Wednesday, June 14, 2023

अकोला 'लोकमत'ची पंचविशी...

June 10, 2023 अकोला 'लोकमत'ची पंचविशी...
कोणतीही संस्था वा आस्थापनेसाठी 25 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण होणे ही मोठी बाब असते. एकूण वाटचालीतील दशकपूर्ती नंतरचा तो एक आश्वासक टप्पा म्हटला जातो. लोकमत अकोला आवृत्तीने हाच टप्पा यावर्षी पार केला. तारखेनुसार 16 मार्च 2023 रोजी येथल्या वाटचालीला 25 वर्ष पूर्ण झाले. अतिशय वर्धिष्णु व यशस्वी राहिलेल्या या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीचा आनंद सोहळा दि. 10 जून रोजी मा. राज्यपाल महोदय श्री. रमेश बैस जी, राज्याचे कृषी मंत्री श्री अब्दुल सत्तार जी, लोकमतचे कुटुंब प्रमुख श्री विजयबाबूजी दर्डा व श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, समूह संपादक श्री विजय बाविस्कर जी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी दिलेली 'पत्रकारिता परमो धर्मा'ची शिकवण घेऊन लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी वऱ्हाडच्या मातीत, राजराजेश्वर नगरी अकोल्यात लोकमतची रुजुवात केली. सर्वश्री देवेंद्र दर्डा, ऋषी दर्डा व करण दर्डा या नव्या पिढीच्या नेतृत्वकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे व त्यांनी राबविलेल्या नवनवीन संकल्पनांमुळे यशाची शिखरे ओलांडत आज अकोला आवृत्तीही वाचकप्रिय ठरली आहे. नाशिक आवृत्तीचा रौप्य महोत्सव करून अकोल्यात कार्यकारी संपादक म्हणून आल्यावर तेथील रौप्यमहोत्सवी योगही माझ्या वाट्यास यावा हा माझ्यासाठी सन्मानाचा, भाग्याचा व अभिमानाचाच क्षण आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहोळ्याच्या निमित्ताने मायबाप वाचक परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद ...
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment