At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, November 27, 2017
Saturday, November 25, 2017
Thursday, November 23, 2017
Editors view published in Online Lokmat on 23 Nov, 2017
मृत्यूचे उत्सवीकरण!
किरण अग्रवाल
मृत्यू जर अटळ आहे तर त्याचे भय काय बाळगायचे? हा तसा साधा प्रश्न. हिमालयात साधना करणाºया साधूपासून ते आपल्याकडील गल्लीबोळातील भगवे कपडेधाºयापर्यंत व ज्ञानीपासून ते अज्ञानीपर्यंत, सर्वांकडून उपदेशीला जाणारा. तरी मृत्यू नकोसा वाटतो, कारण अटळतेला स्वीकारायची कुणाची तयारी नाही. मृत्यूपाठोपाठ इतरेजनांवर ओढवणारा शोकही आपसूकच नकोसा ठरणारा. म्हणूनच, मृत्यूपश्चात शोकाऐवजी उत्सव साजरा करणारे जेव्हा दिसून येतात तेव्हा त्यांच्यातील निर्मोहित्त्वाला दाद देणे क्रमप्राप्त ठरून जाते.
मरण हे कुणाचेही असो, दु:खदच असते. तरी दीर्घायू राहिलेल्या व सुखा-समाधानाने गेलेल्या व्यक्तीसाठी तिच्या अंत्ययात्रेत भजनी मंडळाला पाचारण करण्याची प्रथा आहे. भजनाच्या घोषात दु:ख वा शोक हलका होण्याची भावना तर असतेच, शिवाय जाणाºयाला दिल्या जाणाºया निरोपाचे ते एकप्रकारचे उत्सवीकरणही असते. मृत्यूपश्चातच्या शोकात मोडकळून पडण्याऐवजी त्यातले सत्य स्वीकारण्याची शक्ती लाभावी म्हणून दशक्रिया विधीच्या दिनी प्रवचनही ठेवले जाते. दशक्रिया किंवा संबंधित विधीवरून सध्या सुरू असलेला वाद-विरोध हा भाग वेगळा; परंतु यानिमित्तच्या प्रवचनात थोरांचे, संतांचे यासंदर्भातले दाखले देत जीवनाचे क्षणभंगूरत्व मांडले जाते. जीव-जगत काय, हे सांगतानाच पंचत्वाचे निरूपण यात केले जाते. जे ज्या मातीतून निर्माण झाले आहे, ते त्या मातीतच मिळणार, असा भावगर्भ आशय त्यामागे असतो. त्याची एक वेगळी फिलॉसॉफी आहे. ती सहज संदर्भाने या माध्यमातून मांडली जाते. ती ‘फिलॉसॉफी’ कोणती, तर
‘‘मरताना ज्याच्या राम आला मुखे, धन्य त्याचा सुखा, पार नाही!’’
या संतवचनाचा अर्थ असा की, ज्याने आयुष्य सदाचरणात घालविले असेल तो सुखाने जाईल, त्याची इहलोकीची यात्रा सुफळ ठरेल. पं. जवाहरलाल नेहरू यांनीही मृत्यूबद्दल सांगितलेली एक वेगळी बाब येथे उद्धृत करता येणारी आहे. ‘मृत्यूने नवे जीवन मिळते. जो मृत्यूला मानत नाही किंवा स्वीकारत नाही, त्याला जगणेसुद्धा समजत नाही’, असे नेहरू म्हणत. खूप मोठा आशय व तत्त्वज्ञञान या विचारधनात सामावलेले आहे. या साºयाची चर्चा येथे कशासाठी, तर गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील नोएडात हरिभाई लालवाणीनामक व्यक्तीची अंत्ययात्रा बॅण्डबाजा लावून काढण्यात आली व त्यात त्याच्या मुली डान्स करीत सहभागी झाल्याचे वाचावयास मिळाले म्हणून. लालवाणी यांच्या इच्छेनुरूप हे असे केले गेले; परंतु मृत्यूचे हे उत्सवीकरण खरेच सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी घडविणारेच म्हणता यावे. या संदर्भात प्रख्यात हास्यकवी काका हाथरसी यांचेही उदाहरण देता यावे. आयुष्य लोकांना हसविण्यात वेचलेल्या या कवीने आपल्या निधनानंतर चितेच्या साक्षीने हास्यकवी संमेलन घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती; त्यानुसार ते घेतले गेले होते म्हणे.
विशेष म्हणजे, आपल्याकडे मृत्यूचा असा उत्सव करण्याचे प्रकार चर्चित ठरत असतानाच या उत्सवाची प्रथा जपून त्याबद्दल कमालीची संवेदना जपणाºया एका समुदायाची माहितीही समोर आली आहे. इंडोनेशियाच्या साऊथ सुलावेसी प्रांतातील टोराजा समुदायात ही मृत्यूच्या उत्सवाची प्रथा आहे. या समुदायातील लोक मृत्यूपश्चात आनंदोत्सव तर साजरा करतातच; पण मृतदेहासोबत फोटोही काढतात व एका विशिष्ट रसायनाच्या लेपनाने तो मृतदेह जपूनदेखील ठेवतात. व्यक्ती कधीही मृत्युमुखी पडत नसते, अशी त्यांची त्यामागील श्रद्धा व धारणा आहे. ऐकावे ते नवल, या प्रकारात मोडणारीच ही बाब म्हणायला हवी. पण आहे तिथे तशी प्रथा. शेवटी श्रद्धेला कसा व कोण धक्का लावू शकेल? इजिप्तमध्ये ‘ममीज’ आहेत, तसेच हे म्हणायचे. इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व २००० काळातील देह ‘ममीफिकेशन’ करून जपून ठेवले गेले आहेत. त्याची स्वतंत्र ‘व्हॅलीज आॅफ किंग्ज्’ तेथे असून, जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे व उत्सुकतेचे ते एक केंद्र ठरले आहे.
थोडक्यात काय तर, मृत्यू हा जीवनाचा अंतिम पडाव असून, त्याबाबतची अपरिहार्यता स्वीकारता आली पाहिजे. जे भल्याभल्यांना जमत नाही. मृत्यूनंतरचा शोक स्वाभाविक असला तरी, गीतोदेशाप्रमाणे कोण काय घेऊन आले, की काय घेऊन जाता येणार आहे? मग असे असेल तर शोक तरी कशाचा करायचा? येथे याच संदर्भाने प्रख्यात कव्वाल अजिज नाझा यांच्या अतिशय गाजलेल्या रचनेचा उल्लेख करता येणारा आहे. ‘चढता सूरज धिरे धिरे ढलता है ढल जायेगा...’मधील ‘खाली हाथ आया है, खाली हाथ जायेंगा’चे वास्तव स्वीकारण्याचा हा विषय आहे. हे रिकाम्या हाती जाणे निर्मोहत्त्वाशी संबंध साधणारे आहे. जगण्यातील कसल्याही सुखाशी, इच्छा-आकाक्षांशी मोह न ठेवणारी व्यक्तीच या अवस्थेपर्यंत पोहोचू शकते. देहाची नश्चरता स्वीकारणे त्यातूनच शक्य होते. नोएडातील लालवाणी कुटुंबातील कन्यांनी तेच सत््य स्वीकारले म्हणायचे.

Tuesday, November 21, 2017
Thursday, November 16, 2017
Editor's view published in Online lokmat on 16 Nov, 2017
आजार साखरेचा वाढला, पण गोडवा का घटला?
किरण अग्रवाल
साखरेचे खाणार त्याला देव देणार असे आजवर आपण म्हणत आलो असलो तरी आता तसे म्हणणे धोक्याचे ठरले आहे कारण साखरेच्या आजाराने देशात ब-यापैकी हातपाय पसरले असून, त्यामुळे आरोग्याची चिंता करण्याची वेळ आली आहे. अर्थात, एकीकडे साखरेचा म्हणजे मधुमेहाचा आजार व रुग्ण बळावत असताना समाजाच्या मौखिक व्यवहारातील वा वर्तनातील गोडवा मात्र कमालीचा घसरत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यक व समाजशास्त्रींकडून या दोन्ही पातळीवर चिंतन केले जाणे गरजेचे ठरले आहे.
भारतात साखरेच्या आजाराने उच्छाद मांडल्याचे चित्र असून, सन २०२५ पर्यंत आपला देश मधुमेहाच्या राजधानीचे स्थान प्राप्त करेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तविला आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी मधुमेह दिन पाळला गेला. त्यानिमित्त उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, जगात सुमारे ४२ कोटी मधुमेहाचे रुग्ण असून, त्यापैकी एकट्या भारतात सर्वाधिक साडेसहा कोटींपेक्षा अधिक रुग्ण आहेत. म्हणजे आजच आपला देश यात अव्वल आहे. डॉक्टरांकडे प्रकृतीची तक्रार घेऊन जाणा-यांपैकी चौथा रुग्ण हा मधुमेहाचा असतो, अशीही एक आकडेवारी समोर आली आहे. ‘असोचेम’ या प्रथितयश संस्थेने मागे केलेल्या एका सर्वेक्षणातही याबाबतची चिंतादायक स्थिती आढळून आली होती. २०३५ पर्यंत मधुमेहींची संख्या आजच्यापेक्षा दुप्पट म्हणजे अंदाजे साडेबारा कोटींपर्यंत पोहोचण्याचा धोका या सर्वेक्षणाअंती निदर्शनास आणून देण्यात आला होता. ही सारी आकडेवारी ‘साखरे’च्या आजाराशी संबंधित असून, वैद्यकशास्त्रानुसार शरीरातील साखर कमी वा जास्त होणे या दोन्ही प्रकाराने आरोग्यास धोका उत्पन्न होणारा आहे. त्यामुळेच साखरेचा आजार वाढत असला तरी बोलण्यातला गोडवा का कमी होत चालला आहे, असा भाबडा प्रश्न उपस्थित व्हावा.
तसे पाहता गोडाने गोड व कडू खाल्ल्याने कडवटपणाचा प्रत्यय येत असल्याचे आपले आहार वा स्वभावशास्त्र सांगते. मधुर, आम्ल व लवण हे सत्त्वगुणात, तर कडू, तुरट, तिखट हे तामसी-तमोगुणात मोडणारे रसप्रकार आहेत. आहारातील शाकाहार व मांसाहारावरून स्वभावगुणांची अगर वर्तनाची चिकित्सा केली जाते ती त्यातूनच. परंतु आहारातील साखर कमी किंवा जास्त झाली तरी आरोग्याला जशी बाधा होते, तसा स्वभावावर का परिणाम होऊ नये; हा यातील मूळ प्रश्न आहे. याबाबत नाशकातील प्रख्यात आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य विक्रांत जाधव यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी साखर ही मधुर रसाची शरीरपोषक सत्त्वगुणातील बाब असली तरी तिचे अतिरेकी सेवन आरोग्यास घातक असल्याचेच सांगितले. हल्ली नैसर्गिक गोडापेक्षा रस्त्यावरील मिठाई किंवा आइस्क्रीमसारख्या पदार्थातील अनैसर्गिक साखरेचे सेवन अधिक होऊ लागल्यामुळेही मधुमेह विकाराला निमंत्रण मिळू लागल्याकडे वैद्य जाधव यांनी लक्ष वेधले. मधुमेहविकारतज्ज्ञ डॉ. समीर पेखळे यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पौष्टिकतेपासून दूर होत पाश्चात्त्य खाद्यपदार्थांकडे वाढलेला कल व व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहींची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले. ज्येष्ठ व्यक्तींखेरीज तरुण पिढीही या विकाराला बळी पडत असल्याबद्दलची चिंता डॉ. पेखळे यांनी व्यक्त केली आणि यापासून दूर राहण्यासाठी तणावमुक्त दिनचर्या व व्यायामाची निकड प्रतिपादिली. मात्र आरोग्यावर परिणाम करणारी साखर स्वभावावर का परिणाम करीत नाही, यावर दोघा तज्ज्ञांचे ‘स्वभावाला औषध नाही’ हेच एकमत दिसून आले.
