Thursday, December 21, 2023

मातीचा गंध अन शौर्याची गाथा...

11 Nov. 2023 मातीचा गंध अन शौर्याची गाथा...
दिवाळीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही लोकमत कॅम्पस क्लब व समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. विविध शाळकरी मुलांनी यात 75 किल्ले साकारले. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा यानिमित्ताने मुलांनी गायीली. गौरवशाली गड किल्ल्यांचा अभ्यास केला. यातूनच तर होणार शिवप्रभूंच्या जाज्वल्य इतिहासाची व आपल्या कणखर, अभिमानी व स्वाभिमानी मराठी बाण्याची जपणूक. हल्लीची मुले मोबाईलच्या आहारी गेली म्हणून पालक वर्ग चिंतित असतो, शिवाय शहरी मुलांच्या अंगाला माती लागतेच कुठे?, पण किल्ले साकारताना बच्चे कंपनी संपूर्ण दिवस मोबाईलपासून दूर राहिली व छान मातीत खेळली. त्यांचे अवघे अंग मातीच्या गंधाने माखले. दिवाळीच्या सुट्टीचा त्यांचा पहिला दिवस असा मातीच्या संस्काराने समृद्ध झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक शरद कोकाटे, स्कुल कमिटीचे किशोर वाकुडकर, राजेश बाठे, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा आदी व्यासपीठावर समवेत होते. शक्तीच्या या उत्सवाशी भक्तीची नाळ जोडून 'रामायणा'तील प्रसंगही मुलांनी साकारून वातावरण भारून टाकले. समर्थ एज्युकेशन संस्थेचे प्रमुख प्रा. नितीन बाठे व त्यांच्या सर्व स्टाफने ऐन वसुबारसेच्या दिवशी परिश्रम घेऊन मुलांच्या कलागुणाला विकसित होण्याची संधी दिली. Thanks to Bathe Sir.. #LokmatAkola #KiranAgrawal #LokmatCampusClubAkola

No comments:

Post a Comment