Thursday, April 13, 2023

चित्त शुद्धीसाठी अध्यात्म...

April 01, 2023 चित्त शुद्धीसाठी अध्यात्म...
अध्यात्म हा उतारवयात अनुसरायचा मार्ग नाही, तर जीवनाच्या शाश्वत कल्याणासाठी व चित्तशुद्धीसाठी बालपणापासूनच अंगिकारायचा मार्ग आहे, हे लॉजीकली पटवून देणाऱ्या श्री. शंकर महाराज यांच्या भेटीचा योग आला. खामगाव नजिकच्या शेलोडी येथील जागृती तपोवन आश्रमाचे मठाधिपती, कथाकार म्हणून ख्यातकीर्त असलेले श्री शंकर महाराज कन्याकुमारीच्या श्री विवेकानंद आश्रमात घडलेले. तेथून ते गुरू आदेशाने अरुणाचलात सेवारत झाले व आता शेलोडीत आहेत. त्यांनी चालविलेल्या नापासांची शाळा या उपक्रमातून अनेक मुले डॉक्टर्स, इंजिनियर्स झाली. अकोल्याच्या सहकार नगरात सुरू असलेली त्यांची विष्णुसहस्त्रनाम कथा ऐकली. निव्वळ कथेचे वाचन न करता ती सुलभतेने उलगडून दाखविण्याचे त्यांचे कौशल्य विशेष वाटले. आकलन सुलभता असलेली रसाळ वाणी व आपण कथाकार असल्याच्या वेगळेपणाचा जराही अविर्भाव न बाळगता अतिशय साधेपणाने लहान थोरांशी समरस होणारे निर्गवी व्यक्तिमत्व म्हणून ते मनाला भावले. कथेच्या समाप्तीनंतर आयोजक स्नेही बालाजी मेडिकल्सचे श्री नितीन दांदळे यांच्या निवासस्थानी महाराजांशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. अध्यात्म, आजची बुवाबाजी अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. सामाजिक व राजकीय नेते श्री पंकज जायले, पर्यावरण स्नेही श्री शरद कोकाटे, आमचे कार्यालयीन सहकारी श्री राजू चिमणकर यावेळी समवेत होते. नितीनभाऊ दांदळे यांचे निमंत्रण व खामगाव मधील सहकारी उपसंपादक श्री अनिल गवई यांनीही धरलेला महाराजांच्या भेटीचा आग्रह यामुळे हा योग घडून आला. #KiranAgrawal

No comments:

Post a Comment