Monday, July 4, 2022

स्मृतींचा दरवळ ...

स्मृतींचा दरवळ ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, लोकमत समूहाचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यांनी कायम देशाच्या व सामान्य माणसाच्या विकासाचा विचार केला. त्यांनी घालून दिलेला हाच आदर्श यापुढील अनंत काळासाठी आमचा मार्गदर्शक ठरला आहे. म्हणूनच आज बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ करताना आम्ही अनंताच्या फुलांचे (Gardenia jasminoides) रोपटे लोकमतच्या प्रांगणात रुजवित आहोत, ज्याद्वारे बाबूजींच्या स्मृतींचा व आदर्शांचा गंध अनंत काळासाठी आसमंतात दरवळत राहील व आम्हाला प्रेरणा देईल.
याप्रसंगी अकोल्याचे कामगार आयुक्त श्री. आर. डी. गुल्हाने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी सौ सविता बुटले - गुल्हाने, लोकमतचे अकोल्यातील मुख्य वितरक अशोक बापू देशमुख, युनिट हेड आलोककुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा व अन्य सहकारींसमवेत...
शनिवार, दि. 2 जुलै 2022 #LokmatAkola #JawaharlalDardaBirthCentenary #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment