At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Showing posts with label Social Events. Show all posts
Showing posts with label Social Events. Show all posts
Sunday, October 27, 2024
स्तब्ध करून जाणारा नाट्यमय प्रवास !
Oct. 05, 2024
स्तब्ध करून जाणारा नाट्यमय प्रवास !
काही शब्द आणि रचना अशा असतात, की ज्या अस्वस्थ करून जातात. त्यातूनच अंतर्मुख व्हायला भाग पडते. असाच एक अनुभव आला तो आमच्या जळगावच्या अतिशय ताकदीच्या व संवेदनशील नाट्यकर्मी शंभूदादा पाटील यांच्या एका प्रयोगातून.
****
इतिहास काळातील अपाला, मदर मेरी, हिपेशीया, रबिया, लैला, मैमून अशी स्त्री पात्रे, त्यांचे दु:ख, वेदना सांगत अश्रूंना वाट मोकळी करून देत पुढे सरकत जाणारा नाट्यमय प्रवास... अनेकांना स्तब्ध करून गेला. निमित्त होते, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (केसीई) संचलित कान्ह ललित कला केंद्र आयोजित आणि परिवर्तन निर्मित 'भिजकी वही' या कवी अरुण कोल्हटकर यांच्या कवितांवर आधारीत नाट्यमय सादरीकरणाचे आणि तेही नवरात्रोत्सवानिमित्त सुरू असलेल्या स्त्री सन्मानाच्या जागराच्या पार्श्वभूमीवर.
****
खूप परिणामकारक असा हा प्रयोग आहे. त्यात सुदीप्ता सरकार, मंजुषा भिडे, सोनाली पाटील, जयश्री पाटील, मोना तडवी, अंजली पाटील, नेहा पवार व विकास वाघ यांनी खूप ताकदीने विविध पात्रे साकारली आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना हर्षदा कोल्हटकर यांची होती. दिग्दर्शक नारायण बाविस्कर, नेपथ्य मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना राहुल निंबाळकर, रंगमंचव्यवस्था गणेश सोनार, पवन भोई यांची होती. अर्थातच, सूत्रधार शंभू पाटील.
****
यानिमित्ताने 'केसीइ' सोसायटीच्या कॅम्पसमध्ये प्रथमच जाणे झाले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे दादांनी स्वागत केले. शिक्षण क्षेत्र व अध्यात्मावर यावेळी त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदी यावेळी समवेत होते.
Thanks Shambhudada... आपल्या आग्रहामुळेच हा योग घडून आला.
#KiranAgrawal #BhijkiVahi #KCESocietyJalgaon
राज्यपाल महोदयांसोबतची भेट...
Sept 11, 2024
राज्यपाल महोदयांसोबतची भेट...
क्षेत्र कोणतेही असो, चाकोरीच्या पलीकडे जाऊन काम करणारी व्यक्तीच लक्षवेधी ठरून जात असते. यातच राज्यपाल महोदयांसारखी राज्याच्या प्रमुख पदावरील महनीय व्यक्ती असेल तर ती बाब खास ठरल्याशिवाय राहात नाही.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देखील नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगरचे दौरे करून प्रोटोकॉलच्या मर्यादा आड न येऊ देता विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला व त्यांच्या भावना, समस्या, अपेक्षा जाणून घेऊन साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राज्याच्या घटनादत्त अधिकार पदावरील सर्वोच्च व्यक्ती आपल्या गावी येऊन आपल्याशी संवाद साधते, आपले म्हणणे ऐकून व समजून घेते ही बाब राजकारणेतर लोकांसाठी खूप समाधानाची तसेच आशादायी ठरते. मा. राज्यपालांच्या या दौऱ्यातूनही तेच घडले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जळगाव येथे आले असता काही संपादक व पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला. विभागीय आयुक्त प्रवीण कुमार गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी समवेत होते. याप्रसंगीची ही आनंद चित्रे...
#GovernorInJalgaon
#KiranAgrawalLokmatJalgaon
Sunday, June 16, 2024
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळ
june 16, 2024
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळ
श्री क्षेत्र पंढरपुरास निघालेल्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा पालखी सोहळा अकोल्यात लोकमत कार्यालयासमोरून मार्गस्थ झाला.
