Monday, December 12, 2022

ग्रंथालये टिकली पाहिजेत...

Dec. 08, 2022 ग्रंथालये टिकली पाहिजेत...
वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यात ग्रंथालयांची उपयोगीता महत्त्वाची आहे, परंतु आज ग्रंथपाल व तेथील सेवक वर्ग अनेकविध अडचणीत आहेत. रोजगार हमी योजनेवरील बांधवांना तरी चांगला रोजगार मिळतो, परंतु ग्रंथालयातील अनेक सेवकांना तितकाही मेहनताना मिळत नाही. ग्रंथालयांना 60% अनुदानाची घोषणा मागे करण्यात आली, पण अद्याप हे अनुदान मिळालेले नाही. वेतन श्रेणीचा प्रश्नही प्रलंबित आहे. सेवकांचे पगार करण्यात जिथे अडचणी आहेत तिथे प्रशस्त वा स्व मालकीच्या इमारतींचा विषयच येत नाही.
शिक्षणाच्या वाटा ग्रंथालयातून प्रशस्त होणाऱ्या असतात, पण आज ग्रंथालयांकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाहीत... अकोला लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षातील वाटचालीनिमित्त आयोजित संवाद सत्रात जिल्ह्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व विविध ग्रंथपालांनी आपल्या व्यथांना वाट मोकळी करून दिली. जिल्हा संघाचे अध्यक्ष शामराव वाहूरवाघ, कैलास गव्हाळे, अलका जोशी, ज्योती सरदार, सोनिया खंडारे, दिवाकर तिडके, शरद लोखंडे, सदाशिव चांदुरकर, ब्रिजलाल डोंगरे, सुनील कांबळे, राम मुळे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला #LokmatAkola #LokmatSamvad #AkolaLibrary

No comments:

Post a Comment