पडते आहे ती त्यामुळे.
महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वीही याबाबत अनेकांकडून बरीच चर्चा करून झाली आहे, सांगून झाले आहे; पण ऐकतो कोण? उलट दिवसेंदिवस नवनवीन तंत्र विकसित होत असून, तरुणपिढी आहे त्यापेक्षा अधिक ‘स्मार्ट’ बनण्यासाठी धावताना दिसत आहे. 4G (फोर जी) सेवेचे तंत्रज्ञान अजून सर्वदूर पोहोचायच्या आतच त्यापुढील 5Gचे वेध या पिढीला लागले आहेत. सर्वापेक्षा पुढे, सबसे तेज... धावण्याचा अट्टाहास यामागे आहे. काळानुरूप तो आवश्यकही आहे, अन्यथा तुम्ही स्पर्धेत मागे पडाल किंवा बाहेर फेकले जाल. पण, म्हणून जिवाची पर्वा न करता धावायचे? शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो, हा साधासोपा समाजनियम आहे. खाण्या-पिण्यातला असो की वापरातला; अतिघाई संकटात नेई म्हणतात त्याप्रमाणे, अतिरेकी, अनिर्बंध, अवाजवी व अविवेकी व्यवहार-वर्तन जिवाशी गाठ आणल्याखेरीज राहात नाही; पण लक्षात घेतो कोण?
तरुण पिढी तर मोबााइल वेडात अक्षरश: वेडावली आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये, इतके हे ‘फॅड’ आवश्यकतेच्या सबबीखाली फोफावले आहे. मोबाइल वापराला विरोध, असा हा विषय नाही. त्याच्या अतिरेकी वापरावर बंधने हवीत, अशा दृष्टीने याकडे बघायला हवे. हा अतिरेकी अगर अनावश्यक वापर कसा, तर स्वत:च्या हाताने स्वत:ची चड्डी नेसता न येणाºया बालकांच्या हाती स्मार्ट फोन देऊन ‘आमचा बबड्या बघा किती हुश्शारऽ...’ अशा फुशारक्या मारणारी तरुण जोडपी हल्ली समाजात मोठ्या प्रमाणात दिसतात. अशा बालकांच्या आजी-आजोबांनाही आपल्या नातवंडांचे असे काही कौतुक असते की विचारू नका! कारण, राजा-राणीच्या, परीच्या नीती वा बोधकथा सांगण्याऐवजी पोरांच्या हाती मोबाइलचे खेळणे सोपविले की, आजी-आजोबा आपले मोकळे होतात शेजारच्याला किती पेन्शन बसली याच्या गप्पा मारायला! रात्री उशिरापर्यंत पुस्तकात डोके घालून बसणारे कारटे पाहिले की पालकांचा ऊर कसा अभिमानाने भरून येतो. हल्ली पोरांच्या जिवापेक्षा अभ्यासच अधिक भारी बुवाऽ... असे छान तोंड वेंगाळून ते समाजात बोलतानाही दिसतात. पण ते कारटं पुस्तकात मोबाइल ठेवून व कानात ‘इअर फोन’ घालून गाणं ऐकत किंवा भलतच काही पाहात बसलेलं असतं हे अनेक पालकांच्या लक्षातही येत नाही. याचसंदर्भात एक विनोद नेहमी सांगितला जातो. लग्नाच्या मांडवात खाली मान घालून बसलेल्या नव-या मुलीकडे पाहात एक आजीबाई मोठ्या कौतुकाने आपल्या समवयस्काला सांगतात, ‘मुलगी किती सुशील, संस्कारी व लाजाळू आहे बघा, की मान वर करीत नाही.’ तेव्हा नवरीची करवली सांगते, ‘आजीबाई, ती मोबाइलवर तिच्या मित्रांशी चॅटिंग करतेय’. आता बोला !!
थोडक्यात, अशी अनेक उदाहरणे देता येणारी आहेत. ती तशीच घडतात असेही नाही. केवळ स्मार्ट फोनचे वाढते अतिरेकी वेड लक्षात यावे म्हणून ती उल्लेखिली आहेत. मुद्दा एवढाच की, मोबाइलवरून काढल्या जाणा-या ‘सेल्फी’ व त्या सेल्फीमुळे अपघात होऊन गमावणारे जीव, हा जसा संशोधनाचा व चिंतेचा विषय बनला आहे, त्याचप्रमाणे स्मार्ट फोनचा अनावश्यक व अतिरेकी वापर हा कसा मेंदूच्या कर्करोगाला, नैराश्याला व आत्महत्यांना निमंत्रण देणारा ठरू शकतो याचे संशोधन पुढे आल्याने त्याबाबत सक्तीने का होईना, पाऊले उचलली जाणे गरजेचे ठरावे. कळते; पण वळत नाही हा यातील मुद्दा असल्याने ही सक्तीची अपेक्षा गैरवाजवी ठरू नये. अन्यथा, प्रारंभी केलेला लग्नाच्या लाडूचा उल्लेख हा तसा गमतीचा भाग असला तरी, घरातील कारभारणीच्या हाती असलेल्या स्मार्ट फोनच्या वापरावर वेळेच्या मर्यादा घालणे कुणाला शक्य आहे?

Tuesday, December 5, 2017
Friday, December 1, 2017
Editors view published in Online Lokmat on 30 Nov, 2017
कधी होणार ‘आम्ही लाभार्थी’?
किरण अग्रवाल
लाभाच्या संकल्पना या व्यक्तिगणिक बदलणाºया असतात, त्यामुळे कोण व्यक्ती कशाच्या बाबतीत स्वत:ला लाभार्थी म्हणवून घेते आणि कोण त्यापासून वंचितच राहिल्याचे सांगते, यात मेळ साधणे तसे खूप अवघड आहे. यातही सरकारी योजनांच्या लाभाबाबत चर्चा करायची तर ते अधिकच कसोटीचे ठरावे कारण, सा-याच लोकेच्छा या कधीही पूर्ण होणाºया नसतात. सरकारची ‘मी लाभार्थी’ ही प्रचार मोहीम त्यामुळेच टीकेस पात्र ठरली आहे. समाजजीवनातील प्रचलित मानसिकतेच्या अंगानेच यात ‘मी’ आला आहे. सत्तेचा लाभ असा एकेका व्यक्तीत शोधायचा नसतो, तर व्यापक प्रमाणावर त्याचा प्रभाव तपासायचा असतो. त्यादृष्टीने ‘मी’ऐवजी ‘आम्ही’ची जरी शब्दयोजना झाली असती तर एवढ्या टीकेस सामोरे जाण्याची वेळ आली नसती. पण तसे होऊ शकले नाही. कारण, निर्णयकर्त्यांभोवती ‘होयबा’चेच कोंडाळे आहे.
सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी केल्या गेलेल्या ‘मी लाभार्थी’ या प्रचार मोहिमेने अनुकूल परिणाम साधण्याऐवजी वाद-विवादच अधिक ओढवून घेतले आहेत. बरे, विरोधी आघाडीवरून हे वाद घातले गेले किंवा आक्षेप नोंदविले गेले असे नाही तर सत्तेत सहभागी असणारी शिवसेनाही त्यात मागे राहिलेली नाही. राज्यातील सत्तेचे गेल्या तीन वर्षात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेचे लाभार्थी राहिल्याची थेट टीका शिवसेना पक्षाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अर्थात, असे जर असेल व दोघांखेरीज तिसरा लाभार्थी नसेल तर त्यांच्या पक्षाने सत्तेत तरी का टिकून राहावे, असा सनातन प्रश्न उपस्थित होतो; पण त्याच्याही उत्तराची उजळणी येथे करण्याची गरज नसावी इतके ते साधे आणि पुन्हा लाभाशीच संबंधित आहे. जर ते उत्तर लाभाशी संबंधित नसेल, तर पक्ष फुटण्याच्या भीतीशी तरी निगडित असेलच. केवळ गर्जना सुरू आहेत, स्वत:हून सोडवत वा मोडवत नाही, असाच अर्थ त्यातूनच काढता येणारा आहे.
विरोधी पक्षांनी तर यानिमित्ताने विरोधाची चांगलीच संधी घेतल्याचे दिसून आले. विशेषत: ‘काँग्रेस व राष्ट्रवादीच्या योजनांचा भाजपाच लाभार्थी’ अशी प्रतिउत्तर देणारी मोहीम त्यांनी चालवून काँग्रेस काळात घेतलेल्या निर्णयांचा सध्याच्या सरकारने चालवलेला अवलंब लोकांसमोर मांडला. शासनाने विविध योजनांमधील लाभार्थी हेरून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना जनसामान्यांसमोर आणले तर राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने या लाभार्थींचेही स्टिंग आॅपरेशन करून खळबळ उडवून दिली. इतकेच नव्हे तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे या पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांसह राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे लोकांसमोर मांडून ‘मीच खरा लाभार्थी’ अशी टीकात्मक मोहीम समाजमाध्यमातून चालविली. महत्त्वाचे म्हणजे, अमित शहा यांंच्या कुटुंबीयाचे ५० हजारांचे एका वर्षात ८० कोटी झाल्याचे म्हणजे तब्बल १६ हजार पटीने वाढ झाल्याचा मुद्दाही चर्चेत आणला. त्यामुळे एकूणच ‘मी लाभार्थी’ची मोहीम ही शासनासाठी ‘आ बैल मुझे मार...’ सारखीच ठरून गेल्याचे म्हटले तर वावगे ठरू नये.
या सर्व प्रचार मोहिमेच्या व त्याला विरोधाच्या धबडग्यात वास्तविक लाभाचे मुद्दे खरेच दुर्लक्षित झाले. शाश्वत विकासाची द्वाही देत सत्ता राबवणाºया आणि अधिकाधिक चांगली कामे लोकांच्या पदरात टाकण्याच्या खुद्द मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यामुळे ठेच बसल्याचे नाकारता येऊ नये. अर्थात, पक्षाचे म्हणून लाभणारे पाठबळ यात कमी पडले हेच लक्षात येणारे आहे. राज्याच्या पक्षाध्यक्षाने पक्षप्रतिमा उंचावण्याऐवजी अशी काही विधाने करून ठेवली की, तिच्या खुलाशात संबंधिताना गुंतावे लागले. शिवाय प्रचार मोहिमेत व्यक्तिगत लाभार्थी पुढे आणण्याच्या नादात सार्वत्रिक पातळीवर परिणामकारक ठरणाºया अनेक प्रकल्पांची चर्चा केली गेली नाही. लोकांच्या दृष्टीने घरकुल योजनेत मिळणारे घर, हगणदारीमुक्तीसाठी स्वच्छतागृहाला निधी, शेतकºयांसाठी कृषी अवजारांचा पुरवठा, अपंगांसाठी विविध उपकरणे, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, गर्भवती महिलांना औषधांचा लाभ, अशी कामे सांगितली गेली. याखेरीज सामूहिक पातळीवरती उपयोगी सिद्ध होणारी जलयुक्त शिवाराची कामे, गावोगावची सभामंडपे, बस थांबे, वाडीजोड रस्ते, शेतचाळी, ग्रामपंचायत कार्यालय अशी कामे अपवादानेच दिसून आली. महागाईत भरडल्या जाणा-या सामान्य माणसाचा कोणता लाभ झाला, गॅस सिलिंडर कमी झाले का, सरकारी दप्तरातील त्याची अडवणूक व दप्तर दिरंगाई कमी झाली का, सररकारी रुग्णालयात जाणाºया रुग्णांना तेथील वैद्यकीय अधिकारी बेपत्ता असल्याचा जो अनुभव येतो तो दूर झाला का, पोस्टाच्या योजनेत सरकारकडेच ठेव ठेवण्यासाठी गेलेला ज्येष्ठ नागरिक खिडकीवर तिष्ठत असताना जेवणातील अळूच्या वड्या किती स्वादिष्ट होत्या याची दूरध्वनीवर चर्चा करणाºया मावशींची सवय बदलली की नाही आणि सर्वात महत्त्वाचे, समाजाचे खºया अर्थाने नेतृत्व करणा-या ज्ञानवंत व प्रज्ञावंत गटात भारतीय राज्य घटनेचा अविभाज्य गाभा असलेली सहिष्णुता खंगायला लागल्याची जी भावना घर करू पाहते आहे तिचे निराकरण कसे करणार? शिवाय टेबलाखालून काही दिल्या घेतल्याशिवाय कामे होतात का, असे अनेक प्रश्न यासंदर्भात सामान्यांना भंडावून सोडणारे आहेत. ‘मी’ नव्हे तर, ‘आम्ही’वर ख-या अर्थाने परिणाम करणारे हे प्रश्न आहेत. त्यामुळे शासनाच्या उर्वरित काळात याकडे लक्ष दिले जाण्याची अपेक्षा अवाजवी ठरू नये.

Monday, November 27, 2017
Saturday, November 25, 2017
Thursday, November 23, 2017
Editors view published in Online Lokmat on 23 Nov, 2017
मृत्यूचे उत्सवीकरण!
किरण अग्रवाल
मृत्यू जर अटळ आहे तर त्याचे भय काय बाळगायचे? हा तसा साधा प्रश्न. हिमालयात साधना करणाºया साधूपासून ते आपल्याकडील गल्लीबोळातील भगवे कपडेधाºयापर्यंत व ज्ञानीपासून ते अज्ञानीपर्यंत, सर्वांकडून उपदेशीला जाणारा. तरी मृत्यू नकोसा वाटतो, कारण अटळतेला स्वीकारायची कुणाची तयारी नाही. मृत्यूपाठोपाठ इतरेजनांवर ओढवणारा शोकही आपसूकच नकोसा ठरणारा. म्हणूनच, मृत्यूपश्चात शोकाऐवजी उत्सव साजरा करणारे जेव्हा दिसून येतात तेव्हा त्यांच्यातील निर्मोहित्त्वाला दाद देणे क्रमप्राप्त ठरून जाते.
मरण हे कुणाचेही असो, दु:खदच असते. तरी दीर्घायू राहिलेल्या व सुखा-समाधानाने गेलेल्या व्यक्तीसाठी तिच्या अंत्ययात्रेत भजनी मंडळाला पाचारण करण्याची प्रथा आहे. भजनाच्या घोषात दु:ख वा शोक हलका होण्याची भावना तर असतेच, शिवाय जाणाºयाला दिल्या जाणाºया निरोपाचे ते एकप्रकारचे उत्सवीकरणही असते. मृत्यूपश्चातच्या शोकात मोडकळून पडण्याऐवजी त्यातले सत्य स्वीकारण्याची शक्ती लाभावी म्हणून दशक्रिया विधीच्या दिनी प्रवचनही ठेवले जाते. दशक्रिया किंवा संबंधित विधीवरून सध्या सुरू असलेला वाद-विरोध हा भाग वेगळा; परंतु यानिमित्तच्या प्रवचनात थोरांचे, संतांचे यासंदर्भातले दाखले देत जीवनाचे क्षणभंगूरत्व मांडले जाते. जीव-जगत काय, हे सांगतानाच पंचत्वाचे निरूपण यात केले जाते. जे ज्या मातीतून निर्माण झाले आहे, ते त्या मातीतच मिळणार, असा भावगर्भ आशय त्यामागे असतो. त्याची एक वेगळी फिलॉसॉफी आहे. ती सहज संदर्भाने या माध्यमातून मांडली जाते. ती ‘फिलॉसॉफी’ कोणती, तर
‘‘मरताना ज्याच्या राम आला मुखे, धन्य त्याचा सुखा, पार नाही!’’
या संतवचनाचा अर्थ असा की, ज्याने आयुष्य सदाचरणात घालविले असेल तो सुखाने जाईल, त्याची इहलोकीची यात्रा सुफळ ठरेल. पं. जवाहरलाल नेहरू यांनीही मृत्यूबद्दल सांगितलेली एक वेगळी बाब येथे उद्धृत करता येणारी आहे. ‘मृत्यूने नवे जीवन मिळते. जो मृत्यूला मानत नाही किंवा स्वीकारत नाही, त्याला जगणेसुद्धा समजत नाही’, असे नेहरू म्हणत. खूप मोठा आशय व तत्त्वज्ञञान या विचारधनात सामावलेले आहे. या साºयाची चर्चा येथे कशासाठी, तर गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील नोएडात हरिभाई लालवाणीनामक व्यक्तीची अंत्ययात्रा बॅण्डबाजा लावून काढण्यात आली व त्यात त्याच्या मुली डान्स करीत सहभागी झाल्याचे वाचावयास मिळाले म्हणून. लालवाणी यांच्या इच्छेनुरूप हे असे केले गेले; परंतु मृत्यूचे हे उत्सवीकरण खरेच सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी घडविणारेच म्हणता यावे. या संदर्भात प्रख्यात हास्यकवी काका हाथरसी यांचेही उदाहरण देता यावे. आयुष्य लोकांना हसविण्यात वेचलेल्या या कवीने आपल्या निधनानंतर चितेच्या साक्षीने हास्यकवी संमेलन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती; त्यानुसार ते घेतले गेले होते म्हणे.
विशेष म्हणजे, आपल्याकडे मृत्यूचा असा उत्सव करण्याचे प्रकार चर्चित ठरत असतानाच या उत्सवाची प्रथा जपून त्याबद्दल कमालीची संवेदना जपणाºया एका समुदायाची माहितीही समोर आली आहे. इंडोनेशियाच्या साऊथ सुलावेसी प्रांतातील टोराजा समुदायात ही मृत्यूच्या उत्सवाची प्रथा आहे. या समुदायातील लोक मृत्यूपश्चात आनंदोत्सव तर साजरा करतातच; पण मृतदेहासोबत फोटोही काढतात व एका विशिष्ट रसायनाच्या लेपनाने तो मृतदेह जपूनदेखील ठेवतात. व्यक्ती कधीही मृत्युमुखी पडत नसते, अशी त्यांची त्यामागील श्रद्धा व धारणा आहे. ऐकावे ते नवल, या प्रकारात मोडणारीच ही बाब म्हणायला हवी. पण आहे तिथे तशी प्रथा. शेवटी श्रद्धेला कसा व कोण धक्का लावू शकेल? इजिप्तमध्ये ‘ममीज’ आहेत, तसेच हे म्हणायचे. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व २००० काळातील देह ‘ममीफिकेशन’ करून जपून ठेवले गेले आहेत. त्याची स्वतंत्र ‘व्हॅलीज आॅफ किंग्ज्’ तेथे असून, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे व उत्सुकतेचे ते एक केंद्र ठरले आहे.
थोडक्यात काय तर, मृत्यू हा जीवनाचा अंतिम पडाव असून, त्याबाबतची अपरिहार्यता स्वीकारता आली पाहिजे. जे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्यूनंतरचा शोक स्वाभाविक असला तरी, गीतोदेशाप्रमाणे कोण काय घेऊन आले, की काय घेऊन जाता येणार आहे? मग असे असेल तर शोक तरी कशाचा करायचा? येथे याच संदर्भाने प्रख्यात कव्वाल अजिज नाझा यांच्या अतिशय गाजलेल्या रचनेचा उल्लेख करता येणारा आहे. ‘चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा...’मधील ‘खाली हाथ आया है, खाली हाथ जायेंगा’चे वास्तव स्वीकारण्याचा हा विषय आहे. हे रिकाम्या हाती जाणे निर्मोहत्त्वाशी संबंध साधणारे आहे. जगण्यातील कसल्याही सुखाशी, इच्छा-आकाक्षांशी मोह न ठेवणारी व्यक्तीच या अवस्थेपर्यंत पोहोचू शकते. देहाची नश्चरता स्वीकारणे त्यातूनच शक्य होते. नोएडातील लालवाणी कुटुंबातील कन्यांनी तेच सत््य स्वीकारले म्हणायचे.

Tuesday, November 21, 2017
Thursday, November 16, 2017
Editor's view published in Online lokmat on 16 Nov, 2017
आजार साखरेचा वाढला, पण गोडवा का घटला?
किरण अग्रवाल
साखरेचे खाणार त्याला देव देणार असे आजवर आपण म्हणत आलो असलो तरी आता तसे म्हणणे धोक्याचे ठरले आहे कारण साखरेच्या आजाराने देशात ब-यापैकी हातपाय पसरले असून, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची वेळ आली आहे. अर्थात, एकीकडे साखरेचा म्हणजे मधुमेहाचा आजार व रुग्ण बळावत असताना समाजाच्या मौखिक व्यवहारातील वा वर्तनातील गोडवा मात्र कमालीचा घसरत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यक व समाजशास्त्रींकडून या दोन्ही पातळीवर चिंतन केले जाणे गरजेचे ठरले आहे.
भारतात साखरेच्या आजाराने उच्छाद मांडल्याचे चित्र असून, सन २०२५ पर्यंत आपला देश मधुमेहाच्या राजधानीचे स्थान प्राप्त करेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी मधुमेह दिन पाळला गेला. त्यानिमित्त उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जगात सुमारे ४२ कोटी मधुमेहाचे रुग्ण असून, त्यापैकी एकट्या भारतात सर्वाधिक साडेसहा कोटींपेक्षा अधिक रुग्ण आहेत. म्हणजे आजच आपला देश यात अव्वल आहे. डॉक्टरांकडे प्रकृतीची तक्रार घेऊन जाणा-यांपैकी चौथा रुग्ण हा मधुमेहाचा असतो, अशीही एक आकडेवारी समोर आली आहे. ‘असोचेम’ या प्रथितयश संस्थेने मागे केलेल्या एका सर्वेक्षणातही याबाबतची चिंतादायक स्थिती आढळून आली होती. २०३५ पर्यंत मधुमेहींची संख्या आजच्यापेक्षा दुप्पट म्हणजे अंदाजे साडेबारा कोटींपर्यंत पोहोचण्याचा धोका या सर्वेक्षणाअंती निदर्शनास आणून देण्यात आला होता. ही सारी आकडेवारी ‘साखरे’च्या आजाराशी संबंधित असून, वैद्यकशास्त्रानुसार शरीरातील साखर कमी वा जास्त होणे या दोन्ही प्रकाराने आरोग्यास धोका उत्पन्न होणारा आहे. त्यामुळेच साखरेचा आजार वाढत असला तरी बोलण्यातला गोडवा का कमी होत चालला आहे, असा भाबडा प्रश्न उपस्थित व्हावा.
तसे पाहता गोडाने गोड व कडू खाल्ल्याने कडवटपणाचा प्रत्यय येत असल्याचे आपले आहार वा स्वभावशास्त्र सांगते. मधुर, आम्ल व लवण हे सत्त्वगुणात, तर कडू, तुरट, तिखट हे तामसी-तमोगुणात मोडणारे रसप्रकार आहेत. आहारातील शाकाहार व मांसाहारावरून स्वभावगुणांची अगर वर्तनाची चिकित्सा केली जाते ती त्यातूनच. परंतु आहारातील साखर कमी किंवा जास्त झाली तरी आरोग्याला जशी बाधा होते, तसा स्वभावावर का परिणाम होऊ नये; हा यातील मूळ प्रश्न आहे. याबाबत नाशकातील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी साखर ही मधुर रसाची शरीरपोषक सत्त्वगुणातील बाब असली तरी तिचे अतिरेकी सेवन आरोग्यास घातक असल्याचेच सांगितले. हल्ली नैसर्गिक गोडापेक्षा रस्त्यावरील मिठाई किंवा आइस्क्रीमसारख्या पदार्थातील अनैसर्गिक साखरेचे सेवन अधिक होऊ लागल्यामुळेही मधुमेह विकाराला निमंत्रण मिळू लागल्याकडे वैद्य जाधव यांनी लक्ष वेधले. मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. समीर पेखळे यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पौष्टिकतेपासून दूर होत पाश्चात्त्य खाद्यपदार्थांकडे वाढलेला कल व व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले. ज्येष्ठ व्यक्तींखेरीज तरुण पिढीही या विकाराला बळी पडत असल्याबद्दलची चिंता डॉ. पेखळे यांनी व्यक्त केली आणि यापासून दूर राहण्यासाठी तणावमुक्त दिनचर्या व व्यायामाची निकड प्रतिपादिली. मात्र आरोग्यावर परिणाम करणारी साखर स्वभावावर का परिणाम करीत नाही, यावर दोघा तज्ज्ञांचे ‘स्वभावाला औषध नाही’ हेच एकमत दिसून आले.
समाजव्यवस्थेच्या अंगाने या विषयाकडे पाहता, परिवारातली विभक्तता आज वाढलेली दिसून येते. नोकरी वा व्यापारानिमित्त तरुण पिढी गावातून शहराकडे धावते आहे. ज्येष्ठांचे त्यांना ओझे वाटू लागल्याने त्यातून विभक्तता ओढवते आहे. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीत निचरा होणाºया कसल्याही ताण-तणावाची पिढीजात व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. शिवाय, प्रत्येकजण आज धावतो आहे. या धावण्यातून वेळेची कमतरता उद्भवत असून, त्यात नोकरी करणा-या गृहस्वामीनींची भर पडल्याने घरी स्वयंपाक करण्याऐवजी पिझ्झा-बर्गरवर निभावण्याची सवय अनेकांना जडतांना दिसत आहे. विभक्ततेमुळे ओढवलेली संवादहीनता, एकटेपणामुळे येणारे ताण-तणाव, खाण्यातील जंकफूडचे वाढते प्रमाण व अशात व्यायामाचा अभाव; याच्या एकत्रित परिणामातून साखर आपला ‘गुण’ दाखवत असल्याचा निष्कर्ष काढता येणारा आहे. आजारात वाढलेली साखर स्वभावात का वाढत नाही, त्याला अशी अनेकविध कारणे देता यावीत. त्यामुळे समाजस्वास्थ्य कसे सुधारता येईल यादृष्टीनेही प्रयत्न केला गेल्यास शरीरातील व आहारातील साखर तर नियंत्रणात राहीलच, शिवाय व्यवहार व विहारातही त्या साखरेचा गोडवा दिसून येऊ शकेल.

Monday, November 13, 2017
Saturday, November 11, 2017
Thursday, November 9, 2017
Editors view published in Online Lokmat on 09 Nov, 2017
चेहरा वाचता येणे गरजेचे !
किरण अग्रवाल
चेहरा वाचता येतो, असे नेहमी म्हटले जाते. बव्हंशी ते खरेही असते. कारण चेहरा कसाही असो, त्यावरील भाव बरेच काही बोलून जाणारे असतात. आपापल्या आकलनानुसार ते भाव समजणे अगर जाणता येणे म्हणजेच चेहरा वाचता येणे. चेहरा व त्यावरील किंवा त्यामागील मुखवटा ओळखणे त्यामुळेच तर शक्य होते. पण हे चेहरा वाचन सर्वांनाच जमते असे नाही. जेव्हा ते जमत नाही किंवा चेहरा वाचता येत नाही, तेव्हा ठोकर खाणे स्वाभाविक ठरते. चेहºयांचे पुस्तक, म्हणजे ‘फेसबुक’च्या माध्यमातून ओळख-परिचय घडून आलेल्यांमध्ये फसवणुकीचे, गंडवणुकीचे वा बदनामी केल्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत ते त्यामुळेच. सोशल माध्यमांवरचे मित्र कितीही सज्ञान वा उच्चशिक्षित असले तरी, ते या चेहरे वाचनात अपयशीच ठरत असल्याचे या घटनांतून अधोरेखित होणारे आहे.
भ्रमणध्वनी व सोशल माध्यमांनी जग जवळच नव्हे तर मुठीत आणले आहे हे खरे, त्यातून माणूस नको तितका ‘सोशल’ झाला. अगदी गावातली किंवा गावाजवळचीच नव्हेे तर दूरदेशीची, दुरान्वयानेही कधी काही संपर्क-संबंध नसलेली व्यक्तीही फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर परस्परांशी मैत्रीचे आवतण देण्यास व आलेले निमंत्रण स्वीकारण्यास आसुसलेली दिसून येते. खरा आहे की खोटा, याची फारशी फिकीर न बाळगता किंवा खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता स्क्रीनवरचा चेहरा पाहून या माध्यमांवर अनेकांची मैत्री जुळते. मैत्रीतून ओळख, संपर्क, भेटीगाठी असे एकेक टप्पे ओलांडत विश्वासाची पातळी जेव्हा गाठली जाते, तेव्हा काहींचे हे मैत्रीचे बंध नात्यांमध्ये परिवर्तित होतात. काही जण त्यातून उद्योग-व्यवसायाच्या, भागीदारीच्या संधी शोधतात. यात ‘स्क्रीन’च्या माध्यमातून पुढे आलेला चेहरा नीट वाचता आला तर चांगले काही घडते. ‘फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मैत्री जुळली अन् नंतर जुळल्या रेशीमगाठी’, सोशल माध्यमामुळे लाभला आधाराचा हात; यासारखे प्रकार त्यामुळे वाचावयास मिळतात. परंतु चेहरा वाचता आला नाही तर फसवणूकही घडून आल्याखेरीज राहात नाही. शिवाय काही प्रकरणांत बदनामीस सामोरे जावे लागून मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. आता अशा सोशल माध्यमांद्वारे ओळख वाढवून गंडविले गेल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने या माध्यमांचा वापर सावधपणे केला जाणे गरजेचे ठरून गेले आहे.
हल्ली ‘कॅशलेस’ व्यवहार वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे तांत्रिक पद्धतीने किंवा आॅनलाइन फसवणुकीचे प्रकार घडून येऊ लागले आहेत. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशकातही अशा स्वरूपाच्या घटना वरचेवर घडू लागल्याने खास ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापले गेले आहेत. यातच आता फेसबुक फ्रेंडशिप व चॅटिंगच्या माध्यमातून जवळीकता साधत फूस लावण्याचे व गंडविण्याचे प्रकार समोर येत आहेत. देशातील सायबर गुन्ह््यात महाराष्ट्र अव्वल असून, ‘सायबर दहशतवादा’चेही प्रकार येथे घडू लागले आहेत. नाशकातले उदाहरण घ्या, येथे सायबर पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर मे २०१७ पासून आतापर्यंत, म्हणजे ६ महिन्यात असे ३१ गुन्हे नोंदविले गेले असून, यात फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून फसवणूक व बदनामी केली गेल्याच्या १० गुन्ह्यांचा समावेश आहे. कॅन्सरसाठी औषध देतो असे सांगून फेसबुक फ्रेण्ड्सची सहानुभूती मिळवणाºया व नंतर त्यांच्याकडून पैसे उकळणाºया एका नायजेरीयन तरुणास मागे अटक केली गेली होती, तर व्हॉट्सअॅपवर संपर्क वाढवून अश्लील संदेश पाठविणाºयास राजस्थानातून पकडून आणले होते. आता एका टीव्ही मालिकेत काम करणाºया अभिनेत्रीशी फेसबुकवरून ओळख वाढवून, ब्रिटनमध्ये हॉटेल सुरू करण्याचे आमिष दाखवत ठाणे येथील एका तरुणाने सुमारे अडीच लाख रुपयांस तिला लुबाडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अर्थात, हे प्रकार यापुढील काळातही वाढणारच आहेत. कारण इंटरनेटवर टाइमपास करणाºयांची संख्या ४५ कोटींपेक्षा अधिक असून, २०२१ पर्यंत ती सुमारे ८० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीने अलीकडेच वर्तविला आहे. त्यातून सायबर क्राइम वाढणे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा, प्रश्न आहे तो चेहरा वाचता येण्याचा. आपण परिचयातल्या, नातेसंबंधातल्या व प्रसंगी घरातल्या व्यक्तींशी तुसडेपणाने किंवा त्रयस्थपणे वागतो आणि अनोळखींशी मात्र मैत्री वाढवतो. अशा मैत्रीत चेहरा वाचता येत नसेल तर धोका अगर अपघात टाळता येणे शक्यच नसते. ‘आ बैल मुझे मार’ या प्रकारात बसणारेच आहे हे सारे. पण, हे लक्षात घेणार कोण? त्यासाठी शासनाच्या चावडी वाचन योजनेप्रमाणे चेहरा वाचन कार्यक्रम राबविण्याची किंवा तसे प्रशिक्षण देण्याची गरज भासावी इतके हे प्रमाण वाढू पाहते आहे. तेव्हा सावधानता बाळगलेलीच बरी !

Monday, November 6, 2017
Thursday, November 2, 2017
Editor's view published in Lokmat Online on 02 Nov, 2017
भाजपातील ‘त्यागी’ कोण?
किरण अग्रवाल
भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचविणारे सत्तेबाहेर आहेत, पक्षातील निष्ठावानांना कोणीही विचारत नसल्याने ते अडगळीत पडले आहेत; हे जे काही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे ते खरे असेलही. त्यातून राज्यातील भाजपा सरकारचे तीन वर्षांचे प्रगतीपुस्तक तपासले जात असताना खºया त्यागींचे काय, असा प्रश्नदेखील नक्कीच उपस्थित करता येणारा आहे, परंतु तो करताना ‘त्यागा’ची व्याख्या वा संकल्पनेची स्पष्टता होऊन गेली असती तर अधिक बरे झाले असते, कारण त्याखेरीज सत्ता अगर संघटनेच्या कसल्याही लाभापासून वंचित राहिलेल्या व सारे काही मिळून, उपभोगूनही स्वत:ची गणना त्यागींच्या यादीत करू पाहणार्यामध्ये भेद करता येणे शक्य नाही.
पुण्यातील भोसरी येथील जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण पुढे आल्यानंतर भाजपा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांना घरी बसणे भाग पडले आहे. सदर प्रकरणाच्या व आरोपाच्या निमित्ताने उगाच आपला बळी घेतला गेल्याची त्यांची भावना असल्याने तेव्हापासून संधी मिळेल तिथे खडसे यासंबंधीची मळमळ व्यक्त करीत स्वपक्षालाच ‘घरचे अहेर’ देताना दिसून येतात. याच मालिकेत धुळे येथील एका कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या पुढ्यात बोलतानाही त्यांनी भाजपातील निष्ठावानांप्रतीची आपली ‘तळमळ’ बोलून दाखविली. यावेळी पक्षासोबत येऊ घातलेल्या नारायण राणे यांना ‘त्यागी’ संबोधत भाजपातील त्यागींकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे खडसे यांनी लक्ष वेधलेच, शिवाय आपल्यासारख्या व आणीबाणीत यातना भोगणार्या कार्यकर्त्यांची भूमिका आता केवळ प्रशिक्षकाचीच राहणार असल्याचे सांगत स्वत:च स्वत:ला त्यागींच्या यादीत घुसवून घेण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केला. त्यामुळेच खडसे यांना अपेक्षित त्यागाची व्याख्या स्पष्ट होणे गरजेचे ठरून गेले आहे.
खडसे जे काही म्हणाले ते खरे असेलही, नव्हे आहेदेखील. विशेषत: राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे प्रगतीपुस्तक पाहिले जात असताना आणि राज्यातील विकास कुठे नेऊन ठेवल्याचा हिशेब मांडला जात असताना सत्ताधारी पक्षाशी संबंधित ही भळभळणारी जखम पुढे आणली गेल्याने त्याकडेही गांभीर्याने बघितले जायलाच हवे. परंतु मुद्दा व प्रश्न आहे तो, पक्षासाठी त्याग करून आजच्या पक्षाच्याच ‘अच्छे दिन’च्या काळात संधीपासून वंचित राहिलेल्यांना त्यागी मानायचे की सारे काही मिळवून आज काही कारणाने बाजूला ठेवले गेलेल्यांना? खडसे हे या विषयाचे कारक ठरले असले तरी ते स्वत: यातील दुसर्या प्रवर्गात मोडणारे आहेत हे येथे आवर्जून लक्षात घ्यायला हवे. खडसे यांनी भाजपासाठी खस्ता खाल्या वगैरे सारे खरे मानता येईल, त्यापोटी त्यांना पूर्वीच्या युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. तद्नंतर विरोधी पक्षनेतेपद त्यांना देण्यात आले. शिवाय विद्यमान सरकारच्या प्रारंभीच्या काळातही त्यांना महत्त्वाचे खाते दिले गेले होते. याहीखेरीज स्नुषेच्या निमित्ताने खासदारकी व पत्नीच्या निमित्ताने महानंदचे अध्यक्षपद त्यांच्याच घरात आहे. जिल्हा बँकेपासून अन्य संस्थाही तशा त्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत. हे सारे तसे त्यांना भरभरून मिळाल्याची पावती देणारे आहे. त्यामुळे आज गैरव्यवहाराच्या कारणामुळे त्यांना बाजूला ठेवावे लागले असेल तर ते त्यांच्या त्यागाच्या संकल्पनेत मोडावे का, हा यातील खरा प्रश्न आहे. खडसेंच्याच जिल्ह्यातील गुणवंत सरोदे हे एक नेते आहेत, जे आमदार व खासदारही राहिले, परंतु आज बाजूला पडल्यासारखे आहेत. लगतच्या नाशिक जिल्ह्यातील प्रतापराव सोनवणे आहेत, तेही आमदार व खासदार राहिले पण आज पक्षात कुणी विचारेनासे झाले आहेत. पण या दोघांच्याही प्रकृतीच्या कारणाने त्यांची ही अवस्था ओढवली आहे. खडसेंचे तसे नाही. मग त्यागी म्हणायचे कुणाला?
विशेष म्हणजे, खडसे हे भाजपात ज्येष्ठ असले तरी मुळात तसे काँग्रेसमधून आलेले आहेत. परंतु अभाविप या विद्यार्थी संघटनेपासून ते पक्षाची मातृसंस्था म्हणविणाºया संघ व जनसंघापासून भाजपाशी निष्ठेने नाळ जोडून असलेले अनेकजण नक्कीच आहेत की, जे भाजपाच्या आजच्या सत्ताकाळात संधीपासून दूर आहेत. त्यांची दखल ना पक्ष संघटनेत घेतली जाताना दिसते ना सत्तेत. जळगावचे गजानन जोशी, मालेगावचे प्रल्हाद शर्मा, नाशिकचे रामभाऊ जानोरकर, किसनराव विधाते, परशुराम दळवी, ताई कुलकर्णी, अकोल्यातील बंडू पंचभाई अशी अन्य ठिकाणचीही अनेक नावे देता येणारी आहेत की, ज्यांनी खरेच पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासाठी मोठे योगदान दिले. पण आज कुठे आहेत ते, असा प्रश्नच पडावा. खडसे यांच्या जळगाव शेजारील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार अनिल गोटे आदी नेते अलीकडच्या काळात भाजपात आले आणि संधी घेते झाले. पण डॉ. सुहास नटावदकर सारखे लोक आजही आहे तेथेच राहिल्याचे दिसून येतात. अर्थात पक्षासाठी लढलेली व आज सत्ताकाळात घरात बसून असलेली ही मंडळी स्वत:ला त्यागी म्हणून घेत नाही. आपण सत्तेपासून वंचित असल्याचे दु:खही त्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. पण अशांकडे भाजपाचे दुर्लक्ष झाले आहे किंवा ते अडगळीत पडल्यासारखी त्यांच्या समर्थकांची भावना आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी धुळे येथे बोलताना जी भावना व्यक्त केली ती सत्य असली तरी त्यातील पूर्ण व अर्धसत्य काय, हे त्यागाची व्याख्या स्पष्ट झाल्याखेरीज समजता येऊ नये.

Monday, October 30, 2017
Saturday, October 28, 2017
Thursday, October 26, 2017
Editor's View published in Lokmat Online on 26 oct, 2017
मुहूर्त लाभला, हक्काचे काय?
किरण अग्रवाल
वर्षानुवर्षे मंजुरीच्या व अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेले प्रश्न जेव्हा सत्तांतरानंतर प्राथमिकतेने सोडविले जातात तेव्हा त्यातून सत्ताधा-यांच्या लोकाभिमुखतेचा प्रत्यय येतो हे खरे; परंतु अशा निर्णयांमागील विशेष कार्यकारणभाव जेव्हा लक्षात येतो तेव्हा त्याबाबत सावध भूमिका घेणे क्रमप्राप्त ठरून जाते. महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील नदीजोड प्रकल्पांना मिळालेल्या मान्यतांकडेही याच दृष्टिकोनातून बघितले जावयास हवे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंधरवड्यापूर्वी नवी दिल्लीत भारत जल सप्ताहाचे उद्घाटन झाले त्यावेळी देशातील नदीजोडच्या ३० प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचे केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवून संबंधित परिसरातील पाण्याची समस्या दूर होण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे. त्यामुळे नदीजोडच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास एकदाचा मुहूर्त लाभल्याचे समाधानही नक्कीच व्यक्त करता येणारे आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पार-तापी-नर्मदा व दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पांचा यात समावेश असून, येत्या तीन महिन्यांत ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास येणार आहे. पण, एकीकडे याबाबत समाधानाची प्रतिक्रिया असतानाच त्यात महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातकडे वळविण्याचा आजवरचा जो छुपा अजेंडा होता, तो उघड झाल्याने नदीजोडच्या या सत्कर्माकडेही संशयाने पाहिले जाणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
पार-तापी-नर्मदा लिंक योजनेत सुधारणा करून नार-गिरणा तसेच पार-गोदावरीचा, तर दमणगंगा-पिंजाळ लिंकमध्ये एकदरे-गंगापूरचा समावेश करण्यात आल्याने त्याचा लाभ खान्देश व गिरणा खोºयाला आणि शिर्डी-नगर-सिन्नरला होण्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यासाठीही पाणी उपलब्ध होणार असून, विकासास चालना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परंतु या नदीजोड लिंक प्रकल्पांमुळे महाराष्ट्राला व त्यातील कोणत्या खोºयाला अगर क्षेत्राला नेमके किती पाणी मिळणार याची निश्चित आकडेवारी समोर येत नसल्याने संभ्रमात भर पडून गेली आहे. यासंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गोदावरीला १२, तर गिरणा खोºयाला ३० टीएमसी पाणी मिळेल असे सांगितले आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला ५० टीएमसी पाणी देण्याची घोषणा केली आहे. पण राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी दिवाळीपूर्वी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या मुंबईतील बैठकीत महाराष्ट्राला २७ टीएमसी पाणी मिळेल असे सांगितले आहे. तिकडे दिल्लीत गडकरी यांनी महाराष्ट्राला ५० टीएमसी पाणी मिळेल असे सांगितले आहे. ही वेगवेगळी आकडेवारीच अनेक शंकांना जन्म देणारी असून, याखेरीज गुजरातला जे पाणी वळविले जाणार आहे तो आक्षेपाचा वा कळीचा मुद्दा आहे.
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्र सरकार ९० टक्के खर्च करणार आहे. त्याकरिता अर्थसंकल्पात २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी नांदेडमधील धानोरा रोड भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सांगितले. म्हणजे राज्यावर केवळ १० टक्के खर्चाचाच भार येणार आहे. पण असे असले तरी, महाराष्ट्रातील पाणी अडवून व वळवून ते गुजरातला देण्याला जलसाक्षरतेच्या क्षेत्रात काम करणाºया संस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मॅगेसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी तर दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प हा थेट ‘लिंकिंग आॅफ करप्शन’ असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील पाणीवाटप करार हा तसा काँग्रेसच्या काळात झालेला असला तरी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही नार-पारचे पाणी गुजरातला देऊ नका, असे आता सुचविले आहे. नाशकातील माजी आमदार नितीन भोसले यांनी हा विषय राज ठाकरे यांच्याकडे सोपवून दिवाळीनंतर ‘मनसे’ला या प्रकरणी मैदानात उतरवणार असल्याचे सांगितले होते. आता दिवाळी आटोपली असून, हाती अन्य राजकीय मुद्दे नाहीत. शिवाय, राज यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याने तसेच विषय महाराष्टच्या हक्काचा असल्याने नदीजोड अंतर्गत राज्यातील प्रकल्पांना मुहूर्त लाभला असला तरी पाण्याच्या हक्काच्या विषयावरून आता फटाके फुटणे स्वाभाविक ठरले आहे.
Saraunsh not Published on 22 Oct, due to Holiday
Saraunsh not published 0n 22 Oct, 2017 due to Dipawli Padwa Holiday.
Thursday, October 19, 2017
Editor's View Published in Lokmat Online on 19 Oct, 2017
एक करंजी भुकेल्यांसाठी
!
किरण अग्रवाल
दिवाळीच्या दीपोत्सवाने अवघा आसमंत उजळून निघाला आहे. अंधकाराला दूर
सारणाऱ्या प्रकाशाचाच हा उत्सव असल्याने सर्वत्र उत्साहाचे, चैतन्याचे मंगलमयी
वातावरण आहे. हा उत्साह वा आनंद आपल्यासमवेत इतरांच्याही चेहऱ्यावर पाहण्यासाठी
अनेक व्यक्ती, संस्था-संघटना हल्ली धडपडताना दिसत आहेत. सामाजिक भान टिकून असल्याचा
व ते जपण्यासाठी अनेक हात पुढे सरसावताना दिसण्याचा आशादायी प्रत्यय यातून येत
असून, तोच खरा निराशेची काजळी दूर सारणाराही आहे; पण हा आनंद वा उत्साह प्रासंगिक
दिवाळीच्या सणापुरता न राहता या मागील भावना बारमाही स्वरूपात कशी टिकू शकेल याचा
विचार होण्याची गरज आहे. विशेषत: दिवाळीच्या निमित्ताने एकीकडे गोडधोड फराळाचे
‘शेअरिंग’होत असताना दुसरीकडे भुकेच्या समस्येत आपला देश चक्क शंभराव्या स्थानी
आल्याची वार्ता पाहता, भूकमुक्त भारत साकारण्यासाठी प्रयत्न होण्याची निकड अधोरेखित
व्हावी.
यंदा तसा पाऊस समाधानकारक झाला. अलीकडच्या काही दिवसात काही ठिकाणी
परतीच्या पावसाने नुकसान घडवून आणले; पण त्याखेरीज पावसाने बऱ्यापैकी हात दिला.
सर्वच ठिकाणची धरणो त्यामुळे ओसंडून वाहिली. गेल्यावर्षीच्या नोटाबंदीच्या
तडाख्यातून जनता अजून पुरेशी सावरलेली नसताना ‘जीएसटी’नेही त्यात भर घातली. त्यातच
कर्जबारीपणामुळे शेतकऱयांच्या आत्महत्या घडून आल्या. त्यामुळे काहीसे नैराश्याचे व
चिंतेचे वातावरण होते. पण ऋण काढून सण साजरा करण्याची भारतीय मानसिकता असल्याने
दिवाळीच्या निमित्ताने बाजारात तेजी आल्याचे दिसून आले. अडीअडचणी व चिंतांना दूर
सारत प्रत्येकजण आपापल्या परीने आशेचे दीप लावताना दिसून येत असून, सारे वातावरण
चैतन्याने भारले आहे. दीपोत्सवाचे हेच तर विशेष असते की, अवघा समाज या
चैतन्यपर्वाच्या आनंदात न्हाऊन निघतो. विशेष म्हणजे, हा आनंद वा उत्सव व्यक्तिगत
आपल्यापुरता किंवा आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता तो इष्टमित्रांसमवेतच
वंचितांबरोबर साजरा करण्याची भावना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आदी तालुके
आदिवासीबहुल आहेत. सरकार या क्षेत्रासाठी अनेकविध विकास योजना आखत असते; पण त्या
पूर्णाशाने आदिवासी घटकांपर्यंत पोहचत नसतात. त्यामुळे हा घटक अजूनही विकासापासून
वंचितच असल्याचे दिसून येते. या वंचितांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक
व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना आदिवासी वाडय़ापाडय़ांवर धाव घेत असतात. काही
वर्षापूर्वी ‘एक करंजी मोलाची’असे उपक्रम राबविले जात असत. याबाबतीत नाशिक
जिल्ह्यातील येवला येथील धडपड मंचचे नाव आवर्जून घ्यायला हवे. या मंचचे सदस्य
प्रतिवर्षी असा उपक्रम राबवून वंचितांसोबत दिवाळी साजरी करत असतात. त्याचप्रमाणो
गेल्या काही वर्षापासून अनेक संस्थाही यासाठी पुढे सरसावलेल्या दिसत आहेत. यंदा
नाशकातील आकार फाउण्डेशन, सोशल नेटवर्किग फोरम, युवा अस्तित्व फाउण्डेशन, यश
फाउण्डेशन, अवेकनिंग जागृती संस्था, स्पार्टन हेल्प सेंटर, मानवधन, माणुसकी व सावली
बहुउद्देशीय संस्था, पूर्वाचल विकास समिती, वात्सल्य संस्था, हास्ययोग क्लब
यांसारख्या अनेक संस्थांच्या पदाधिकाऱयांनी व सदस्यांनी आदिवासी वाडय़ापाडय़ांवर जाऊन
दिवाळी साजरी केली. सामाजिक समतेचा, कर्तव्याचा व उत्तरदायित्वाचा आदर्श वस्तुपाठ
यातून घडून येत आहे. पण सणावाराच्या निमित्ताने हे जे घडून येते ते कायम दिसून येत
नाही. या वंचित घटकाचे दिवाळीचे दोन पाच दिवस आनंदात जात असले तरी, त्यांचा उर्वरित
काळ परिस्थितीशी झगडण्यातच जातो. यातून आदिवासी बालकांच्या कुपोषणासह त्यांचे व
मातामृत्यूंचे प्रमाणही वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच अमेरिकेतील
आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्थथेने आपला जो अहवाल जारी केला आहे त्यात
भारतातील भुकेची समस्या आपल्यापेक्षा लहान व गरीब असलेल्या शेजारील देशांपेक्षा
गंभीर असल्याचे नोंदविले आहे. अगदी नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, इराक व
उत्तर कोरियापेक्षाही आपल्याकडील भुकेची समस्या गंभीर आहे. ११९ विकसनशील देशांच्या
या यादीत भारताचा क्रमांक तब्बल शंभरावा आहे, यावरून ही समस्या किती गंभीर आहे याचा
अंदाज बांधता यावा. आपल्याकडे मुलांमधील कुपोषणाची समस्या मोठी असून, त्यामुळेच या
यादीत भारताचे स्थान खूप खाली घसरले आहे. भारतात पाच वर्षाच्या आतील एकपंचमांश
मुलांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत कमी असते, हा कुपोषणाचा परिणाम असल्याचे या
अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१४ मध्ये भारताचा क्रमांक या यादीत ५५ वा होता, तर
गेल्या वर्षी ९७ वा होता. यंदा त्याहूनही खाली घसरण झाली आहे. ही बाब केवळ
चिंतादायक नसून संवेदनशील मनाला चिंतन करावयास लावणारीदेखील आहे. आपल्या सामाजिक
संस्था, संघटना दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी पाडय़ांवर जाऊन त्यांचे काही दिवस गोड
जरूर करून देतात; परंतु त्याने परिस्थिती सुधारणारी नाही. कुपोषणासारखे प्रकार
टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी यंत्रणांच्या झारीतील शुक्राचार्यामुळे
त्यात पुरेसे यश येत नाही. यासंदर्भात सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेऊन ग्रामीण व
आदिवासी भागातील सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सजग राहणे अपेक्षित आहे.
भूकमुक्ती हा तसा गंभीर विषय आहे. एकीकडे समाजात आपले मोठेपण
मिरवण्यासाठी लग्नांमध्ये अनेकविध जिन्नसांचा समावेश असलेल्या मोठमोठय़ा पंगती उठत
असताना व मोठय़ा प्रमाणात अन्नाची नासाडीही होत असताना दुसरीकडे दोन वेळेच्या
जेवणाची भ्रांत असलेला वर्गही आपल्याकडे आहे. पण त्याबाबत कोणालाच काही वाटत
नसल्याचे चित्र आहे. लग्न-समारंभानिमित्त होणाऱ्या अन्नाच्या या नासाडीबद्दल
‘उतनाही लो थाली में, व्यर्थ ना जाये नाली में’ अशी जाणीव जागृती करणारी मोहीम हाती
घेण्याची वेळ अनेक ज्ञाती संस्थांवर आली आहे, त्याचा बऱ्यापैकी परिणामही होताना
दिसत आहे. पण तरीही भुकेला घटक भुकेपासून मुक्त होऊ शकलेला नाही. सामाजिक समतेचा
उच्चार अनेकांकडून अनेक ठिकाणीी केला जातो, परंतु जिथे भुकेच्या पातळीवर समता
साकारता येत नाहही तिथे अन्य बाबतीतली अपेक्षा काय करता यावी? मनाला कमालीचे विषण्ण
करणारी ही वेदनादायी परिस्थिती आहे. तेव्हा दिवाळीचा आनंद साजरा करताना भुकेला
सामोरे जावे लागत असलेल्या घटकासाठीही संवेदनांची व सहकार्याची एक पणती आपण
लावूया.. ही मिणमिणती पणतीच भुकेचा अंधार दूर करू शकेल. आमचे सहकारी पत्रकार, कवी
संजय वाघ यांनीही तेच तर म्हटले आहे,
‘लोकशाहीच्या मुळावर रोजच बसे येथे घाव,
त्या अंधारलेल्या वाटेवर एक तरी पणती लाव’.
Wednesday, October 18, 2017
Editor's View Published in Lokmat Online on 12 Oct, 2017
प्रामाणिकताही देते
अस्वस्थताच !
किरण अग्रवाल
स्वस्थता व अस्वस्थता ही वृत्तीशी व पर्यायाने मनाशी निगडित असल्याने
ती इतकी व्यापक बाब बनली आहे की, कोणत्याही व्यक्तीला कशाने स्वस्थता लाभेल, अगर ती
कशाने अस्वस्थ होईल ते सांगता येऊ नये. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, स्त्री-पुरुष,
अमुक-तमुक असा कसलाही भेदाभेद न ठेवता सर्वांमध्ये आढळून येणारी ती बाब आहे.
अर्थातच एखाद्याला ज्यामुळे स्वस्थता लाभते, तीच बाब दुसऱ्यासाठी अस्वस्थतादायक ठरू
शकते हेही खरे. कारण एकाच बाबीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू
शकतो; पण यातही नि:संशय गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रामाणिकतेतूनही जेव्हा स्वस्थता,
समाधानाऐवजी अस्वस्थता वाट्यास आलेली दिसून येते तेव्हा मनाच्या आरशातील संवेदनांचे
प्रतिबिंब अधिक आखीव-रेखीव, पारदर्शी तसेच स्वच्छ वा नितळ उमटल्याची ती पावती
ठरते.
मनाच्या अस्वस्थतेचे हे प्रास्ताविक यासाठी की, प्रामाणिक व पापभीरू
व्यक्तीला तिच्या या सद्गुणांपायी कशा अस्वस्थतेला व मनाच्या उलाघालीला सामोरे
जाण्याची वेळ येते, याचा एक अनुभव नुकताच येऊन गेला. त्याचे झाले असे की, आमच्या
रेणुवहिनींना त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर पडलेली एक नोटांची पुरचुंडी आढळून आली.
उचलून पाहता, पंतप्रधान मोदी यांनी एका आदेशान्वये चलनातून बाद केलेल्या त्या नोटा
नव्हत्या तर नव्या चलनातले दोन हजार रुपये होते ते. त्यांच्या अस्वस्थतेचा प्रवास
सुरू झाला तो तेथूनच. कारण, कुणाचे असावेत ते पैसे, कसे पडले असावेत अशा प्रश्नांनी
डोके खाजवून खाजवून त्यांच्या केसांचा अंबाडा कधी सुटून गेला हे त्यांनाही कळले
नाही. कुणाचे का असेना, आपल्याला काय त्याचे; आपली तर दिवाळी साजरी झाली असा
सामान्य विचार करून स्वस्थता न अनुभवता, त्यांच्या डोळ्यासमोर त्या रस्त्यावर हाती
लागलेल्या बेवारस नोटांवरील गांधीजींच्या चित्राच्या जागी अनामिक, अज्ञात चेहऱ्याची
आकृती भिरभिरू लागली. ज्याचे कुणाचे असतील हे पैसे, त्याचा जीव किती टांगणीला लागला
असेल? कुणा विद्यार्थ्याच्या शाळेच्या फीचे असतील हे पैसे तर त्याचे बिचाऱ्याचे काय
झाले असेल? कुणा मोलमजुरी करणाऱ्याचे पडले असतील तर त्याला गरिबाला जेवण गेले असेल
का, अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांचे काहुर रेणुवहिनींच्या डोक्यात उठले होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरातील साफ-सफाईचे काम त्यांनी दोन-चार दिवसांपासून हाती
घेतले होते, तेही आज बाजूला ठेवून त्या याच चिंतेत अस्वस्थ होत्या की, कुणाचे असतील
हे पैसे आणि कसे शोधून द्यायचे त्याला त्याचे पैसे? शिवाय, नाहीच सापडला तो तर आपण
काय करायचे या पैशांचे?
\
झाले, नोटाबंदीमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग खालावतो आहे किंवा
रहिवासी भागात फटाके विक्रीस न्यायालयाने बंदी घातल्यासारखे अनेक महत्त्वाचे विषय
असताना त्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र न जमणाऱ्या शेजार-पाजारणींची गल्लीत
सापडलेल्या पैशाचे काय करायचे, या विषयावर तातडीची बैठक झाली. सुदैवाने, या पैशांची
पार्टी करून टाकू आणि विषय संपवू, असे एकीचेही मत नसल्याने पैसे हरविलेल्याचा शोध
घेण्याचे ठरले, आणि तेथून सुरू झाला पुन्हा वेगळ्याच अस्वस्थतेचा प्रवास. कारण, या
शोधातून एकापेक्षा अनेक दावेदार पुढे आले तर त्यातील खरा कोण, हे कसे पडताळायचे,
असा प्रश्न यातून पुढे आला. नोटा किती होत्या, त्यांचे वर्गीकरण कसे आदी प्रश्न
करून ते नंतर ठरविता येईल म्हणून अगोदर विषयबाधिताचा शोध सुरू करून ही अस्वस्थता
दूर करण्याचा प्रयत्न केला गेला; पण हा शोधही काही सोपा-सहज नव्हताच. त्यासाठी
घरातील एका रुग्णाची खोली बदलून त्याला रस्त्यालगतच्या खिडकीजवळ शिफ्ट केले गेले.
बिछान्यावर पडल्या-पडल्या किंवा खुर्चीवर बसून रस्त्यावर लक्ष ठेवायचे, की कुणी
पैसे हरविलेला शोधाशोध करीत असल्याचे आढळून येते का, असे एकमेव उद्दिष्ट त्याला
दिले गेले. त्यापोटी त्याला बसल्याजागी म्हणजे खिडकीजवळच चहापाण्यापासून
जेवणापर्यंतच्या साऱ्या सोयी-सुविधांची तजवीज केली गेली. घरातील अन्य सदस्यांनी
उजळणी केली की सकाळपासून कोण कोण या रस्त्याने आले-गेले, त्यातील ओळखीचे किती व
अनोळखी किती? मग त्यातील ओळखीच्या लोकांना थेट काही न सांगता कडेकडेने चाचपून
बघितले गेले की, त्यांचे तर काही हरवले नाही ना? अशात संपूर्ण दिवस निघून गेला; पण
हाती काही लागले नाही. सूर्य मावळतीला जाऊ लागला तसतशा आशा धूसर झाल्या आणि
रेणुवहिनींच्या अस्वस्थतेत भर पडत गेली. आपला संबंध व अधिकार नसलेल्या या पैशांचे
आता करायचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत होता. संध्याकाळ झाली, रात्रही सरली; पण
विषय मार्गी लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सहकारिणींसमवेत पुन्हा चर्चेची फेरी झाली. कुणी म्हटले
एखाद्या मंदिरात दानपेटीत अर्पण करून द्यावे हे पैसे. पण जे आपले नाही ते दान तरी
कसे करावे देवाला? म्हणून प्रस्ताव खारीज केला गेला. अन्यही काही पर्यायांवर चर्चा
झाली. अखेर जेवढे पैसे सापडलेत, तेवढेच त्यात स्वत:चे टाकून मिठाई आदी घेण्याचे व
अनाथ, निराधार बालकांना ती वाटून त्यांची दिवाळी आनंददायी करण्यावर एकमत झाले, आणि
या विषयावरून सुरू झालेला अस्वस्थतेचा प्रवास संपुष्टात आला. एका वेगळ्या कारणातून
उद्भवलेली अस्वस्थता सामाजिक जाणिवेचा हुंकार घडविण्यास कारणीभूत ठरली, ही यातील
समाधानाची बाब. परंतु कसल्या का होईना, दु:खाने, विवंचनेने अगर उणिवेने आकारास
येणारी अस्वस्थता नैतिकतेच्या विचारभानातूनही प्रत्ययास येऊ शकते. त्यातून मनाच्या
पप्रामाणिकतेचे, हळुवारतेचे व संवेदनांचे जे स्पंदन घडून येतात ते सारेच काही संपले
नसल्याची द्वाही देतात, असेच म्हणायला हवे. दिवाळीच्या दीपोत्सवात या संवेदनांच्या
अशा पणत्याच सर्वांच्या मनाचे अंगण उजळून काढो, एवढेच यानिमित्ताने!
Friday, October 6, 2017
Editor's view published in lokmat Online on 05 Oct, 2017
माणूस का वैतागतो?
किरण अग्रवाल
खरे तर हा प्रश्न व्यक्ती व परिस्थिती सापेक्ष आहे. कारण प्रत्येकच
व्यक्तीच्या त्रासा अगर त्राग्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. तो कोणत्या
परिस्थितीला सामोरे जातो आहे त्यावरही त्याचे वैतागणे अवलंबून असते. पण, हे सर्व
समजून घेत असताना व समाजशास्त्राच्या चौकटीतून त्याकडे पहात असताना जिवाच्या
अंतानंतरही जेव्हा गेलेल्या व्यक्तीबद्दलच्या नसत्या प्रश्नांना सामोरे जाण्याची
वेळ त्याच्या आप्तेष्टांवर येते, तेव्हा येणारा वैताग हा स्वत:सोबतच
यंत्रणांबद्दलही चीड, संताप व मनस्ताप देणारा ठरल्याखेरीज राहात नाही. हे सारे काय
असते ते अनुभवण्यासाठी नाशिक अमरधाममध्ये जायला हवे !
मृत्यू हा अटळ आहे. तो टळत नसतो हे खरेच; पण मृत्यूनंतरही पुन्हा तो
यंत्रणेकडून ओढवल्याचे अनुभव अलीकडे अनेकांना येत असतात. अर्थात, गेलेल्या
व्यक्तीच्या विचाराच्या वा आचरणाच्या विरुद्ध जेव्हा घडते तेव्हा त्या व्यक्तीचा
पुन्हा मृत्यू ओढवल्याचे म्हटले अगर मानले जातेच; परंतु मृत व्यक्तीच्या
मृत्यूबद्दल जेव्हा संबंधित कागदपत्रांची पूर्तता करून ती खरेच आपल्यात नाही हे
सरकार दरबारी पटवून देण्याची वेळ येते, तेव्हाचे संबंधितांचे वैतागणे याला तोड
नसते. कारण, गेलेल्याच्या रितेपणाची बोच मनी घेऊन ते सिद्ध करून द्यावे
लागण्यासारखे कष्ट वा वेदनादायी अन्य काही असू शकत नाही.
नाशिक महापालिकेने यात आणखी काहीशी भर घालून जगण्याला नव्हे तर,
मरणालाही छळण्याचाच प्रयत्न चालविल्याचा अनुभव हल्ली नाशिककर घेत आहेत. मृत्यू
दाखला देण्यासाठी उपयोगी ठरणारी माहिती अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासमयी भरून घेत
असताना आता मृत व्यक्तीच्या व्यसनांबद्दलची माहितीही विचारून अर्जात भरून घेतली जात
आहे. यात मृताला सिगारेट, विडी किंवा तंबाखूचे व्यसन होते काय? सुपारी, पानमसाला,
दारू अथवा तत्सम उत्तेजक पदार्थांचे व्यसन होते काय, अशी प्रश्ने आहेत. ज्या
प्रश्नांची उत्तरे जिवंतपणी सहजासहजी प्रामाणिकपणे दिली जात नाहीत, ती ही प्रश्ने
आहेत. त्यामुळे मृत्युपश्चात कोोण आपल्या व्यक्तीचे रेकॉर्ड स्वत:हून खराब करून
ठेवणार, असा प्रश्न त्यातून उपस्थित होणे स्वाभाविक ठरून गेले आहे.
मुळात, अशी माहिती संकलित करून तिचे करणार काय, हा यासंदर्भातील
प्रश्न आहे. व्यसन अगर जे काही असेल ते संबंधिताबरोबर गेले असताना कागदपत्रांमध्ये
ते नोंदवून ठेवण्यात हशील काय? आज व्यसन होते काय, हे विचारले जाणार व उद्या ते
नव्हते म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र जोडायला लावण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाणार
नाही, अशी भीतीही त्यातून उपस्थित होणारी आहे. व्यवस्था ही वैतागाला कारणीभूत
ठरण्यासंदर्भातले यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण शोधून सापडू नये.
आप्तेष्टाच्या निधनाने हबकलेले, उणेपणाच्या भावनेने व्याकुळलेले
कुटुंबीय मृताच्या व्यसनाची यानिमित्ताने उजळणी करून व महापालिकेच्या दप्तरी त्याची
नोंद करून कोणत्या आठवणी जपल्या जाणार हा प्रश्नच असताना दुसरीकडे अमरधाममध्ये
दिल्या जाणाºया सुविधांबद्दल मात्र महापालिका गंभीर नाही. नाशकातील एकूण ११
अमरधामपैकी केवळ दोनच ठिकाणी मोफत अंत्यविधीशी संबंधित व्यवस्था होताना दिसते.
त्यामुळे ‘मरणानंतरचेही मरण’ अनुभवास आल्याखेरीज राहात नाही. त्यातही आता मृत
पावलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ
व्यक्तींच्या बाबतीत अडचणीत वाढ झाली आहे. अपघातातील मृत, बेवारस मृतांच्या बाबतीत
तर अधिकच त्रासदायी अशी ही अट आहे. व्यवस्थांबद्दलच्या वैतागलेपणात भर पडून जाते ती
या अशा नियम-निकषांमुळेच. जगणे सोपे होत नाही; पण मृत्यूही सोपा-सुलभ राहिला नाही,
हेच वास्तव यातून समोर यावे.
Saturday, September 30, 2017
Thursday, September 28, 2017
Editor's View published on 28 Sept, 2017 in Lokmat Online
वैचारिक मन्वंतराचे दक्षिणायन !
किरण अग्रवाल
आजची तरुण पिढी बाकी सारे सोडून मोबाइलमध्ये डोके घालून बसली आहे, अशी
तक्रार पालकांकडून होत असताना आणि त्यात बरेचशे तथ्य दिसत असतानाही समाज व
देशासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यातील तब्बल पाच सातशे तरुण
एकत्र येतात व आपला एक जाहीरनामा तयार करून त्यासाठी कृतसंकल्प होतात ही बाब साधी
नाही. आजची ही ठिणगी उद्या मशालीचे रूप धारण करून समोर येण्याचा शुभसंकेत तर यातून
मिळावाच, शिवाय सारेच काही संपलेले नाही; समाजाप्रतिच्या उत्तरदायित्वाचा विचार
करणारी एक फळी घडतेय याचा आशादायी सांगावाही त्यातून मिळावा.
सध्या सुरू असलेला नवरात्रोत्सव म्हणजे तरुणाईच्या जल्लोषाचा उत्सव.
अलीकडे सणावारांच्या संकल्पनाही बदलून गेल्याने, जसजसा सूर्य मावळतीकडे जाताना
दिसतो तसतसे तरुणांचे घोळके हाती टिपºया घेऊन दांडिया मैदानाकडे लोटताना दिसून
येतात. पण अशा या माहौलातही राज्याच्या कानाकोपºयातील निवडक तरुण ‘दक्षिणायन’च्या
माध्यमातून नाशकात जमले होते. ‘डिझायनिंग द फ्यूचर’ अशी संकल्पना घेऊन त्यांनी
आपल्या स्वत:समोरीलच नव्हे तर समाज व देशासमोरीलही विविध आव्हानांवर जीव तोडून
चर्चा केली. काही प्रश्न उपस्थित केले, तर काही प्रश्नांची उत्तरेही स्वत:च शोधलीत.
दोन दिवसांच्या या युवा संमेलनात शिक्षणाचे वाढते बाजारीकरण, स्त्री-पुरुष समानता,
पर्यावरण, क्षीण झालेली जातिअंताची लढाई, लैंगिक शिक्षण अशा गहन वा गंभीर विषयांवर
खल झाला. महाराष्ट्र शाासनाने २०१२ मध्ये दहा वर्षांसाठी तययार केलेल्या युवा
धोरणास पाच वर्षे पूर्ण होत आहेत, त्याबाबतचा आढावाही यात घेण्यात आला. केवळ आपसात
चर्चा करून हे तरुण थांबले नाहीत, त्यांनी गटागटाने नाशकातील विविध
शाळा-महाविद्यालयांत जाऊन सर्वांची मते अभ्यासली. अर्थातच, तरुणाईच्या या चळवळयुक्त
मोहिमेला वैचारिक अधिष्ठान लाभले होते ते दक्षिणायन अभियानाचे प्रणेते व
आंतरराष्ट्रीय भापातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ पत्रकार विद्या बाळ, कुमार केतकर,
समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, साहित्यिक प्रा. डॉ. रावसाहेब कसबे, कामगार नेते
भालचंद्र कानगो, शमसुद्दीन तांबोळी, उल्का महाजन, नंदा खेर आदी मान्यवरांचे.
महत्त्वाचे म्हणजे तरुणांबद्दल बोलताना अगदी सरधोपटपणे बोलले जाते की,
त्यांना समाजाशी काही देणे-घेणे उरलेले नाही किंवा प्रारंभी उल्लेखिल्याप्रमाणे ते
मोबाइल-व्हॉट्सअॅपमध्ये गुंतून पडल्याचेही सांगितले जाते. परंतु डॉ. गणेश देवी
यांनी जो विचार यासंदर्भात मांडला त्याची प्रचिती याच संमेलनात येऊन गेली. डॉ. देवी
म्हणाले, आजच्या वर्तमान अवस्थेत युवकांना अभिव्यक्तच होता येत नाही. त्यामुळे
त्यांना प्रथम अभिव्यक्त होऊ द्या. त्यातून काय निष्पन्न होईल व त्याचा समाजासाठी
कसा वापर करून घेता येईल ते नंतर पाहू, आणि खरेही आहे ते. आपला देश सर्वाधिक
तरुणांचा देश म्हणवला जातो, नव्हे तसे आहेच. परंतु तरुणांना समजून न घेताच साºयांचे
सारे काही चालू असलेले दिसते. त्याला जमेतच धरले जात नाही. यासंदर्भात प्रा. कसबे
यांचे प्रतिपादन अधिक बोलके आहे. ते म्हणाले, ‘विचारांचे स्वातंत्र्य हे मानवाचे व
लोकशाहीचेही वैशिष्ट्य आहे, परंतु तरुणाईने विचार करू नये अशीच व्यवस्था निर्माण
केली जात आहे’. तेव्हा ही व्यवस्था भेदून पुढे येण्याचा व आपले, समाजाचे आणि
देशाचेही ‘फ्यूचर’ डिझाइन करण्याचा प्रयत्न या युवा संमेलनाद्वारे केला गेल्याचे
दिसून आले.
दक्षिणायन युवा संमेलनातील चर्चेअंती आपल्या सामूहिक कृतीचा एक भाग म्हणून
तरुणाईने आपला एक जाहीरनामा तयार केला आहे. ‘महाराष्ट्रा तू असावास जात पात मुक्त,
धर्मांधता मुक्त, दलितांच्या रोज रोज होणाºया अवहेलनेपासून मुक्त, अज्ञान,
अंधश्रद्धा, अविवेक मुक्त, भूक मुक्त, बेकारी मुक्त, लाचलुचपत मुक्त, निराशा मुक्त,
शेतकºयांच्या हत्या आणि आदिवासींचे विस्थापन यापासून मुक्त, स्त्रियांवरच्या
बेसुमार वाढलेल्या अत्याचारापासून मुक्त, भोंदूगिरी, दादागिरी, बुवाबाजी यातून
मुक्त, भयमुक्त’ अशा विविध सामाजिक व्याधींपासूनची मुक्ती मागणारा व ज्या
स्वार्थाच्या, द्वेषाच्या, निराशेच्या, खोट्या प्रचाराच्या-गोंगाटाच्या वातावरणात
आपण वाढत आहोत ते वातावरण संपूर्ण बदलण्याचा निर्धार व्यक्त करून एल्गार पुकारणारा
हा जाहीरनामा आहे. येत्या दि. १ आॅक्टो. २०१७ रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर,
सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद व यवतमाळ या शहरांमध्ये एकाचवेळी तर त्यापुढील दहा
दिवसांत राज्यातील अन्य शहरांत तरुणांद्वारे या जजाहीरनाम्याचे वाचन करून अन्य तरुण
मने जागविली जाणार आहेत. त्यामुळे नाशकात पडलेली नवरात्रातील ही वैचारिक जागराची
ठिणगी नवा प्रकाश पेरण्याची अपेक्षा नक्कीच करता येणारी आहे. त्यासाठी या युवा
संमेलनाचे संयोजन करणाºया डॉ. मिलिंद वाघ, रसिका सावळे, विराज देवांग, श्यामला
चव्हाण, डॉ. रोहित कसबे व कल्याणी आहिरे या धडपड्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच
आहे.
Tuesday, September 26, 2017
Friday, September 22, 2017
Editor's View published on 21 Sept, 2017 in Lokmat Online
उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना...
किरण अग्रवाल
नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव. चैतन्याने भारलेल्या या पर्वकाळात शक्ती, भक्तीचे प्रतीक असलेल्या देवींची उपासना केली जाते. ‘या देवी सर्व भुतेषु, स्त्री रूपेण संस्थिता’ असा विचार व त्यावर श्रद्धा ठेवणारा आपला समाज असल्याने स्त्री किंवा नारी शक्तीचा मोठा जागर या काळात घडून येतो. या जागरातून लाभणारी सकारात्मक ऊर्जा स्त्रीशक्तीच्या विकासाला नक्कीच चालना देणारी असते हे खरेच; परंतु एकीकडे हे होत असताना दुसरीकडे यासंदर्भातील अडथळ्यांच्या शर्यती संपताना दिसत नसून, महिला-भगिनींवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंताजनक ठरत आहे.

नवरात्र पर्वात अलीकडे दांडिया, गरबा आदी प्रकारांना अधिक उधाण आलेले
दिसत असले तरी त्यामागील मूळ प्रेरणा स्त्रीशक्तीच्या आनंदाची, पूजनाची राहिली आहे.
गरबातील टाळ्यांच्या नादातून तेजाची निर्मिती संकल्पिली गेली असून,
आदिशक्ती-आदिमायेचे आवाहन त्यातून घडून येते. शिवाय, स्त्रीला देवता मानून पूजणारी
आपली संस्कृती आहे. त्यासंदर्भात ‘स्त्रयै देव:
स्त्रयै प्राण:’ असे शास्त्रात म्हटले गेले आहे. स्त्री हीच देवता असून, तीच
जीवनाची प्राणतत्त्व आहे, असे त्यातून सांगितले गेले आहे. इतकेच नव्हे तर, वेदातही
नारीच्या गौरवाचा उल्लेख असून, तिच्या शक्तीचे गुणगाण आहे. ‘यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते
तत्र देवता’ म्हणजे, जेथे नारीची पूजा होते, तिचा आदर केला जातो, तिथे देवतांचा
निवास असतो, इतक्या आदरार्थाने नारीचे वर्णन केले गेले आहे. शास्त्रात वा वेदात तरी
डोकावायचे कशाला, साधे घरातले आपल्या समोरचे, आपल्याला दिसणारे उदाहरण घ्या; घराला
घरपण मिळवून देणाºया स्त्रीचा ज्या घरात सन्मान राखला जातो ते घर जणू गोकुळाची
अनुभूती देणारे ठरते. पण, जेथे ते नसते, तेथे काय दिसते हे न लिहिलेले बरे. त्या
अर्थाने स्त्री ही घरातली, समाजातली प्राणतत्त्व आहे, चेतना आहे, ऊर्जा आहे. रूपे
विविध असली तरी, घराला बांधून ठेवणारा तो ममत्वाचा धागा आहे. नवरात्रोत्सवाच्या
निमित्ताने याच ऊर्जेची आराधना केली जाते. देवीची पूजा करतानाच समाजातील सेवाभावी,
चळवळी महिलांचा; पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर, काही क्षेत्रात
त्यांच्यापेक्षा काकणभर पुढेच राहात आपल्या कर्तव्याची, क्षमतेची पताका फडकविणाºया
नवदुर्गांचा गौरव केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानेही तसे घडून येते.
त्यातून शक्ती, सामर्थ्याचा, संस्काराचा आदर्श इतरांसमोर ठेवला जातो. अवघ्या
नारीशक्तीला बळ देणाºयाच या बाबी आहेत. पण, नारीला देवीसमान मानून पुजण्याचे हे
उत्सव एकीकडे होत असताना दुसरीकडे तिच्यावरील अन्यायाच्या घटना थांबताना दिसत
नाहीत. उलट, त्यात वाढच होत आहे. स्त्रियांबद्दलच्या आदरभावाची जपणूक व रुजवणूक
अधिक प्रभावीपणे होण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित व्हावी.
यासंदर्भात नाशिकपुरतेच बोलायचे झाल्यास, चालू वर्षातील गेल्या आठ महिन्यात शहरातील विविध पोलीस ठाण्यात बलात्काराच्या १९, तर विनयभंगाच्या ८० पेक्षा अधिक तक्रारी नोंदविल्या गेल्या आहेत. याखेरीज एकतर्फी प्रेमातून शालेय बस अडवून विद्यार्थिनीवर अॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकारही घडून गेला आहे. चालू महिन्यात पिंपळगाव (ब.) नजीकच्या चिंचखेड येथील एका विवाहितेच्या लग्नाला अवघे एक वर्षही पूर्ण झालेले नसताना संशयास्पदरीत्या तिचा मृतदेह आढळून आला. मूलबाळ होत नाही या कारणातून छळले गेल्याने नाशकातील इंदिरानगरमधील एका २४ वर्षीय विवाहितेने गळफास घेतल्याची, तर नेपाळमधून प्रेमविवाह करून आणलेल्या एका १९वर्षीय विवाहितेचा चारित्र्याच्या संशयातून खून केला गेल्याची तक्रारही पोलीस ठाण्यांमध्ये गुदरण्यात आली आहे. अशी आणखीही काही उदाहरणे देता येणारी आहेत, ज्याकडे केवळ गुन्हेगारी घटना म्हणून पाहता येऊ नये, तर त्यातून बुरसटलेल्या पुरुषी मानसिकेतेचे प्रत्यंतर यावे. स्त्रीकडे बघण्याची, तिच्या सोबतच्या वर्तनाची अहंकारी वृत्ती या घटनांतून डोकावल्याखेरीज राहात नाही.
विशेष
म्हणजे, याच आठवड्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या एका प्रकरणात एकाला जन्मठेप, तर
दुसºया प्रकरणात एकाला सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तेव्हा, कायदा
त्याचे काम चोखपणे करतोच आहे. संबंधिताना काय शिक्षा व्हायची ती होत आहे व यापुढेही
होणार आहे. पण एकूणच महिलांप्रतिची अवमानजनक किंवा अनादरयुक्त मानसिकता
बदलल्याखेरीज या अशा गुन्हेगारी घटनांना आळा बसणार नाही. नारीशक्तीचा जागर व तिच्या
सन्मानाच्या चळवळी, उपक्रमांना बळ देऊन हा बदल साकारता येणारा आहे. नवरात्रोत्सवात
या शक्तीची पूजा बांधतानाही हेच काम घडून यावे, उत्सवाचा ‘इव्हेंट’ करताना स्त्री
सन्मानाचा, आदराचा प्रेरणादायी जागरही घडून यावा, एवढेच यानिमित्ताने...
Monday, September 18, 2017
Saturday, September 16, 2017
Thursday, September 14, 2017
Editor'e View Published on 14 Sept, 2017 in Lokmat Online
पायजाम्याची नाडी शोधता येईना, आणि म्हणे...
किरण अग्रवाल
स्वप्नात हरवणे कुणाला आवडत नाही? राजा असो की रंक, प्रत्येकालाच ते आवडते. अट केवळ एकच ते स्वप्न ‘गोड’ असावे, भयावह नसावे. अर्थात, आता त्याबद्दलही भीती बाळगण्याची गरज राहिलेली नाही. कारण रात्रीच्या गाढ झोपेत स्वप्ने बघण्याऐवजी दिवसाढवळ्या जागतेपणीच ती बघता येण्याची सोय झाली आहे. शिवाय, स्वप्न कसे बघायचे, त्याचा ‘कन्टेन्ट’ काय असावा, हेदेखील आपल्यालाच निश्चित करता येऊ लागले आहे. त्यामुळे स्वप्नात रंगणे वा कल्पनाविलासात विलसणे हे प्रत्येकाच्या आवाक्यात आले आहे. मोबाइल क्रांतीने जग जसे मुठीत आणले आहे, तसे ‘सोशल मीडिया’ने स्वप्ने फुकट केली आहेत. परिणामी असंख्य नेट यूजर्स ‘लगे रहो मुन्नाभाई’प्रमाणे कुठे व कशात तरी हरवलेले राहू लागले आहेत.
उपरोक्त प्रास्ताविकाचे कारण असे की, माझा एक मित्र जो एरव्ही कायम त्याच्या त्याच्या कोशात ‘गुमनाम'सा राहात असे, तो परवापासून अगदी आनंदी दिसू लागला आहे. त्याच्या या आनंदीपणाचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी इतरांकडे चौकशी केली असता जे कळले, त्याने मलाही आनंदानुभव लाभला. त्याचे झाले असे की, फेसबुक या सोशल माध्यमाने आपल्या ‘यूजर्स’च्या मनोरंजनासाठी जे निरनिराळे फंडे अवलंबिले आहेत, त्यात आपला चेहरा कुणासारखा दिसतो, हे पाहण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. सदर माध्यम हाताळणारा कुणीही या प्रश्नाशी संबंधित ‘लिंक’वर गेला तर त्याला आपल्या चेहºयाशी साधर्म्य असणाºया मान्यवर वा सेलिब्रेटीशी तुलना केलेले दर्शविले जाते. याच प्रकारात आमच्या मित्राचा चेहरा अभिनेता हृतिक रोशनसारखा दर्शविला गेला. तेव्हा, मध्यंतरीच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवर दाखविल्या जाणाºया चंद्रकांता मालिकेतील क्रूरसिंगसारखा चेहरा असणाºयाला थेट हृतिकशी जोडले गेले म्हटल्यावर त्याच्या आनंदाला भरते येणे स्वाभाविकच होते. दुसरा एक प्रकार असा की, तुमचा प्रेमी तुम्हाला कुठे भेटेल हे जाणून घेण्यासाठी एक लिंक आली होती. त्याद्वारे ते ठिकाण जाणून घेऊन खुशीची गाजरे खात आमचा एक सहकारी आठवडाभरापासून रोज सकाळ-संध्याकाळी तेथे आपले कामधंदे टाळून स्वप्नांच्या फलश्रुतीकरिता पायपीट करतो आहे. पण अद्याप त्याला त्याचे प्रेम गवसलेले नाही. याच प्रश्नाच्या उत्तरात मुंबईतील एका तरुणीला तिचा प्रेमी सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी भेटेल असे सांगण्यात आले होते. पण दोन वर्षापासून मी त्याच परिसरात राहते, रोज मंदिरात दर्शनाला जाते; पण ‘तो’ भेटला नसल्याची खंत तिनेच सोशली व्हायरल केली आहे.
थोडक्यात, दिवसा उजेडी अशी
स्वप्ने बघून क्षणिक आनंदामागे धावण्याचे आणि करमणूक करून घेण्याचे प्रकार कमालीचे
वाढलेले दिसत आहेत. त्यात गैर अगर वावगे काही नाहीच. ‘आप पती-पत्नी में किसकी जादा
चलेंगी?’, आप उग्र हो या शांत? Which celebrity you look like?, What is your
Perfect nickname?, What will your career be like? या आणि अशा प्रश्नांची उत्तरे
जाणून घेत विरंगुळा शोधणे वेगळे. पण, असा आनंदानुभव घेताना विज्ञाननिष्ठ म्हणवणारे
व प्रत्येकच बाबीचा कार्यकारणभाव तर्काच्या कसोटीवर तपासून पाहणारेही त्यात सहभागी
होताना आणि विवेकाचे गाठोडे खुंटीवर टांगून ठेवताना दिसून येतात तेव्हा खरे आश्चर्य
वाटून जाते. ‘आपका भाग्य क्या है’ आणि ‘कौनसे राशी के आदमी से आपकी शादी होंगी’
यांसारख्या प्रश्नांची उत्तरे कुतूहलापोटी शोधणेही ठीक; पण How and When will you
Die या सारख्या प्रश्नाच्या ‘लिंक’वर जाऊन जेव्हा आपल्याच मरणाची तारीख जाणून
घेण्यासाठीही उत्सुकता दाखविली जाते, तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याखेरीज गत्यंतर
उरत नाही.
गंमत म्हणजे, याच सोशल
माध्यमावर शंभर वर्षांपूर्वी तुम्ही कोण होता, हे जाणून घेणाºया प्रश्नाच्या
लिंकवरही उड्या पडताना दिसत आहेत. खरे तर याबाबतची उत्सुकता दर्शविणे म्हणजे
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे आले. शिवाय, पुनर्जन्म स्वीकारताना शंभर वर्षांपूर्वी,
म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही मनुष्ययोनीतच होतात व यंदाही मनुष्यजन्मच लाभला, हेही
स्वीकारणे आले; जे तर्काच्या, विज्ञानाच्या वा विवेकाच्या कसोटीवर प्रमाणित ठरणारे
नाहीच. पण या प्रश्नाला अगदी ‘यूके’चे पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिलपासून ते
अब्राहम लिंकन व हिटलरपर्यंतची उत्तरे अनेकांना लाभलेली दिसून येतात. ही उत्तरे
गंमत म्हणून स्वीकारायची म्हटलीत तरी अतार्किकतेचे इतके वा असे अध:पतन व्हावे?.
माझ्या एका सहकाºयाला याच म्हणजे १०० वर्षांपूर्वी तो कोण होता या प्रश्नाच्या
उत्तरात जागतिक कीर्तीचे संशोधक अल्बर्ट आइनस्टाईन असे उत्तर लाभले. संशोधनाच्या
‘स’शी ज्याचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही, घरात वडिलांच्या पायजाम्याचा नाडा
शोधायचा तर त्याची पंचाईत होते असे त्याच्या कुटुंबीयांचेच म्हणणे; तरी तो
पूर्वजन्मीचा म्हणे अल्बर्ट आइनस्टाईन ! व्वा !! स्वप्ने ही स्वप्नेच असलीत तरी ती
किती फसवी असू शकतात, हेच यातून दिसून येणारे असले तरी; आपल्या ‘यूजर्स’ना आनंदाचे
डोही क्षणिक आनंद तरंग अनुभवण्याची संधी यातून मिळवून दिली जाते आहे, हे मात्र
नक्की !
Subscribe to:
Posts (Atom)