Sunday, October 16, 2022

लोणारमध्ये रंगला गप्पांचा फड...

Oct. 14, 2022 लोणारमध्ये रंगला गप्पांचा फड...
सभा संमेलनात, कार्यक्रमात अनेक नेते कार्यकर्ते भेटतात, पण तेथे मनमोकळ्या गप्पा होत नाहीत. छोटेखानी बैठकीत मात्र सारेजण दिलखुलासपणे व्यक्त होतात, हा माझा नेहमीचा अनुभव आहे. लोणारमध्येही त्याचाच प्रत्यय आला. उल्कापातामुळे तयार झालेले बेसॉल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे आघाती विवर अशी ख्याती असलेल्या लोणार दौऱ्यानिमित्त आमच्या लोकमतच्या स्थानिक प्रतिनिधींनी तेथील विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत गप्पांचा योग जुळवून आणला. यात राजकारण, समाजकारणापासून लोणार सरोवर विकासातील अडचणींपर्यंत अनेक विषयांवर छान गप्पांचा फड रंगला. पक्षीय अभिनिवेश न बाळगता आजचे राजकारण कसे गढूळ होत चालले आहे, यावर सारे नेते मोकळेपणे बोललेत.
लोकमतचे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख( शिंदे गट) प्रा. बळिराम मापारी, भा.रा.कॉं. लोणारचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, ओबीसी सेल भा.रा.काँ बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा गजानन खरात, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, प्रसिद्ध कला शिक्षक प्रा जगन राठोड, कला शिक्षक प्रा गोपाल वाकोडे (मराठी स्वाक्षरीक़ार), जेष्ठ कॉंग्रेस नेते साहेबराव पाटोळे यांच्यासह लोकमतचे जाहिरात उप व्यवस्थापक संदीप दिवेकर, स्थानिक प्रतिनिधी मुयर जैन व रेहमान नौरंगाबादी चर्चेत सहभागी झाले. #LokmatAkola #LokmatLonar #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment