Tuesday, February 7, 2023

वंचितांच्या चेहऱ्यावरील आनंद...

FEB. 02, 2023 वंचितांच्या चेहऱ्यावरील आनंद...
रोजी रोटीच्या झगड्यात पोट पाठीवर घेऊन फिरणाऱ्यांच्या मुलांचे कपड्याचे लाड कोण पुरवणार? म्हणून लोकमत मधील सहकाऱ्यांनी प्रत्येकी एक एक नवीन ड्रेस व घरातील वापरण्यायोग्य काही कपडे घेऊन गीता नगरच्या श्री रामदेव बाबा मंदिरा लगतच्या केरसुणी विक्रेत्यांच्या पालावर भेट दिली. छत्तीसगड मधून मजल दरमजल करीत आलेल्या 20 ते 22 कुटुंबीयांची ही वस्ती. पालावरच्या वस्तीत महिलांनी केरसुण्या करायच्या आणि पुरुषांनी गावात जाऊन त्या विकायच्या, असा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय. पोटापाण्याचा जेमतेम जुगाड. त्यामुळे नवनवीन भरपूर कपडे पाहून या वस्तीवरील मुलांच्या चेहऱ्यावर झळकलेला आनंद काही औरच होता. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सदर उपक्रम आयोजिण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम शिंदे व त्यांचे स्वराज्य फौंडेशन यांचेही यासाठी मोठे सहकार्य लाभले.
याचसोबत लोकमत व अकोला ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरही आयोजिण्यात आले होते. याप्रसंगी अकोला ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. #LokmatAkola #JawaharlalDardaBirthCentury #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment