Wednesday, May 3, 2023

#LMOTY .. गुणवंतांचा गौरव सोहळा!

April 26, 2023 #LMOTY .. गुणवंतांचा गौरव सोहळा!
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस वितरण सोहळा म्हणजे आयोजन, नियोजनातील कुशलतेसह भव्य दिव्यतेचा उत्कृष्ठ नमुना. मुंबईच्या NSCI डोम येथे हा सोहळा डोळे दिपावणाऱ्या अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची अमृता फडणवीस व खासदार अमोल कोल्हे यांनी, तर बिजनेस टायकून कुमार मंगलम बिर्ला यांची लोकमतचे सह व्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक ऋषी बाबूजी दर्डा यांनी घेतलेली मुलाखत यात विशेष आकर्षणाचा केंद्र ठरली. अभिनेते रितेश देशमुख, वरूण धवन यांच्यासारख्या सिताऱ्यांनी सोहळ्यात अधिकच रंगत आणली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, लोकमत मीडिया समूहाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार डॉ. विजयबाबूजी दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ तथा राज्याचे माजी मंत्री राजेंद्रबाबूजी दर्डा, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल भाई पटेल, राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत, उद्योगपती गौतम सिंघानिया आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
लोकमतचे युवा नेतृत्व श्री ऋषीबाबुजी दर्डा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व महाराष्ट्रातील गुणवंतांच्या गौरवाचा ब्रँड ठरलेल्या या सोहळ्यास विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची मांदियाळी होती. लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक देवेंद्र बाबूजी दर्डा स्वतः मान्यवरांचे स्वागत करून प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करीत होते. महाराष्ट्राच्या मनामनात लोकमत का वसला आहे याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने आल्याशिवाय राहात नाही.
लोकमत व्यवस्थापन प्रमुखांसह राज्यातील लोकमतच्या विविध आवृत्तीचे संपादक सहकारींची या सोहळ्यातील ही काही सहभाग चित्रे... #LokmatMaharashtrianOfTheYear #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment