Tuesday, June 28, 2022

लोकमतचे सुवर्णमहोत्सवी कृतज्ञता पर्व...

20 / 21 June 2022 लोकमतचे सुवर्णमहोत्सवी कृतज्ञता पर्व...
लोकमत नागपूरचा सुवर्ण महोत्सव व अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला, बुलडाणा व वाशिम येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान भगिनींचा सन्मान करीत मातृशक्तीला वंदन करण्यात आले. या तीनही ठिकाणी सन्मानित भगिनी व मान्यवरांसोबतची ही आठवण चित्रे... #LokmatAkola #LokmatBuldana #LokmatWashim #KiranAgrawalLokmat

Sunday, June 26, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on June 26, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220626_4_3&fbclid=IwAR3sXJD4mwkQ8T6GNA_2c7jdjKLWYgmK6VyR28yeCepK36S_vx4Jv1eUUFk
https://www.lokmat.com/editorial/deshmukh-did-correct-program-in-political-drama-a310/?fbclid=IwAR2iB_a3kue5l1B_1FZ62rOpJBBgIWfR0DPrGCxY0ZAjYV7fGV6kX7Kto9k

कृतज्ञतेचा स्नेहसोहळा ...

20 / 21 June 2022 कृतज्ञतेचा स्नेहसोहळा ...
वाचकांचे पाठबळ व वार्ताहर, विक्रेत्यांची शक्ती हीच लोकमतची ताकद आहे. त्याबळावरच लोकमत महाराष्ट्राचा मानबिंदू ठरला आहे. लोकमत नागपूरचा सुवर्ण महोत्सव व अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला, बुलडाणा व वाशिम येथे प्रारंभापासून लोकमतसाठी सेवा बजावणाऱ्या वार्ताहर, वितरकांचाही कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. #LokmatAkola #LokmatBuldana #LokmatWashim #KiranAgrawalLokmat

Friday, June 24, 2022

बुलडाण्यात लोकमत वार्ताहर स्नेह भेटी

June 21, 2022 बुलडाण्यात लोकमत वार्ताहर स्नेह भेटी
बुलडाण्यातही लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन मा श्री विजय बाबूजी दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या लोकमत वार्ताहर वितरकांच्या स्नेह मेळाव्यास व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या स्नेह भेटीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील कर्तृत्ववान भगिनींचा सन्मानही करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर बाबूजींसमवेत बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा, सहकार नेते राधेश्याम जी चांडक, खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
#LokmatBuldana #KiranAgrawalLokmat

श्री विजयबाबूजी दर्डा अकोल्यात ...

June 20, 2022 श्री विजयबाबूजी दर्डा अकोल्यात
वाचक हाच लोकमतचा मालक आहे अशी भूमिका घेऊन वाटचाल केल्यानेच वाचकांचे लोकमतला भरभरून पाठबळ लाभले. त्याचाच प्रत्यय काल अकोल्यात आला. लोकमतची मातृसंस्था नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा अकोल्यात आले असता विविध क्षेत्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रेमाची सलामी लाभली आणि व्हीएस एम्पोरियमचे अवघे सभागृह स्नेह वर्षावात न्हाऊन निघाले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित आमदार वसंतबाबू खंडेलवाल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, लक्ष्मणराव तायडे, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्रा, नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, अकोला युनिट हेड अलोक कुमार शर्मा Thanks Akolekar..
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat

लोकमत वाशिम स्नेह भेट ..

20 June 2022 लोकमत वाशिम स्नेह भेट
लोकमत नागपूरचा सुवर्ण महोत्सव व अकोला आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीनिमित्त लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार श्री विजय बाबूजी दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम येथे वार्ताहर, वितरक बांधवांच्या स्नेह मेळाव्याचेआयोजन करण्यात आले होते. पद्मश्री नामदेवराव कांबळे व शिरिषा बच्चन सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यानंतर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मा. विजय बाबुजींच्या स्नेह भेटी घेऊन लोकमतवरील प्रेम व्यक्त केले. Thanks washimkar..
#LokmatAkola #LokmatWashim

Saraunsh published in Akola Lokmat on June 19, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220619_2_1&fbclid=IwAR09Uxy8yqm8aIvNDAyNKOL2Gw7OF95guBfOh44pm4YgaxI4SwySyFDw0AI
https://www.lokmat.com/editorial/wait-a-minute-because-corona-is-not-leaving-a310/?fbclid=IwAR3JuJdy0JUnhWYkzmN35DAR1ObO4TkvD7lThXCrf1pWcWrvKu7lN1C0y3

EditorsView published in Online Lokmat on June 16, 2022

होऊद्या हरिनामाचा गजर... किरण अग्रवाल / महाराष्ट्रातील राजकीय परिघावर एकीकडे सध्या आरोप-प्रत्यारोपांचे व परस्परांबद्दलच्या शंका कुशंकांचे धुमशान सुरू असताना, दुसरीकडे विठू माऊलीच्या भेटीची आस मनी घेऊन हजारो वारकऱ्यांसमवेत राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. राजकीय कोलाहलात विटलेल्या जीवांना आस्था व श्रद्धेने भक्तिरसात डुंबून जाण्यासाठी या पालखी सोहळ्यांतुन जागोजागी घडुन येत असलेला हरी नामाचा गजर कामी येणार आहे.
आमदारांच्या मताद्वारे निवडून द्यावयाच्या राज्यसभा सदस्यांची निवडणूक नुकतीच झाली असून, यातील जय पराजयावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. सत्ताधारी महाआघाडीच्या एका उमेदवारास यात पराभव पत्करावा लागल्याने विरोधकांना जणू आभाळ ठेंगणे झाले आहे. त्यामुळेच महागाई, बेरोजगारीचे व तत्सम सारे प्रश्न निकाली निघाल्याचे आणि विकासाचे मजले चढवुन झाल्याचे समजून केवळ राजकीय शह-काटशहचीच चर्चा होत आहे. राज्यसभेचे झाले, आता पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडीत काय चमत्कार होतो ते बघा; असे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. बरे, यासंबंधीची चर्चा इतक्या उच्चरवाने होत आहे की त्यापुढे 'कॉमन मॅन'चा आवाज क्षीण ठरावा, पण असे असले तरी दुसरीकडे राज्यात टाळ मृदुंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष सुरू झाल्याने या राजकीय कोलाहलापासुन काहीशी सुटका व्हावी.
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून संत तुकोबाराय, त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज तर शेगाव येथून संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. राज्यातील इतरही ठिकाणच्या पालख्या मार्गस्थ झाल्या आहेत, त्यामुळे सर्वत्र भक्तीचा जागर घडून येत आहे. वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेला तो सद्गुणांचा संस्कार आहे. विठू माऊलीच्या नामस्मरणात साऱ्यांचे मन एकचित्त होते, आणि ते तसे होताना जातीभेदाच्या अमंगल कल्पनांना जिथे थारा उरत नाही अशी एकतेची परंपरा या वारीत सामावली आहे. 'चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू...' असे म्हणत व 'पंढरीची वारी जयाचिये कुळी, त्याची पायधुळी लागो मज। नामा म्हणे धन्य झाले ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची।।' असा सश्रद्ध भाव मनी घेऊन माऊलींच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीस निघतात व आषाढी एकादशीच्या एक दोन दिवस आधी चंद्रभागेच्या तिरी जाऊन विसावतात. सारे वातावरण चैतन्याने भारून टाकणारा हा श्रद्धेचा अनुपम प्रवास असतो. विविध दिंडयांचा हा प्रवास सुरू झाला आहे.
राजकीय नेते व कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षाची व भूमिकांची पालखी वाहण्यात धन्यता मानत असले तरी, अवघा महाराष्ट्र मात्र विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या विविध संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी आतुर व सज्ज आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून आलेल्या मर्यादा यंदा दूर झाल्याने दर्शन आणि दिंडीच्या स्वागताची आतुरता व उत्सुकता शिगेला आहे. येथल्या भक्ती परंपरेची हीच खासियत आहे. राज्यात मान्सूनची वर्दीही मिळून गेली असून बळीराजा खरिप हंगामाच्या तयारीला लागला आहे. श्रम व श्रद्धेचा उत्कट असा साक्षात्कार अनुभवण्याचा हा काळ आहे. त्यामुळे राजकारण्यांचे राजकीय भोंगे कितीही वाजूद्या अगर कर्कश्य होऊद्या, हरिनामाच्या गजरापुढे ते क्षीणच ठरतील याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. तेव्हा राजकीय वाद प्रवादांचे पाट वाहत राहतील, आपण श्रद्धेच्या पाटात डुंबून माऊलींचा गजर करूया. बोला, 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल... ।'
https://www.lokmat.com/editorial/houdya-harinamas-alarm-a310/?fbclid=IwAR3gu3xL_900pH51VfDNZg7e69MFlyU9ZwB_IDO01XJv351A5f4vhtDBrSo

Sunday, June 12, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on May 12, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220605_2_2&fbclid=IwAR3AFri9-FGMcacT6OMlMei5-lMs8UGaot-Gkm1TA9sZuZB5b7XT9D_cUFk
https://www.lokmat.com/editorial/what-about-the-responsibility-of-deprived-development-in-delay-a310/?fbclid=IwAR3ExSGYt4DvHypAxkbAkQ-jTS766bA8SL82Q8lOufGDJsBDBSVQJ95eWUw

Saraunsh published in Akola Lokmat on May 05, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220605_2_2&fbclid=IwAR3AFri9-FGMcacT6OMlMei5-lMs8UGaot-Gkm1TA9sZuZB5b7XT9D_cUFk
https://www.lokmat.com/editorial/destiny-should-not-be-cured-destiny-should-be-clear-a310/?fbclid=IwAR1QkPt8I0-3m4siH6wQDPsn8jyQHqNQJ4ayZ3D49dhDCs1_Fh7e2cUpq24

Thursday, June 2, 2022

EditorsView published in Online Lokmat on June 02, 2022

'प्री वेडिंग शूट'ची अनैतिकता! किरण अग्रवाल / परंपरेने चालत आलेल्या, परंतु काळाच्या कसोटीवर व्यवहार्य व उचित न ठरणाऱ्या सामाजिक कुप्रथा एकीकडे बंद केल्या जात असताना, दुसरीकडे पुढारलेपणाच्या व संपन्नतेच्या प्रदर्शनासाठी नव्या आणि नैतिकतेला ध्वस्त करणाऱ्या प्रथा सुरू होऊ पाहतात तेव्हा त्यातून समाजाची अधोगतीच घडून आल्याखेरीज रहात नाही. नात्याच्या पवित्रतेवर ओरखडा उमटवू पाहणाऱ्या व मर्यादांची सीमा ओलांडण्याची संधी देणाऱ्या 'प्री- वेडिंग शूट'च्या वाढत्या प्रकारांकडेही त्याचदृष्टीने बघता यावे, कारण यातून घडून येणाऱ्या अप्रिय घटनांमुळे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर विवाह व्यवस्था आणि त्यातील मान्यतांनाही आता हादरे बसू लागले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या धुरिणांनी व ज्ञाती संस्थांनीही याबाबत वेळीच सावध होऊन भूमिका घेणे म्हणूनच गरजेचे बनले आहे.
मध्यंतरीचा एक काळ असा होता जेव्हा हुंडाबळीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत, शिवाय लग्नकार्यात मान पानावरून होणारे राजी नाराजीचे प्रकार चर्चित ठरत; पण काळ बदलला तसा यातही आता खूप फरक पडला आहे. मानपान व हूंडा राहिला बाजूला, आता साखरपुड्यातच लग्न आटोपली जाऊ लागली आहेत. सर्वच समाजातील मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा कमी असल्याने व करिअरच्या नादातील मुलामुलींची लग्ने उशिरा होऊ लागल्याने पालकांचा जीव टांगणीला लागलेला दिसून येतो. यातूनच आता मुलीच्या दाराशी मांडव पडण्याऐवजी मुलाकडेच जाऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न लावण्याची प्रथाही सुरू झाली आहे, त्यामुळे अव्यस्थेतून होणारे नाराजीचे प्रसंग टळत आहेत. रात्रीच्या ऐवजी दिवसाची लग्ने होत आहेत व पूर्वी चार-चार दिवस चालणारे सोहळे आता एकेका दिवसात आटोपू लागले आहेत. स्वाभाविकच काळाच्या कसोटीवर न उतरणार्‍या प्रथा परंपरांना फाटा देऊन हा बदल स्वीकारला गेला आहे व त्याला समाज मान्यताही लाभलेली दिसत आहे. केवळ लग्नसमारंभातील कुप्रथाच नव्हे, तर वैधव्यप्राप्त भगिनींना सन्मानाने वागविण्याचे व मुलीच्या जन्माच्या स्वागताचे ठरावही विविध ग्रामपंचायतींमध्ये होत आहेत. मृत्यूपश्चातच्या सामाजिक जेवणावळीही अनेक समाजामध्ये बंद होऊ लागल्या आहेत. काळानुरूप हे सारे घडत असताना बंद होणाऱ्या काही प्रथांबरोबरच नव्याने काही प्रकार सुरू झाले आहेत, जे चिंता