यावेळी 'लोकमत'तर्फे स्वागत करून दर्शन घेतांना.. #KiranAgrawalLokmat #LokmatAkola
Friday, May 31, 2024
बुद्ध भेटतात पावलोपावली... नमो बुद्धाय!
May 23, 2024
बुद्ध भेटतात पावलोपावली... नमो बुद्धाय!
गेल्या पौर्णिमेला मी श्रीलंकेच्या दौऱ्यातील बुद्ध मुर्तींसमवेतचे फोटो शेअर केले होते, यंदा व्हिएतनामच्या दौऱ्यातील काही फोटो.
----कारण, जेथे गेलो तेथे मला बुद्ध भेटले.
खरे तर बुद्ध चराचरात व्यापून आहेत.
माझ्यात आहे, तुमच्यात आहे; सर्वातच आहेत.
स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघणाऱ्या प्रत्येकात बुद्ध आढळतात.
आपण नेमके हेच करत नाही.
शांती, समाधानासाठी इतरांकडे हात पसरतो. याच्या त्याच्याकडे चकरा मारतो, बुवा बाबांच्या नादी लागतो.
--- पण स्वतःच्या आत डोकावत नाही.
स्वतःला शरण जात नाही...
भगवान बुद्धांनी हेच तर सांगितले आहे, स्वतःला शरण जा!
बुद्धम् सरणम् गच्छामि! हे तेच सांगणे आहे..
इतकं साधं, सोपं, सरळ व आपल्या जवळच असलेलं ज्ञान; जे आपल्याला अन्य कोणीही समजावून सांगितलेलं नाही, ते बुद्धांनी समजावलं आहे.
--- स्वतःलाच समजून घेतलं, विवेक व चिकित्सेच्या पातळीवर त्या समजून घेतलेल्या ज्ञानाचा दीप उजळला की अवघ्या संसार सागराला तरुन जाण्याचे बळ लाभल्याखेरीज राहत नाही.
--- स्वतःच्या ज्ञानाचा हा दीप पेटवणे व त्यात आसमंत उजळून काढणे हेच तर आहे बुद्धांचे तत्त्वज्ञान... अत्त दीप भव !
त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा मंत्र आपल्या जीवनाच्या वाटेचा साथीदार आहे खरा, पण आपण तो डोक्यात घेतला नाही.
बुद्धांनी आपल्याला त्रिशरण पंचशील दिले...
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स !
यातून जगण्याचा सोपा मार्ग दाखविला, पण आपणच निर्बुद्ध; की भलत्या मार्गाचा शोध घेऊन स्वतःला अशांत करून घेतले आहे.
--- अजूनही वेळ गेलेली नाही.
आज युद्धाची नव्हे, बुद्धाचीच गरज आहे!
तोच आहे शांती, सद्भाव व सम्यकतेचा खरा मार्ग.
चला, स्वतःला शरण जाऊया...
महाकारूणिक तथागत बुद्धांना त्रिवार शरण, वंदन !!!
#बुद्ध_पौर्णिमा2024 #KiranAgrawal
#vietnamTourDiary
नाशकात मतदान 2024 Loksabha
May 20, 2024
नाशकात मतदानाचे कर्तव्य बजावले ...
#VoteKarNashikkar #LoksabhaElection2024 #KiranAgrawal
Sunday, May 5, 2024
मताचे मोल अनमोल...
April 24, 2024
आपल्या मताचे मोल अनमोल आहे.
तो आपला अधिकार आहे, तसेच ते कर्तव्यही आहे.
मतदानामुळे बोटाला लागणारी शाई हा गर्वाचा, अभिमानाचा विषय आहे.
हेच ते बोट असेन, जे लोकशाहीला बळकट करेन!
त्यासाठी मित्रांनो, न चुकता मतदान करा!
#LoksabhaElection2024 #KiranAgrawal
Wednesday, April 3, 2024
शिक्षणाची बाराखडी गिरवून घेणारी बोराखेडीची शाळा
March 15, 2024
शिक्षणाची बाराखडी गिरवून घेणारी बोराखेडीची शाळा
काल मोताळा येथून बुलढाण्याकडे जात असताना वार्ताहराने आग्रह केला म्हणून बोराखेडीच्या जिल्हा परिषद शाळेत धावती भेट दिली आणि अवाकच झालो.
जिल्हा परिषदेच्या शाळा म्हटल्या की आपल्या मनात मोडकळीस आलेल्या इमारतीपासून अस्वच्छ आवारापर्यंतचे चित्र साकारते, पण या शाळेच्या आवारात गेल्या गेल्या आपण एखाद्या खासगी संस्थेच्या टापटीप शाळेत आल्याचा 'फील' येतो.
सरकारी नोकरीकडे केवळ पगाराचे साधन म्हणून न पाहता लोकसहभाग मिळवून समर्पण भावाने नोकरीतूनही सेवा कशी करता येते याचे उत्तम उदाहरण ठरणारा येथील स्टाफ दिसला.
मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांची सातत्यपूर्ण धडपड व त्यांना तितकीच तोलामोलाची साथ देणाऱ्या विशेषतः महिला शिक्षिका खरेच आपल्या स्वतःच्या लेकरांप्रमाणे या शाळेतील मुलांकडे लक्ष पुरवत आहेत, आणि म्हणून खासगी शाळांची स्पर्धा करतानाही येथील विद्यार्थी संख्या 250 वरून दुप्पट म्हणजे 450 वर गेली आहे.
केंद्र शासनाच्या योजनेत अगोदर आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून लौकिक लाभलेल्या या शाळेने आता राज्य शासनाच्या 'सुंदर माझी शाळा' उपक्रमात सुमारे 30 विविध निकषांमध्ये अव्वल येत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला.
नवीन तंत्राशी जुळवून घेत या शाळेतील मुलांनी स्वच्छतेची महती सांगणारे वर्षभरात तब्बल 45 हजार व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून जनजागरण घडविले ही वेगळीच बाब येथे कळली. शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून इच्छिणाऱ्यांनी या शाळेला भेट देऊन त्यांची उपक्रमशीलता नक्कीच समजून घेण्यासारखी आहे...
धन्यवाद पप्पू राठी जी, आपल्या आग्रहामुळे या शाळेस भेट देऊन तेथली अभिनवता जाणून घेता आली
#ZPSchoolBorakhedi #KiranAgrawal
'जीवन गौरव'...
Feb. 25, 2024
'जीवन गौरव'...
खर तर जीवन म्हणजे खूप मोठा समुद्रच आहे. त्याची अथांगता न मोजता येणारी. सुख दुःख, विविध प्रसंग अन अनुभवांच्या अगणित लाटा झेलत एखाद्या खडकावर क्षणभर विसावावं तसा हा प्रवास.
आली लाट की एखाद्या खडकावर आसरा घ्यायचा, आणि गेली लाट की पुन्हा पोहायला लागायचं; असंच तर सुरू आहे जीवन.
त्यात मागे वळून बघितलं, तर जीवन अजून जगायचंच आहे असंच राहून राहून वाटतं. इतकं काही शिकायचं, करायचं, फिरायचं, अनुभवायचं राहून गेलं की त्याची जाणीव अस्वस्थ करून जाते.
त्यामुळे आजवरच्या धकाधकीत गौरवा योग्य आपण काय केलं हा प्रश्नच पडतो.
तथापि, शिक्षक साहित्य संघाच्या भावना व भूमिकेचा आदर करीत तेल्हारा येथील 8व्या शिक्षक साहित्य संमेलनात जीवनातला पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात साहित्यिक, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख यांच्या हस्ते व डॉ. प्रतिमाताई इंगोले आदींच्या उपस्थितीत स्वीकारला.
यापुढच्या उर्वरित जीवनात अधिक चांगले कार्य करण्यासाठीची प्रेरणा त्यातून नक्कीच मिळेल.
धन्यवाद शिक्षक साहित्य संघ, जयदीप सोनखासकर, संघर्ष सावरकर, शिवराज जामोदे ...
#KiranAgrawal
माणूसपण जागवूया...
Feb. 26, 2024
माणूसपण जागवूया...
सभ्यता व संस्कृतीच्या संवर्धनासाठी शिक्षण आणि साहित्य गरजेचे आहे. बालपणाच्या विद्यार्थी दशेपासून माणूस घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असणारा शिक्षक हा घटक त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
विद्यार्थी म्हणून शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणवून घेतली जाते. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. या देशातल्या समृद्धतेने व विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...' या प्रतिज्ञेतील अभिमान वास्तवात रुजविण्याचा व संवेदना जपणारे माणूसपण जागविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कोरोना नंतरचे शिक्षण व एकूणच जीवनही बदलून गेले आहे. आता त्याहीपुढे जाऊन AI म्हणजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आले आहे. ते मोठे आव्हानात्मक असल्याने त्याला तोंड देताना संवेदना व माणुसकीच्या जपणूकीची गरज अधिक आहे... इति मुद्दे शिक्षण साहित्य संमेलनात मांडलेत.
****
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि शिक्षक साहित्य संघ आयोजित आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे पार पडले. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'बारोमास'कार डॉ. सदानंद देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या संमेलनात प्रख्यात लोककवी 'तिफन'कार प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले, वऱ्हाडी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. रावसाहेब काळे, साहित्य मंडळाचे सदस्य व कादंबरीकार पुष्पराज गावंडे, गीतकार प्रा. डॉ. गोविंद गायकी, हास्य अभिनेते किशोर बळी आदी मान्यवरांनी सहभाग नोंदविला, ज्यामुळे संमेलनाची उंची वाढली.
या संमेलनाच्या समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषविण्याची संधी मला लाभली. त्यानिमित्ताने शिक्षक व साहित्यिकांशी संवाद साधता आला.
उपक्रमशील शिक्षक तुळशीदास खिरोडकर व सहकारी राजू चिमणकर प्रवासात सोबत असल्याने विविध विषयांवर छान गप्पा झाल्या. परतीच्या वाटेवर श्री वांगेश्वराचे दर्शनही झाले.
Thanks to Jaydeep Sonkhaskar, Shivraje Jamode, Sangharsh Sawarkar and all..
#ShikshakSahityaSammelanTelhara #KiranAgrawal
Tuesday, February 27, 2024
संत गुरू महाराजांना विनम्र अभिवादन..
feb 24, 2024
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देऊन सर्वधर्मसमभावाचा विचार आपल्या दोह्यांमधून मांडणारे संत गुरू रविदास महाराज यांची आज जयंती. यानिमित्त अकोला चर्मकार फोर प्लस ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र चिमणकर व हरीश उंबरकर यांनी लोकमत कार्यालयात येऊन संत गुरू रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली. समवेत आमचे सहकारी राजू चिमणकर.
संत गुरू महाराजांना विनम्र अभिवादन..
#KiranAgrawal
संत सानिध्याचे सौभाग्य...
17 Feb, 2024
संत सानिध्याचे सौभाग्य...
श्री श्याम सेवक मंडळ ट्रस्ट नाशिक द्वारा प्रख्यात आंतरराष्ट्रीय कथावाचक श्री किरीट भाईजी यांच्या खाटू नरेश श्री शाम बाबा यांच्या जीवनावरील कथेला आज नाशकात प्रारंभ झाला.
या कथा स्थळाचे श्री गणेश पूजन व होम हवन करण्याचे भाग्य मला लाभले.
सर्वश्री नेमीचंद जी पोद्दार, आयोजक कमल टीबडेवाल, उद्योगपती ओम व सौ वीणा गर्ग, दीपक अग्रवाल आदीनी यावेळी कथा पूजन केले.
कथेत श्री गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद ... च्या रसधारेत उपस्थित न्हाऊन निघालेत
#KiranAgrawal #ASN #KiritbhaijiKatha #ABN
Saturday, January 27, 2024
गो-पालन व तृष्णा तृप्तीचे शिल्प..
Jan 22, 2024
गो-पालन व तृष्णा तृप्तीचे शिल्प..
गोरक्षण संस्थानला लागून गोरक्षण रोडवर साकारलेल्या गोमुख शिल्प व कारंजाचे लोकार्पण करण्याचा मान संस्थेचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया यांच्यामुळे लाभला.
प्रख्यात कलाप्रेमी सतीशजी पिंपळे यांच्या कल्पकतेतून सुमारे तीन महिन्यांच्या परिश्रमातून हे शिल्प साकारले असून, गोकुळातील श्रीकृष्णाचे गोपालन व तृष्णा तृप्तीची सेवा याचा सुरेख मेळ यात साधण्यात आला आहे.
1868पासून गोधन सेवेत कार्यरत गोरक्षण संस्थेतर्फे गोमातांचे रक्षण, पालन, पोषण, सेवा, चिकित्सा व उपचार अशा विविध पातळ्यांवर कार्य केले जात असून, दूध व खिचडी वाटपासारखे अन्य सेवा कार्यही अव्याहत सुरू आहे.
गोरक्षण रोडवरून जातांना क्षणभर थांबुन न्याहाळावे, असे हे शिल्प आहे.
Thanks to Shri. Deepakkumarji Bhartiya ...
#kiranAgrawal #GorakshanAkola
कण कण मे है राम...
Jan. 22, 2024
कण कण मे है राम...
राम हे फक्त नाव नाही, तर ती शौर्य, स्नेह, मर्यादा, उत्तमोत्तम, आत्मविश्वासाची अनुभूती, प्रेरणा, ऊर्जा आहे.
आयोध्या नगरीत प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या आजच्या ऐतिहासिक दिनी संपूर्ण भारतभर जणू दिवाळी साजरी होत आहे. अवघा देश राम रंगी रंगला आहे. कणकण मे है राम.. ची प्रचिती यातून येत आहे.
याचनिमित्त अकोल्यातील प्रख्यात व 155 वर्षांची परंपरा असलेल्या पुरातन श्री गोरक्षण संस्थेत प्रभू श्रीराम पूजनाचे सौभाग्य लाभले.
प्रख्यात कथावाचक, आचार्य प. पु. डोंगरे महाराज स्थापित श्री व्यंकटेश्वराची आरती, गोपूजन केले. तुलादानाने गोखाद्य दिले गेले. यानिमित्त या परिसरात वावरताना एका वेगळ्याच अनामिक ऊर्जेची अनुभूती लाभली.
योगायोग असा की, अकोल्यातील प्रख्यात समाजसेवी, दानशूर स्व. चिमनलालजी भरतिया व काळूरामजी रुहाटीया यांच्यासोबत युवावस्थेत काम करण्याची संधी मला लाभली होती. या दानशूरांच्या दातृत्वाच्या खुणा अकोल्यात ठायीठायी दिसतात. त्यांचीच पुढची पिढी गोरक्षण संस्थेची धुरा वाहत असून त्यांनी आज आठवणीने बोलावून हा सन्मान दिला.
गोरक्षणचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया, उपाध्यक्ष श्री महेशकुमारजी खंडेलवाल, सचिव श्री विजयकुमारजी जानी, विश्वस्त श्री श्रीप्रकाशजी रूहाटिया, श्री अंकुशजी भरतिया, सुदीपजी नैवेटिया, व्यवस्थापक मनीष विश्वकर्मा, समाजसेवी पुरुषोत्तम शिंदे, अमोल कडू,प्रवीण राउत,नितिन मोडक, प्रवीण काले, गजेंद्र कानकिरड़, जयेश अग्रवाल, मयूरजी सिंघानिया, गोविंदजी केडिया, सतीशजी पीम्पले, पंडित कैलाशनाथ मिश्रा आदि यावेळी उपस्थित होते.
#KiranAgrawal #GorakshanAkola
Tuesday, January 2, 2024
साहित्य सेवेचा बहरलेला 'अंकुर'...
23 Dec, 2024
साहित्य सेवेचा बहरलेला 'अंकुर'...
अंकुर साहित्य संघाच्या 61व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला.
गेल्या वर्षी याच अंकुरच्या धुळ्यातील अधिवेशनात समारोपाच्या समारंभास गेलो होतो. तेव्हाचे माझे भाषण लक्षात ठेवून आयोजकांनी यावेळी मुद्दाम पुन्हा बोलाविले.
अकोला वाशिम संयुक्त जिल्हा असताना मालेगावमध्ये स्थापन झालेल्या व आता अकोला मुख्यालय असलेल्या अंकुर साहित्य संघाने अल्पावधीत 61 साहित्य संमेलने आयोजित करून संपूर्ण राज्यात व राज्याबाहेरही हा संघ पोहोचविला ही खरी साहित्य सेवा म्हणायला हवी.
****
61व्या संमेलनाच्या अध्यक्ष, चाळीसगावच्या प्राचार्य डॉ साधनाताई निकम आहेत. त्यांचे माझे माहेरचे नाते. संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात समाजसेवी प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी केले तर स्वागताध्यक्ष प्रा. ललित काळपांडे आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज दादा गावंडे, चाळीसगावचे डॉ. विनोद कोतकर, अकोल्याचे डा. श्रीकांत काळे, डॉ. प्रमोद काकडे, श्रीमती रेखाताई शेकोकार, शीलाताई गहिलोत आदी मान्यवर व्यासपीठावर समवेत होते.
****
संवेदना व भावभावनायुक्त साहित्यच समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते, त्यातूनच जबाबदारी - कर्तव्याच्या व माणुसकीच्या जाणिवा अंकुरतात; पण हल्ली साहित्यातही स्वमग्नता आकारास येताना दिसत आहे, असे प्रतिपादित करताना आजच्या व्हाट्सअप कल्चर व वाढत्या विद्वेषी वातावरणात समाजाच्या सुदृढ व वैचारिक मशागतीला पूरक ठरणारे साहित्य प्रसविण्याची गरज असल्याची मांडणी केली.
अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे, कार्यावाहक तुळशीराम बोबडे तसेच वासुदेवराव खोपडे, सदाशिव शेळके, मनोहर घुगे, प्रा संजय कावरे, प्रा मोहन काळे आदी पदाधिकाऱ्यांच्या धडपडीतून साहित्य सेवेचा 'अंकुर' आज बहरलेला दिसत आहे.
हिम्मत ढाळे व बोबडे जी यांच्या प्रेमळ आग्रहामुळे पुन्हा या साहित्य उत्सवात सहभागी होता आले,
धन्यवाद हिम्मतराव व तुळशीराम जी...
#AnkurSahityaSangh #AnkurAkola #KiranAgrawal
Thursday, December 21, 2023
एक पणती अशीही...
एक पणती अशीही...
विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समर्पित भावाने काम करणारे तरुण जेव्हा भेटतात, तेव्हा सारेच काही अंधारलेले नाही याची जाणीव होऊन आशावाद जागून जातो.
प्रा राजेश पाटील ताले हा असाच एक युवक, अकोला जिल्ह्यातील माझोड गावचा. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून या तरुणाची युवा सक्षमीकरण व साक्षरतेसाठीची धडपड सुरू आहे.
अकोला व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 75 वाचनालये त्यांनी सुरू केली आहेत. आजवर एक लाखावर पुस्तके जमा करून ती गरजूंपर्यंत पोहोचविली आहेत. भिलार प्रमाणे महाराष्ट्रातील दुसरे पुस्तकांचे गाव म्हणून माझोडला विकसित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आपल्याकडील पुस्तके हवीत म्हणून राजेशचा एके दिवशी फोन आला व तो राहुल ताले सोबत भेटायला कार्यालयात आला. त्याच्याशी चर्चा करताना त्याची धडपड जाणून खूप आनंद झाला. युवाशक्तीचा वापर विधायक कामांसाठी करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. ही अशी तरुण मुलच उद्याची नव्हे, तर आजची आशा आहे.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजय बाबूजी दर्डा यांनी लिहिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांचे 'कुछ जख्म कुछ आवाज' व एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांच्यावरील 'आमचं विद्यापीठ' ही पुस्तके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
दिवाळीतील एक पणती साक्षरतेसाठी म्हणून अश्या प्रयत्नांना समाजाचे पाठबळ लाभयला हवे ...
#LokmatAkola #KiranAgrawal
Sunday, October 8, 2023
निर्माल्य संकलनासाठी अभिनव कलश रथ...
Sept, 27, 2023
निर्माल्य संकलनासाठी अभिनव कलश रथ...
बाप्पा श्री गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे. बाप्पांचे विसर्जन करताना सोबतचे निर्माल्यही नदीत टाकून दिले जाते, ज्यामुळे जल प्रदूषण होते. बरेच जण रस्त्यातही निर्माल्य टाकून देतात, जे पायदळी येऊन अनावधानाने अनादर घडून येतो.
हे टाळण्यासाठीच ऍड. धनश्री देव स्मृती सेवा प्रतिष्ठान व लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन गोल्ड तर्फे अकोल्यात आजपासून निर्माल्य कलश रथ गल्लोगल्ली पोहोचून निर्माल्य संकलन करणार आहे. या निर्माल्यातुन खत निर्मिती करून नंतर ते घरगुती कुंडी धारकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
प्रतिष्ठानचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांच्या संकल्पनेतून ही अभिनव व काळाची गरज बनलेली मोहीम साकारली. या कलश रथाला झेंडी दाखवून रवाना करण्याची संधी मला लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे महासचिव श्री सिद्धार्थ जी शर्मा, एकपात्रीकार दिलीप देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, डॉ. राजकुमार हेडा, अनिता उपाध्याय, अंशु जैन आदी. यावेळी उपस्थित होते.
#KiranAgrawal
Tuesday, September 12, 2023
आस्थेचा उत्सव, श्रद्धेचा पूर ...
sept. 11, 2023
आस्थेचा उत्सव, श्रद्धेचा पूर ...
अकोल्याची कावड यात्रा म्हणजे आस्थेचा उत्सव असतो, ज्यात श्रद्धेचा पूर आलेला पहावयास मिळतो. ग्रामदैवत श्री राज राजेश्वरास जलाभिषेकासाठी होणाऱ्या या कावड महोत्सवाचे सर्वोत्कृष्ट महाकव्हरेज करण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने केला, त्याचा मनस्वी आनंद आहे.
यंदाही या उत्सवात सक्रियपणे सहभागी झालो. गांधी चौकात मानाच्या श्री राज राजेश्वर पालखीचे लोकमत तर्फे स्वागत केले. सार्वजनिक उत्सव समितीचे राजेश भारती, पप्पू मोरवाल, भाजपा नेते डॉ. अशोक ओलांबे तसेच शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार तुकाराम बिडकर, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीकिशनजी बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी महापौर मदन भरगड, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आदींच्या यात भेटी झाल्या.
भक्तीचा गुलाल उधळून घेत 'हर बोला महादेव'च्या निनादात हा सोहळा अनुभवणे विलक्षण समाधानाचे असते.
#LokmatAkola #AkolaKawad #KiranAgrawal
Tuesday, August 29, 2023
खेळ मांडीयेला... आठवणींचा!
August 29, 2023
खेळ मांडीयेला... आठवणींचा!
खेळण्याचे वय सरले, पण काही कार्यक्रमांच्या निमित्ताने जेव्हा कसली संधी मिळते तेव्हा खेळायचा मोह काही टाळता येत नाही.
नाशकात असताना 'लोकमत'च्याच वतीने शासनाच्या क्रीडा विभागाच्या सहकार्याने विविध खेळाडूंच्या खेळांचे प्रात्यक्षिक करीत 2019 मध्ये एक स्पोर्ट रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी अशीच संधी लाभली होती.
आज #राष्ट्रीय_क्रीडा_दिन निमित्ताने त्याची आठवण झाली.
#KiranAgrawal
Wednesday, July 12, 2023
दृष्टी बदलो, दृष्टीकोन बदल जाएगा ...
july 09, 2023
दृष्टी बदलो, दृष्टीकोन बदल जाएगा ...
जात, पंथ, संप्रदाय की संकीर्णता बढ रही है, पर सारा खेल हमारी दृष्टि का है। हम हर व्यक्ती की ओर आज शक से देखने लगे है। यदि हम दृष्टि बदल देंगे, तो दृष्टिकोण भी बदल जाएगा।
हमारे मन एवं विचारों की अशुद्धि के कारण ही भाषा, धर्म एवं संप्रदायों से जुड़ी संकीर्णता को बढ़ावा मिलता है। संत, महापुरुषों के विचारों को यदि सही मायने में अपनाया और जीवन में उतारा जाए, इन्सानियत से जिया जाए तो जीवन की सारी नकारात्मकता समाप्त हो जाएगी...
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई द्वारा अकोला में आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी मे प्रमुख वक्ता के नाते अपने विचार रखने का मौका मिला।
अकादमी के कार्याध्यक्ष डाॅ. शीतला प्रसादजी दुबे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स क़े अध्यक्ष निकेश गुप्ता, अकादमी के सदस्य आनंद सिंहजी, डॉ संजय सिंहजी (मुंबई), पत्रकार संघ के अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, बिजीई सोसायटी के उपाध्यक्ष अभिजित परांजपे जी आदी महानुभावो का सानिध्य मिला।
साहित्य अकादमी क़े अशासकीय सदस्य, संगोष्ठी के आयोजक श्यामजी शर्मा के आग्रह के कारण यह सौभाग्य प्राप्त हुवा, साधुवाद श्याम जी...
#HindiSahityaAkadmi #KiranAgrawal
Subscribe to:
Posts (Atom)