समाजव्यवस्थेच्या अंगाने या विषयाकडे पाहता, परिवारातली विभक्तता आज वाढलेली दिसून येते. नोकरी वा व्यापारानिमित्त तरुण पिढी गावातून शहराकडे धावते आहे. ज्येष्ठांचे त्यांना ओझे वाटू लागल्याने त्यातून विभक्तता ओढवते आहे. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धतीत निचरा होणाºया कसल्याही ताण-तणावाची पिढीजात व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. शिवाय, प्रत्येकजण आज धावतो आहे. या धावण्यातून वेळेची कमतरता उद्भवत असून, त्यात नोकरी करणा-या गृहस्वामीनींची भर पडल्याने घरी स्वयंपाक करण्याऐवजी पिझ्झा-बर्गरवर निभावण्याची सवय अनेकांना जडतांना दिसत आहे. विभक्ततेमुळे ओढवलेली संवादहीनता, एकटेपणामुळे येणारे ताण-तणाव, खाण्यातील जंकफूडचे वाढते प्रमाण व अशात व्यायामाचा अभाव; याच्या एकत्रित परिणामातून साखर आपला ‘गुण’ दाखवत असल्याचा निष्कर्ष काढता येणारा आहे. आजारात वाढलेली साखर स्वभावात का वाढत नाही, त्याला अशी अनेकविध कारणे देता यावीत. त्यामुळे समाजस्वास्थ्य कसे सुधारता येईल यादृष्टीनेही प्रयत्न केला गेल्यास शरीरातील व आहारातील साखर तर नियंत्रणात राहीलच, शिवाय व्यवहार व विहारातही त्या साखरेचा गोडवा दिसून येऊ शकेल.

Monday, November 13, 2017
Saturday, November 11, 2017
Thursday, November 9, 2017
Editors view published in Online Lokmat on 09 Nov, 2017
चेहरा वाचता येणे गरजेचे !
किरण अग्रवाल
चेहरा वाचता येतो, असे नेहमी म्हटले जाते. बव्हंशी ते खरेही असते. कारण चेहरा कसाही असो, त्यावरील भाव बरेच काही बोलून जाणारे असतात. आपापल्या आकलनानुसार ते भाव समजणे अगर जाणता येणे म्हणजेच चेहरा वाचता येणे. चेहरा व त्यावरील किंवा त्यामागील मुखवटा ओळखणे त्यामुळेच तर शक्य होते. पण हे चेहरा वाचन सर्वांनाच जमते असे नाही. जेव्हा ते जमत नाही किंवा चेहरा वाचता येत नाही, तेव्हा ठोकर खाणे स्वाभाविक ठरते. चेहºयांचे पुस्तक, म्हणजे ‘फेसबुक’च्या माध्यमातून ओळख-परिचय घडून आलेल्यांमध्ये फसवणुकीचे, गंडवणुकीचे वा बदनामी केल्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत ते त्यामुळेच. सोशल माध्यमांवरचे मित्र कितीही सज्ञान वा उच्चशिक्षित असले तरी, ते या चेहरे वाचनात अपयशीच ठरत असल्याचे या घटनांतून अधोरेखित होणारे आहे.
