Tuesday, April 25, 2023

साक्षरतेच्या निकषात पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित..

April 24, 2023 साक्षरतेच्या निकषात पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित..
ग्रामीण भागात पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के आहे. म्हणजे तब्बल 95 टक्के ग्रामीण जनता पदवीपर्यंत पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे शासनाने शिक्षणात साक्षरतेचा मापदंड पदवीपर्यंत मानावा, असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम व्यक्त केले. अकोला येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता कदम यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी एकूणच शिक्षण विषयक अनास्थेबद्दल ते पोटतिडकेने बोलत होते. आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु आहे. संवेदना जाग्या असलेली, मानवी चेहऱ्याची व्यक्ती अधिकार पदाच्या खुर्चीत असली की प्रशासकीय कामे तात्काळ मार्गी लागतील या प्रामाणिक भूमिकेतून कदम यांचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हयात आंबेडकरवादी मिशनतर्फे शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाणार आहे, त्यातून शिक्षण विषयक वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व संपादकीय सहकारी यावेळी चर्चेत सहभागी झाले. #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment