19 Oct, 2020
फिरुनी पुन्हा जन्मलो मी...
सिटीकेअरचे माझे फॅमिली डॉक्टर समीर पेखळे, या माणसाच्या बोलण्यात, बघण्यातच काय चमत्कार आहे कोण जाणे; त्यांच्याशी एकदा बोललो व त्यांच्यावर सोपवलं की माझं काम तिथं संपत. दिवस, रात्र न पाहता त्यांनी बारकाईने लक्ष पुरविले, देवत्व लाभलेली ही अशी माणसचं समाजाचं संचित आहेत. SNBT चे डॉ दिलीप गरुड, सांगलीतील हेमॅटोअंकॉलॉजिस्ट डॉ संदीप नेमाणी, सुरतमधील अंकॉलॉजिस्ट डॉ निलेश महाले, डॉ कांचन महाले, दातार जेनेरीकच्या मंजिरी शेख, सिटीकेअर पॅथॉलॉजीचे राजन साळवे... अशी किती नाव घेऊ की जी रात्र रात्र जागलीत, धावलीत माझ्यासाठी.
पुण्यात डॉक्टर असलेली माझी मेहुणी, डॉ अर्चना तर केवळ मी एकच पेशंट तिच्याकडे असल्यासारखे कायम संपर्कात राहिली.
महत्वाचे म्हणजे, वृत्तपत्रांसाठी तर हा अतिशय कसोटीचा काळ, पण आमच्या लोकमत समूहाचे चेअरमन आदरणीय श्री विजय बाबूजींचे आशीर्वाद पाठीशी होते. एडिटर इन चीफ, आदरणीय श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांनीही वेळोवेळी फोन करून हिम्मत दिली. संपादकीय संचालक श्री करण बाबू, समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर, सहा उपाध्यक्ष श्री चांडक सर कायम सकारात्मकता पेरत राहिले. बाविस्कर साहेब तर सातत्याने प्रकृतीचा आढावा घेत होते, धीर देत होते. मी माझे लोकमत असे नेहमी का म्हणतो, तर या माझ्या परिवारानेच अश्यावेळी माझी घट्टपणे पाठराखण केली, मला बळ दिले यातून बाहेर निघण्याचे.
माझा प्रत्येक सहकारी अस्वस्थ होता, अबोल होता माझ्यासाठी...
माझे सख्खे शेजारी मुन्नाशेठ, लाडकी संस्कृती, क्षीरसागर या साऱ्यांनी घरची आघाडी सावरली. कुटुंबियांना धीर दिला.
ते तर माहितीचा फैलाव कटाक्षाने रोखून धरला म्हणून बरे, तरी शब्दशः असंख्य फोन आले
काळजीचे, धिराचे, सल्ल्याचे, आधाराचे...
अनेक तर मला घेताही आले नाहीत.
हे इतके, असे शुभेच्छाचे बळ कुणाच्या नशिबात असते?
इकडे काही मित्रांनी नवस केले, तिकडे नातेवाईकांनी राम रक्षेपासून हनुमान चालीसापर्यंत काही काही केले.
शेकडो हात देव्हाऱ्यापुढे जोडले गेले..
दवा होतीच, पण दुवाने तारले म्हणायचे।
फोनवर, व्हिडीओवर बोलताना अनेकांच्या निशब्द ओठांची थरथर, डोळ्यातला ओलावा, त्यांच्या भावनांचे हुंदके स्पस्टपणे जाणवत होते...
... काय काय नाही केले माझ्यासाठी
त्याच तुमच्या बळावर फिरुनी आलोय मित्रांनो...
एक नवीन निरामय जगणं घेऊन...
कृतज्ञतेला खरेच शब्द अपुरे आहेत...
ऋणात राहील बस इतकेच।
#CoronaDiary #KiranAgrawalQuarantine
Khupch Sundar ..🙏 Wishing you good health..
ReplyDeleteThank you
Deleteखुप छान
ReplyDeleteThank you
DeleteThank you
ReplyDeleteधन्यवाद किरणशेठ. खरं तर रुग्णाला बर करणे आम्हा डॉक्टरांच कर्तव्य आहे. सध्याच्या परिस्थितीत ठराविक अंतर ठेवून साध्य करावं लागतं, औषधांबरोबरच संवादातून रुग्णाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे जे सध्या करावे लागते. अशा परिस्थितीत आपल्या सारख्यांच्या लेखणीतून मिळालेली शाबासकी आम्हाला खूप मानसिक बळ देऊन जात. धन्यवाद. असेच प्रेम मिळावं हीच अपेक्षा. खूप सुंदर लिहिले आहे.
ReplyDeleteडॉ. गरुड.
ReplyDelete