भ्रमणध्वनी व सोशल माध्यमांनी जग जवळच नव्हे तर मुठीत आणले आहे हे खरे, त्यातून माणूस नको तितका ‘सोशल’ झाला. अगदी गावातली किंवा गावाजवळचीच नव्हेे तर दूरदेशीची, दुरान्वयानेही कधी काही संपर्क-संबंध नसलेली व्यक्तीही फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर परस्परांशी मैत्रीचे आवतण देण्यास व आलेले निमंत्रण स्वीकारण्यास आसुसलेली दिसून येते. खरा आहे की खोटा, याची फारशी फिकीर न बाळगता किंवा खात्री करून घेण्याच्या भानगडीत न पडता स्क्रीनवरचा चेहरा पाहून या माध्यमांवर अनेकांची मैत्री जुळते. मैत्रीतून ओळख, संपर्क, भेटीगाठी असे एकेक टप्पे ओलांडत विश्वासाची पातळी जेव्हा गाठली जाते, तेव्हा काहींचे हे मैत्रीचे बंध नात्यांमध्ये परिवर्तित होतात. काही जण त्यातून उद्योग-व्यवसायाच्या, भागीदारीच्या संधी शोधतात. यात ‘स्क्रीन’च्या माध्यमातून पुढे आलेला चेहरा नीट वाचता आला तर चांगले काही घडते. ‘फेसबुक, व्हॉट्सअॅपवर मैत्री जुळली अन् नंतर जुळल्या रेशीमगाठी’, सोशल माध्यमामुळे लाभला आधाराचा हात; यासारखे प्रकार त्यामुळे वाचावयास मिळतात. परंतु चेहरा वाचता आला नाही तर फसवणूकही घडून आल्याखेरीज राहात नाही. शिवाय काही प्रकरणांत बदनामीस सामोरे जावे लागून मनस्ताप सहन करण्याची वेळ येते. आता अशा सोशल माध्यमांद्वारे ओळख वाढवून गंडविले गेल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने या माध्यमांचा वापर सावधपणे केला जाणे गरजेचे ठरून गेले आहे.
हल्ली ‘कॅशलेस’ व्यवहार वाढविण्यासाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे तांत्रिक पद्धतीने किंवा आॅनलाइन फसवणुकीचे प्रकार घडून येऊ लागले आहेत. मुंबई, पुणेपाठोपाठ नाशकातही अशा स्वरूपाच्या घटना वरचेवर घडू लागल्याने खास ‘सायबर पोलीस ठाणे’ स्थापले गेले आहेत. यातच आता फेसबुक फ्रेंडशिप व चॅटिंगच्या माध्यमातून जवळीकता साधत फूस लावण्याचे व गंडविण्याचे प्रकार समोर येत आहेत. देशातील सायबर गुन्ह््यात महाराष्ट्र अव्वल असून, ‘सायबर दहशतवादा’चेही प्रकार येथे घडू लागले आहेत. नाशकातले उदाहरण घ्या, येथे सायबर पोलीस ठाणे सुरू झाल्यानंतर मे २०१७ पासून आतापर्यंत, म्हणजे ६ महिन्यात असे ३१ गुन्हे नोंदविले गेले असून, यात फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून फसवणूक व बदनामी केली गेल्याच्या १० गुन्ह्यांचा समावेश आहे. कॅन्सरसाठी औषध देतो असे सांगून फेसबुक फ्रेण्ड्सची सहानुभूती मिळवणाºया व नंतर त्यांच्याकडून पैसे उकळणाºया एका नायजेरीयन तरुणास मागे अटक केली गेली होती, तर व्हॉट्सअॅपवर संपर्क वाढवून अश्लील संदेश पाठविणाºयास राजस्थानातून पकडून आणले होते. आता एका टीव्ही मालिकेत काम करणाºया अभिनेत्रीशी फेसबुकवरून ओळख वाढवून, ब्रिटनमध्ये हॉटेल सुरू करण्याचे आमिष दाखवत ठाणे येथील एका तरुणाने सुमारे अडीच लाख रुपयांस तिला लुबाडल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अर्थात, हे प्रकार यापुढील काळातही वाढणारच आहेत. कारण इंटरनेटवर टाइमपास करणाºयांची संख्या ४५ कोटींपेक्षा अधिक असून, २०२१ पर्यंत ती सुमारे ८० कोटींहून अधिक होण्याचा अंदाज न्यूज १८ लोकमत वृत्तवाहिनीने अलीकडेच वर्तविला आहे. त्यातून सायबर क्राइम वाढणे अगदी स्वाभाविक आहे. तेव्हा, प्रश्न आहे तो चेहरा वाचता येण्याचा. आपण परिचयातल्या, नातेसंबंधातल्या व प्रसंगी घरातल्या व्यक्तींशी तुसडेपणाने किंवा त्रयस्थपणे वागतो आणि अनोळखींशी मात्र मैत्री वाढवतो. अशा मैत्रीत चेहरा वाचता येत नसेल तर धोका अगर अपघात टाळता येणे शक्यच नसते. ‘आ बैल मुझे मार’ या प्रकारात बसणारेच आहे हे सारे. पण, हे लक्षात घेणार कोण? त्यासाठी शासनाच्या चावडी वाचन योजनेप्रमाणे चेहरा वाचन कार्यक्रम राबविण्याची किंवा तसे प्रशिक्षण देण्याची गरज भासावी इतके हे प्रमाण वाढू पाहते आहे. तेव्हा सावधानता बाळगलेलीच बरी !

Monday, November 6, 2017
Thursday, November 2, 2017
Editor's view published in Lokmat Online on 02 Nov, 2017
भाजपातील ‘त्यागी’ कोण?
किरण अग्रवाल
भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचविणारे सत्तेबाहेर आहेत, पक्षातील निष्ठावानांना कोणीही विचारत नसल्याने ते अडगळीत पडले आहेत; हे जे काही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे ते खरे असेलही. त्यातून राज्यातील भाजपा सरकारचे तीन वर्षांचे प्रगतीपुस्तक तपासले जात असताना खºया त्यागींचे काय, असा प्रश्नदेखील नक्कीच उपस्थित करता येणारा आहे, परंतु तो करताना ‘त्यागा’ची व्याख्या वा संकल्पनेची स्पष्टता होऊन गेली असती तर अधिक बरे झाले असते, कारण त्याखेरीज सत्ता अगर संघटनेच्या कसल्याही लाभापासून वंचित राहिलेल्या व सारे काही मिळून, उपभोगूनही स्वत:ची गणना त्यागींच्या यादीत करू पाहणार्यामध्ये भेद करता येणे शक्य नाही.
पुण्यातील भोसरी येथील जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण पुढे आल्यानंतर भाजपा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य एकनाथ खडसे यांना घरी बसणे भाग पडले आहे. सदर प्रकरणाच्या व आरोपाच्या निमित्ताने उगाच आपला बळी घेतला गेल्याची त्यांची भावना असल्याने तेव्हापासून संधी मिळेल तिथे खडसे यासंबंधीची मळमळ व्यक्त करीत स्वपक्षालाच ‘घरचे अहेर’ देताना दिसून येतात. याच मालिकेत धुळे येथील एका कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या पुढ्यात बोलतानाही त्यांनी भाजपातील निष्ठावानांप्रतीची आपली ‘तळमळ’ बोलून दाखविली. यावेळी पक्षासोबत येऊ घातलेल्या नारायण राणे यांना ‘त्यागी’ संबोधत भाजपातील त्यागींकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे खडसे यांनी लक्ष वेधलेच, शिवाय आपल्यासारख्या व आणीबाणीत यातना भोगणार्या कार्यकर्त्यांची भूमिका आता केवळ प्रशिक्षकाचीच राहणार असल्याचे सांगत स्वत:च स्वत:ला त्यागींच्या यादीत घुसवून घेण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केला. त्यामुळेच खडसे यांना अपेक्षित त्यागाची व्याख्या स्पष्ट होणे गरजेचे ठरून गेले आहे.
