Thursday, October 20, 2022

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ... 2022

Oct 11, 2022 लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ...
सेवा, समर्पण आणि सद्भावाच्या बळावर जग बदलायला निघालेल्या सत्वशील असामान्यत्वाला सलाम करणारा सोहळा म्हणजे #LMOTY विविध कॅटेगिरीमधून निवडल्या गेलेल्या 22 गौरवार्थींच्या या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सर्वसामान्यांच्या मनाला भिडून गेली. अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह उद्योग जगतातील मान्यवरांनी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सन्मान सोहळ्यास हजेरी लावली. अभिनेते रणवीरसिंह, कियारा आडवाणी यासारख्या फिल्मी दिग्गजांच्या उपस्थितीने कार्यक्रमात जान आली.
लोकमतचे संयुक्त प्रबंधक तथा संपादकीय संचालक, तरुण नेतृत्व श्री ऋषीबाबू दर्डा यांच्या संकल्पनेतून या गौरव सोहळ्याची सुरुवात झाली, जी महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, सन्मानार्थिंसाठी एक माइलस्टोन बनली. हा भव्य दिव्य व सर्व क्षेत्रीय दिग्गजांच्या उपस्थितीतील सोहळा प्रत्यक्ष अनुभवणे हेदेखील आनंद व अभिमानाचेच असते. यंदाच्या या सोहळ्यात लोकमत समूहाचे चेअरमन मा. श्री. विजय बाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ मा. श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा व श्री. ऋषी बाबूंसह राज्यातील लोकमतच्या अन्य सहकारी, संपादकांसमवेतची ही आनंद चित्रे...
#LokmatMaharashtrianOfTheYear2022

No comments:

Post a Comment