Kiran Agrawal
At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, August 6, 2026
Saraunsh in Jalgaon Lokmat on 02 August, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260802_4_1&fbclid=IwY2xjawThT9BwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeMqKmcvgYbo3nFMi5YmR2AiYNlLbA73PwL0fsAT_ouR10-Owe24JpBfoDSg8_aem_AzZwd7ynQIhCrkoYwqlXGg
नंदुरबार 'लोकमत'चा वर्धापन दिन 2026
30 July, 2026
नंदुरबार 'लोकमत'चा वर्धापन दिन...
लोकमतच्या नंदुरबार विभागीय कार्यालयाचा 29वा वर्धापनदिन सोहळा नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी 'तीन दशकातील नंदुरबार' या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाची पताका फडकविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
****
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा आमदार चंद्रकांत भैय्या रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, काँग्रेसचे नेते राजेंद्रकुमार गावित, शहादा नगराध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ऍड संजय पुराणिक, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
नंदुरबार लोकमतचे हॅलो हेड रमाकांत पाटील, सहकारी मनोज शेलार, भूषण रामराजे, सायसिंग पाडवी व जिल्ह्यातील वार्ताहर बंधूंनी यासाठी परिश्रम घेतले.
लोकमतवर प्रेम करणाऱ्या नंदुरबारकर वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद ! Kiran Agrawal
#LokmatNandurbar #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 26 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260726_4_1&fbclid=IwY2xjawThTGBwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEemaEfAthk8Mh1RUGeJfiW0Qk7O_5KOG3yC8Us-5RnYSD71eLMRPAwpsH0xMk_aem_nq9VtstgQLJmVjV5PzGL8A
Saraunsh in Jalgaon Lokmat on 19 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260719_4_1&fbclid=IwY2xjawThS9NwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEewoJNT_xiwSXTCYwVuR5rKlOY5grvxHaEaxn1_Bn0d2d1CCcg3saQlDgD5iQ_aem_svoPtgownsCVRKQOI2ImnQ
Lokmat Principals Meet 2026
08 July, 2026
Lokmat Principals Meet 2026
शिक्षणाचे प्रवाह कितीही बदलले किंवा गुगल व एआय गुरुचे तंत्र त्यात अवलंबिले गेले तरी माणसातला माणूस घडवण्याची / त्यात संवेदना जागवण्याची प्रक्रिया गुरुजींनाच पार पाडावी लागणार आहे...
नवीन शैक्षणिक पर्वाच्या प्रारंभानिमित्त लोकमत कॅम्पस क्लब तर्फे आयोजित 'प्रिन्सिपॉल्स मिट 2026' मध्ये विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधता आला.
माजी खासदार व गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी व्यासपीठावर समवेत होते Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatCampusClub #LokmatPrincipalsMeet #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 12 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260712_2_2&fbclid=IwY2xjawThSk9wZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeh7hm58-mg09Knif0Wx8BBmqx3h8Xltb-5u_05NKymLjExWEZZ7L66q33NCE_aem_oU8VhClr5yDwqm3wBT0_EA
लोकमत भारत रत्नमाला योजनेस उस्फुर्त प्रतिसाद ..
07 July, 2026
लोकमत भारत रत्नमाला योजनेस उस्फुर्त प्रतिसाद ..
हल्ली मुले पुस्तकांऐवजी मोबाईलमध्ये अडकून बसल्याची पालकांची तक्रार आहे. ते खरेही आहे.
स्वाभाविकच 'व्हाट्सअप यूनिवर्सिटी' मध्ये जे येते तेच ज्ञान समजून त्यांची घडणूक होत आहे. हे टाळून आपला इतिहास, संस्कृती काय; आपले राष्ट्रपुरुष, आदर्श कोण? त्यांच्या कर्तृत्व आणि कार्याचा वारसा कोवळ्या मुलांच्या मनात बिंबवण्यासाठी व त्यांना मोबाईलमधून बाहेर पडून वाचनाची गोडी लागावी याकरिता लोकमतने 'भारत रत्नमाला' नामक योजना आणली आहे.
अमळनेर तालुक्यातील मारवडच्या सु. ही. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय येथे या लोकमत भारत रत्नमाला उपक्रमानिमित्त नुकतीच भेट दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांशी यानिमित्त संवाद साधता आला. या योजनेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
लोकमतचे एडिटर इन चीफ मा. श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणूनही प्रभावीपणे जबाबदारी निभावली आहे. एकूणच शिक्षणाबाबत त्यांच्या मनात असलेल्या आत्मीयता व सजगतेतून मुलांचे भविष्य घडवण्याबाबत ते नेहमीच आग्रही असतात. बाल्यावस्थेतील पिढीवर संस्कार घडवण्याबाबतची त्यांची संवेदनशीलता आमच्यासाठी प्रेरणा ठरत आली आहे. त्याच अनुषंगाने इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरता लोकमतमध्ये 'भारत रत्नमाला' ही विशेष मालिका सुरू करण्यात आली असून, यामध्ये भारतरत्न व पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री यासारख्या सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख करून दिली जात आहे. ज्ञान व मनोरंजनासोबतच बक्षिसे जिंकण्याची संधीही या विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यानिमित्ताने मुलांनी पुस्तकांकडे व वाचनाकडे वळावे हाच यामागील हेतू आहे.
लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, वितरण विभागाचे उप व्यवस्थापक राजेश सूर्यवंशी यावेळी समवेत होते. मारवडचे वार्ताहर डी. व्ही. पाटील यांच्या पुढाकारामुळे हा योग घडून आला.
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmarBharatRatnamala #KiranAgrawalLokmatJalgaon
Subscribe to:
Posts (Atom)
