खडसे जे काही म्हणाले ते खरे असेलही, नव्हे आहेदेखील. विशेषत: राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचे प्रगतीपुस्तक पाहिले जात असताना आणि राज्यातील विकास कुठे नेऊन ठेवल्याचा हिशेब मांडला जात असताना सत्ताधारी पक्षाशी संबंधित ही भळभळणारी जखम पुढे आणली गेल्याने त्याकडेही गांभीर्याने बघितले जायलाच हवे. परंतु मुद्दा व प्रश्न आहे तो, पक्षासाठी त्याग करून आजच्या पक्षाच्याच ‘अच्छे दिन’च्या काळात संधीपासून वंचित राहिलेल्यांना त्यागी मानायचे की सारे काही मिळवून आज काही कारणाने बाजूला ठेवले गेलेल्यांना? खडसे हे या विषयाचे कारक ठरले असले तरी ते स्वत: यातील दुसर्या प्रवर्गात मोडणारे आहेत हे येथे आवर्जून लक्षात घ्यायला हवे. खडसे यांनी भाजपासाठी खस्ता खाल्या वगैरे सारे खरे मानता येईल, त्यापोटी त्यांना पूर्वीच्या युती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले होते. तद्नंतर विरोधी पक्षनेतेपद त्यांना देण्यात आले. शिवाय विद्यमान सरकारच्या प्रारंभीच्या काळातही त्यांना महत्त्वाचे खाते दिले गेले होते. याहीखेरीज स्नुषेच्या निमित्ताने खासदारकी व पत्नीच्या निमित्ताने महानंदचे अध्यक्षपद त्यांच्याच घरात आहे. जिल्हा बँकेपासून अन्य संस्थाही तशा त्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत. हे सारे तसे त्यांना भरभरून मिळाल्याची पावती देणारे आहे. त्यामुळे आज गैरव्यवहाराच्या कारणामुळे त्यांना बाजूला ठेवावे लागले असेल तर ते त्यांच्या त्यागाच्या संकल्पनेत मोडावे का, हा यातील खरा प्रश्न आहे. खडसेंच्याच जिल्ह्यातील गुणवंत सरोदे हे एक नेते आहेत, जे आमदार व खासदारही राहिले, परंतु आज बाजूला पडल्यासारखे आहेत. लगतच्या नाशिक जिल्ह्यातील प्रतापराव सोनवणे आहेत, तेही आमदार व खासदार राहिले पण आज पक्षात कुणी विचारेनासे झाले आहेत. पण या दोघांच्याही प्रकृतीच्या कारणाने त्यांची ही अवस्था ओढवली आहे. खडसेंचे तसे नाही. मग त्यागी म्हणायचे कुणाला?
विशेष म्हणजे, खडसे हे भाजपात ज्येष्ठ असले तरी मुळात तसे काँग्रेसमधून आलेले आहेत. परंतु अभाविप या विद्यार्थी संघटनेपासून ते पक्षाची मातृसंस्था म्हणविणाºया संघ व जनसंघापासून भाजपाशी निष्ठेने नाळ जोडून असलेले अनेकजण नक्कीच आहेत की, जे भाजपाच्या आजच्या सत्ताकाळात संधीपासून दूर आहेत. त्यांची दखल ना पक्ष संघटनेत घेतली जाताना दिसते ना सत्तेत. जळगावचे गजानन जोशी, मालेगावचे प्रल्हाद शर्मा, नाशिकचे रामभाऊ जानोरकर, किसनराव विधाते, परशुराम दळवी, ताई कुलकर्णी, अकोल्यातील बंडू पंचभाई अशी अन्य ठिकाणचीही अनेक नावे देता येणारी आहेत की, ज्यांनी खरेच पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षासाठी मोठे योगदान दिले. पण आज कुठे आहेत ते, असा प्रश्नच पडावा. खडसे यांच्या जळगाव शेजारील धुळे-नंदुरबार जिल्ह्यात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यासह माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी आमदार अनिल गोटे आदी नेते अलीकडच्या काळात भाजपात आले आणि संधी घेते झाले. पण डॉ. सुहास नटावदकर सारखे लोक आजही आहे तेथेच राहिल्याचे दिसून येतात. अर्थात पक्षासाठी लढलेली व आज सत्ताकाळात घरात बसून असलेली ही मंडळी स्वत:ला त्यागी म्हणून घेत नाही. आपण सत्तेपासून वंचित असल्याचे दु:खही त्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. पण अशांकडे भाजपाचे दुर्लक्ष झाले आहे किंवा ते अडगळीत पडल्यासारखी त्यांच्या समर्थकांची भावना आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी धुळे येथे बोलताना जी भावना व्यक्त केली ती सत्य असली तरी त्यातील पूर्ण व अर्धसत्य काय, हे त्यागाची व्याख्या स्पष्ट झाल्याखेरीज समजता येऊ नये.

Subscribe to:
Posts (Atom)