Wednesday, May 3, 2023

गुणवंतांच्या सन्मानाचा गौरवशाली सोहळा...

April 26, 2023 गुणवंतांच्या सन्मानाचा गौरवशाली सोहळा...
महाराष्ट्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा म्हणजे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस सोहळा. मुंबईच्या वरळीतील NSCI डोम येथे यंदाचा हा कार्यक्रम होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया आदी मान्यवर या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमतचे सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक, युवा नेतृत्व श्री ऋषी दर्डा यांच्या कल्पकतेतून या अवॉर्डची संकल्पना पुढे आली आणि आज ती राज्यातील गुणवंतांच्या गौरवाचा ब्रँड बनली आहे. या सोहळ्यासाठी समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर यांच्यासह चक्रधर दळवी, नंदकिशोर पाटील (औरंगाबाद), किरण अग्रवाल (अकोला), रवी टाले (जळगाव), मिलिंद कुलकर्णी (नाशिक), धर्मराज हल्ल्याळे (लातूर), गजानन चोपडे (अमरावती), राजेश निस्ताने (नांदेड), यदु जोशी (मुंबई) आदी संपादकीय टीम मुंबईत दाखल. #LMOTY #LokmatMaharashtrianOfTheYear #KiranAgrawal

No comments:

Post a Comment