Sunday, July 31, 2022

प्रभात किरणांचा गौरव ...

July 29, 2022 प्रभात किरणांचा गौरव ...
पुस्तकी शिक्षणासोबतच मूल्य व कौशल्याधारित शिक्षणासाठी सदैव उपक्रमशील राहणाऱ्या अकोल्यातील प्रख्यात प्रभात किड्सच्या CBSE बोर्डातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त पुन्हा या शाळेत जायला मिळाले व गुरुजनांसोबतचा सहवास लाभला. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत उज्वल निकालाची परंपरा कायम राखणे हे तसे अवघड होते, पण विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला गुरुजनांच्या धडपडीची साथ लाभली. संचालक डॉ. श्री. गजानन नारे व सौ वंदना नारे यांनी एकेका विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष पुरविले, त्यामुळे प्रभात किड्सने भरभरून यश संपादन केले. दहावीचा निकाल शंभर टक्के तर लागलाच शिवाय तब्बल 37 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. यात 12 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले. बारावीतील गुणवंतांनीही यशाची कमान उंच ठेवली. यापुढील वाटचालीत प्रभात किरणे फैलावण्यास सिद्ध व सज्ज असलेल्या या गुणवंतांचा गौरव नवी ऊर्जा देऊन गेला.
शिक्षित होण्याबरोबरच सुशिक्षित व्हा. कोणत्याही क्षेत्रात जा, कोणतीही उच्च पदवी घ्या; पण माणुसकी व संवेदना जपून काम करा... एवढेच यानिमित्ताने सांगितले. संस्थेचे सचिव नीरज आवंडेकर, अ.भा. नाट्य परिषदेचे कार्य. सदस्य अशोक ढेरे, प्राचार्य वृषाली वाघमारे, अर्चना बेलसरे आदिही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मित्रवर्य डॉ. नारे सरांच्या प्रेमळ निमंत्रणामुळे हा योग जुळून आला. Thanks Sir n Prabhat Parivar... #PrabhatAkola #KiranAgrawal #चला_माणूस_होऊया!

No comments:

Post a Comment