Tuesday, April 25, 2023

साक्षरतेच्या निकषात पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित..

April 24, 2023 साक्षरतेच्या निकषात पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित..
ग्रामीण भागात पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के आहे. म्हणजे तब्बल 95 टक्के ग्रामीण जनता पदवीपर्यंत पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे शासनाने शिक्षणात साक्षरतेचा मापदंड पदवीपर्यंत मानावा, असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम व्यक्त केले. अकोला येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता कदम यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी एकूणच शिक्षण विषयक अनास्थेबद्दल ते पोटतिडकेने बोलत होते. आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु आहे. संवेदना जाग्या असलेली, मानवी चेहऱ्याची व्यक्ती अधिकार पदाच्या खुर्चीत असली की प्रशासकीय कामे तात्काळ मार्गी लागतील या प्रामाणिक भूमिकेतून कदम यांचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हयात आंबेडकरवादी मिशनतर्फे शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाणार आहे, त्यातून शिक्षण विषयक वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व संपादकीय सहकारी यावेळी चर्चेत सहभागी झाले. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

Saraunsh published in Akola Lokmat on April 23, 2023

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230423_2_4&fbclid=IwAR3yM8PQrYFYi3tAv-W7pp3pB_sBAwo2gDhYkYkVj7oY3gdZNQENd9DsPQ4
https://www.lokmat.com/editorial/resolutions-for-social-reforms-should-also-be-made-in-gram-sabha-a-a520-c719/?fbclid=IwAR28voVHMXmnceUlAK7ROXf6bs5EpTioDiGG6HLpNmndQQJMA6S1IFbB-Hw

वारसा जपूया, संस्कृती जपूया...

April 18, 2023 वारसा जपूया, संस्कृती जपूया...
विदेशात फिरताना त्या त्या ठिकाणचे ऐतिहासिक वारसे त्या त्या देशांनी जपून ठेवल्याचे व त्यातून पर्यटन वृद्धीस व अर्थकारणास हातभार लाभल्याचे प्रकर्षाने दिसून येते. आपल्याकडेही ते होते, त्यात लोकसहभाग लाभणे गरजेचे आहे.
आज #WorldHeritageDay2023 आहे. सरकार व यंत्रणा आपले ऐतिहासिक वारसे जपण्यासाठी जे करायचे ते करेलच, पण सुजाण नागरिक म्हणून आपणही हे वारसे जपण्यासाठी कटिबद्ध होऊया... पर्यटक म्हणून अशा ठिकाणी जाताना किमान तेथे आपल्याकडून काडी कचरा फेकला जाणार नाही याची काळजी घेऊया. ऐतिहासिक वारशांच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती व गौरवशाली इतिहासाचेच जतन करीत असतो हे लक्षात ठेवूया... #KiranAgrawal #WorldHeritage

Saraunsh published in Akola Lokmat on April 16, 2023

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230416_2_2&fbclid=IwAR20XUVmK4zEX-ICiSb-mCXYVen1rNM5Aw3ppIDdMJTbT50-9hzBJensunc
https://www.lokmat.com/editorial/over-salt-water-astringent-politics-a-a520-c310/?fbclid=IwAR36ciRB6AQnhDUNGQsGOPwc9UggA6ZEqRBG2TTWlIGVIYJQ2O3Ij4EOdis

Thursday, April 13, 2023

#LAA ... Lokmat Achiever's Awards 2023

April 13, 2023 #LAA ... Lokmat Achiever's Awards 2023
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या व्यवस्थापनाकडून कौतुकाची थाप मिळवून व नव्या संकल्पना घेऊन पत्रकारिता परमो धर्म निभावण्यास पुन्हा सिद्ध होण्याची ऊर्जा देणारा सोहळा म्हणजे LAA. पुणे, नाशिक व गोवा नंतर हा सोहळा यंदा मुंबई येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, या संकल्पनेचे हे अकरावे वर्ष आहे. समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक श्री देवेंद्रबाबूजी, सह व्यवस्थापकीय संचालक श्री ऋषीबाबूजी, कार्यकारी तथा संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्यासह व्यवस्थापनातील सर्व मान्यवरांचा सहवास व मार्गदर्शन यावेळी लाभले.
देशभरातील लोकमत समूहातील लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाइम्स या तीनही भाषेतील वृत्तपत्रांचे तसेच डिजिटल लोकमत, ऑनलाइन लोकमत, लोकमत चॅनेल अशा सर्व प्लॅटफॉर्मवरील सुमारे 400पेक्षा अधिक मान्यवर या आनंद सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LAA2023 #LAAMumbai #LAAThane #KiranAgrawalLokmat

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की ...

April 10, 2023 कळविण्यास अत्यंत आनंद होतो की ...
अकोला लोकमतच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारून दोन वर्षेही उलटत नाही तोच येथील सर्व सहकारी बंधूंच्या मेहनतीमुळे Star Best Hello अवॉर्डचे यश हॅलो अकोलाला लाभले. #LAA2023 .. मुंबई येथील Lokmat achievers Awards समारंभात लोकमत समूहाचे चेअरमन आद. श्री विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा व युवा नेतृत्व श्री देवेन्द्र बाबूजी तसेच श्री ऋषी बाबूजी दर्डा यांच्या मुख्य उपस्थितीत सह व्यवस्थापकीय संचालक श्री ऋषीबाबूजी दर्डा यांच्या हस्ते हॅलो हेड श्री राजेश शेगोकार जी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे, श्री राजेश शेगोकार जी यांना व्यक्तिगत Most Impactful story चा, तर श्री शैलेश येंडे जी यांना Best IT & Electronics Dept. चा अवॉर्डही यावेळी लाभला. Best Editorial Edition श्रेणीतही अकोला रनर अप राहिले.
नाशिक लोकमतच्या निवासी संपादक पदाची सूत्रे घेतल्यानंतर सर्व सहकारींच्या परिश्रमामुळे अवघ्या वर्षभरात लोकमत समूहातील Best Editorial Edition अवॉर्ड लाभला होता, त्यानंतर अकोल्यातही तशाच यशाची पुनरावृत्ती झाली. अत्यंत आनंद व अभिमानाचा हा क्षण आहे. Very proud of you Team Akola.. My Lokmat, Jai Lokmat #LAAThane #LokmatAkola #HelloAkola #KiranAgrawalLokmat

LAA2023.. Mumbai

LAA2023.. Mumbai
Lokmat Achievers Awards #LAA2023 च्या 11व्या आवृत्ती निमित्त Team Akola ठाण्यात ...
#KiranAgrawal #LokmatAkola

Saraunsh published in Akola Lokmat on April 09, 2023

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230409_4_5&fbclid=IwAR3weqRZIc-66goqjHCfzxB5RjG_RRc0X8vZvBoE1fadUU2R3JlGypJ0d84
https://www.lokmat.com/editorial/unfortunate-types-that-reach-the-climax-of-deformity-and-inferiority-a-a520-c310/?fbclid=IwAR1YVKavuDEjHkvqAhh5Fvy-TVTa70zel5iEOf6D9ABbt2NiE45j278cgck

महाबली श्री हनुमान जयंती

April 06, 2023 महाबली श्री हनुमान जयंती
महाबली श्री हनुमान जयंती निमित्त अकोल्यातील श्री सालासर धाम येथे मान्यवरांसह... #kiranAgrawal जयपुर येथील हवामहलच्या प्रतिकृतीतून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर समोर नजरेस पडणारी महाराष्ट्रातील संतांची मांदियाळी व श्री विठुरायाचा दरबार मन प्रसन्न करून जाते.

राजेंना मानाचा मुजरा...

April 03, 2023 राजेंना मानाचा मुजरा...
रयतेच्या राज्याची, सुराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. अकोल्याच्या गोरक्षण रोडवरील सहकार नगरात 2018मध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रभूंच्या पुतळ्याचे स्थानांतरण करण्यात आले. अकोल्यातील निसर्गस्नेही श्री शरद कोकाटे यांच्या कल्पकतेतून ऐतिहासिक किल्ल्याच्या बुरुजाची प्रतिकृती व त्यावर राजमुद्रा अंकित करून हा पुतळा उभारला गेला आहे. वटवृक्षाच्या पारंब्या जेथे जेथे रुजतात तेथे तेथे नवे वृक्ष उभे राहतात व वटवृक्ष हा आजन्म छाया देणारा आहे म्हणून महाराजांची कीर्ती दिगंत पसरावी अशा पर्यावरणपूरक संकल्पनेतून येथे वटवृक्षाखाली शिवसृष्टी साकारली गेली. याच शिवसृष्टीवर श्री पंकज जायले, श्री शरद कोकाटे, खाडे काका, विलास राऊत, तुषार जायले, विवेक ठोसर, संजय शिरेकर, राजू धमाले, शेखर शेळके आदी सहकारींसमवेत शिवप्रभूंना विनम्र अभिवादन प्रसंगी... #KiranAgrawal

चित्त शुद्धीसाठी अध्यात्म...

April 01, 2023 चित्त शुद्धीसाठी अध्यात्म...
अध्यात्म हा उतारवयात अनुसरायचा मार्ग नाही, तर जीवनाच्या शाश्वत कल्याणासाठी व चित्तशुद्धीसाठी बालपणापासूनच अंगिकारायचा मार्ग आहे, हे लॉजीकली पटवून देणाऱ्या श्री. शंकर महाराज यांच्या भेटीचा योग आला. खामगाव नजिकच्या शेलोडी येथील जागृती तपोवन आश्रमाचे मठाधिपती, कथाकार म्हणून ख्यातकीर्त असलेले श्री शंकर महाराज कन्याकुमारीच्या श्री विवेकानंद आश्रमात घडलेले. तेथून ते गुरू आदेशाने अरुणाचलात सेवारत झाले व आता शेलोडीत आहेत. त्यांनी चालविलेल्या नापासांची शाळा या उपक्रमातून अनेक मुले डॉक्टर्स, इंजिनियर्स झाली. अकोल्याच्या सहकार नगरात सुरू असलेली त्यांची विष्णुसहस्त्रनाम कथा ऐकली. निव्वळ कथेचे वाचन न करता ती सुलभतेने उलगडून दाखविण्याचे त्यांचे कौशल्य विशेष वाटले. आकलन सुलभता असलेली रसाळ वाणी व आपण कथाकार असल्याच्या वेगळेपणाचा जराही अविर्भाव न बाळगता अतिशय साधेपणाने लहान थोरांशी समरस होणारे निर्गवी व्यक्तिमत्व म्हणून ते मनाला भावले. कथेच्या समाप्तीनंतर आयोजक स्नेही बालाजी मेडिकल्सचे श्री नितीन दांदळे यांच्या निवासस्थानी महाराजांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. अध्यात्म, आजची बुवाबाजी अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. सामाजिक व राजकीय नेते श्री पंकज जायले, पर्यावरण स्नेही श्री शरद कोकाटे, आमचे कार्यालयीन सहकारी श्री राजू चिमणकर यावेळी समवेत होते. नितीनभाऊ दांदळे यांचे निमंत्रण व खामगाव मधील सहकारी उपसंपादक श्री अनिल गवई यांनीही धरलेला महाराजांच्या भेटीचा आग्रह यामुळे हा योग घडून आला. #KiranAgrawal

प्रभू श्रीराम शोभायात्रेचा अनुपम सोहळा...

March 30, 2023 प्रभू श्रीराम शोभायात्रेचा अनुपम सोहळा...
अकोल्याची कावड यात्रा प्रसिद्ध तशीच श्रीराम नवमीची शोभायात्रा. यंदाही मोठ्या उत्साहात प्रभु श्रीरामांची शोभायात्रा निघाली. विविध मंडळांचे चित्ररथ व भजनी मंडळांच्या दिंड्या यात सहभागी झाल्या होत्या व हा शोभायात्रेचा अनुपम सोहळा डोळ्यात आणि मनात साठवण्यासाठी हजारो रामभक्त शोभायात्रा मार्गावर उपस्थित होते. या शोभायात्रेत सहभागाचा माझाही पहिलाच अनुभव होता, तो भक्ती भावाने भारलेल्या मनाला अधिक चैतन्य प्राप्त करून देणारा ठरला. खरेच, अकोलेकरांच्या श्रद्धाभावाला तोड नाही. #ShriramShobhayatraAkola #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on April 02, 2023

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230402_2_3&fbclid=IwAR2w7Qb39CX1ZGZ-Vo6bYKSl8dJMIoZUwdG0b7BoX6rMTE3O20pn7HqxNdo
https://www.lokmat.com/editorial/how-far-will-the-horses-run-behind-varati-a-a520-c310/?fbclid=IwAR1YVKavuDEjHkvqAhh5Fvy-TVTa70zel5iEOf6D9ABbt2NiE45j278cgck