व चिंतनाचा विषय बनले आहेत. ------------------- लग्नसमारंभात प्री वेडिंग शूट दाखविण्याचा प्रकार अलीकडे वाढीस लागला आहे. ऐश्वर्याचे व संपन्नतेचे प्रदर्शन मांडू पाहणाऱ्या घटकांकडून हे फॅड पुढे आणले गेले आहे, पण आपणही ते केले नाही तर समाजात आपली गणना मागास म्हणून होईल असा समज करून घेतलेला वर्गही नाईलाजाने हे फॅड स्वीकारताना दिसतो. यातुन संस्कृती- संस्कारांना व नैतिकता- मर्यादांनाही गालबोट लागु पहात असल्याने समाज धुरिणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होऊन बसले आहे. यासंदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अलीकडेच घडून आलेला व समाज माध्यमात चर्चित ठरलेला प्रकार सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. या तालुक्यातील विवाह निश्चिती झालेले एक जोडपे प्री वेडिंग शूटसाठी गोव्यात गेले होते. तेथे वधू-वराने हॉटेलात एक रात्र सोबत घालवली व सकाळी उठताच वराने 'तू पाहिजे तशी नाहीस' असे म्हणत लग्न मोडण्याची घोषणा केली. यातून सर्व संबंधितांना झालेल्या मनस्तापाची कल्पना करता, कशासाठी हवे हे प्री वेडिंग शूट असा प्रश्न निर्माण झाल्याखेरीज राहू नये. -------------------- पुढारलेपणाच्या प्रदर्शनातून आपण नैतिकतेला कसे धाब्यावर बसवतो आहोत हेच यातून उघड व्हावे. सर्वांच्याच बाबतीत असेच होते असेही म्हणता येणार नाही, मात्र व्यक्तिगत वधू-वर किंवा त्यांच्या कुटुंबीयांची आवड, हौस बाजूस ठेऊन विचार करता या नव्या प्रथेची समाजाला म्हणून खरेच काही गरज आहे का, असा यातील सवाल आहे. यातील संभाव्य धोके व नैतिकतेचा ऱ्हास लक्षात घेता गेल्यावर्षी पुण्यात स्थानकवासी जैन संघटनेच्या 36 संघांनी मिळून प्री वेडिंग शूट न करण्याचा जाहीर निर्णय घेतला ही अभिनंदनीय बाब म्हणायला हवी. तेव्हा अन्यही ज्ञाती संस्थांनी या निर्णयाच्या आदर्शाचा कित्ता गिरवायला हरकत नसावी. ---------------------- महत्त्वाचे म्हणजे चिखलीतील वधू वराबाबत घडलेल्या प्रकारातून नैतिकता व मर्यादेचे विषय जसे अधोरेखित झालेत, तसेच अलीकडीलच काही अन्य प्रकारांमुळे संस्काराचे विषयही पुढे येऊन गेले आहेत. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने पालकांपासून दूर राहणाऱ्या उपवर मुला-मुलींबाबत हवी तेवढी काळजी घेतली जाताना दिसत नाही. त्यांच्या अल्लडपणातून पाय घसरतात तेव्हा पालकांच्या पायाखालची जमीन सरकते पण वेळ निघून गेलेली असते. यासंदर्भातही अलीकडेच घडून गेलेल्या साताऱ्यातील एका प्रकारातुन डोळे उघडायला हवेत. साताऱ्यातील एका तरुणीची पंढरपूरमधील तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. या मैत्रीने पुढे हद्द ओलांडली व मित्राच्या दबावाला बळी पडत संबंधित तरुणीने स्वतःचे अश्लील फोटोही त्यास पाठविले आणि त्यातून ब्लॅकमेलिंग सुरू झाले. सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीतून इतकी घसरण होणार असेल, तर यात संस्कार कमी पडले की काय असाच प्रश्न उपस्थित व्हावा. रोजीरोटीसाठी कराव्या लागणाऱ्या झगड्यात व व्यापात संस्काराची शिदोरी राहून जाणार असेल तर होणारे अधःपतन रोखता येऊ नये. नव्या, परंतु अनिष्ठ प्रथा परंपरांचे स्तोम माजण्यापूर्वी संस्कारांचे वासे घट्ट करणे म्हणूनच गरजेचे बनले आहे. https://www.lokmat.com/editorial/immorality-of-pre-wedding-shoot-a310/?fbclid=IwAR0Fj7EUtm3qFuRqPv4fb_pKvZgcQSADKjonIdVXWv-AZIfbtreUjVwqBHA