Thursday, December 21, 2023

खरेदीदारांचे भाग्यही उजळले...

07 Dec. 2023 खरेदीदारांचे भाग्यही उजळले...
दिवाळीत अकोल्यातील विविध आस्थापनांमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 'ये दिवाली इनामोवाली...' या टॅग लाईनने लोकमत फेस्टिवल बोनांझा 2023 योजना घोषित करण्यात आली होती. विविध व्यवसायातील 23 आस्थापनांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडून दिवाळीची खरेदी करणाऱ्या बंधूंसाठीचा लकी ड्रॉ काल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय ठमके व महाबीजच्या मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक श्री प्रकाश ताटर यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सेंटर पॉईंट येथे एका सोहळ्यात काढण्यात आला. टीव्हीएस ज्युपिटरसह तब्बल 300पेक्षा अधिक बक्षीसांची लयलूट असलेल्या या योजनेतील भाग्यवंतांची नावे जाणून घेण्यासाठी लोकमत वाचायला हवा. या कार्यक्रमादरम्यान अतिथी व अकोल्यातील जाहिरात एजन्सीजचे संचालक सर्वश्री श्याम सारभुकन, विजय रांदड, बबनराव ठाकरे, माई, युवराज कदम तसेच युनिट हेड आलोक कुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा व जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडेय आदींसमवेतचे आनंद चित्र... #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment