Sunday, October 16, 2022

संवेदना जागविणाऱ्या साहित्याचे सृजन व्हावे...

Oct. 09, 2022 संवेदना जागविणाऱ्या साहित्याचे सृजन व्हावे...
मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाचे 7वे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यवतमाळचे प्रख्यात साहित्यिक विनय मिरासे अध्यक्ष होते, तर समीक्षक डॉ. चिंतामण कांबळे यांनी उद्घाटन केले. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, कथाकार सुरेश पाचकवडे यांच्या समवेत संमेलनास जाण्याचा योग आला.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना वर्तमान साहित्यावर विचार मांडले. मी व माझ्यात गुंतलेल्या स्वकेंद्री, स्वमग्न साहित्याच्या निर्मितीपेक्षा माणसातील माणुसकी तसेच संवेदना जागवणारे, समाजाला पुढे नेण्यासाठी दिशादर्शन करणारे व जगण्याची नवी उभारी देतानाच वंचित, शोषितांच्या भूमिकांना बळ देणाऱ्या साहित्याचे सृजन होणे आज गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. शिक्षकी पेशात असलेल्या रवींद्र जवादे यांच्या धडपडीतून हा साहित्य संघ व संमेलन आकारास आले. डामडौलापासून दूर राहत पार पडणाऱ्या अशा संमेलनांमधून साहित्य व मराठी मातृभाषेला अधिक समृद्ध करण्याचे प्रयत्न होत आहेत हे सर्वाधिक आनंददायी आहे.
#SrujanSahityaSammelan #SrujanMurtijapur #KiranAgrawal

No comments:

Post a Comment