Thursday, December 21, 2023

एक पणती अशीही...

एक पणती अशीही...
विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समर्पित भावाने काम करणारे तरुण जेव्हा भेटतात, तेव्हा सारेच काही अंधारलेले नाही याची जाणीव होऊन आशावाद जागून जातो. प्रा राजेश पाटील ताले हा असाच एक युवक, अकोला जिल्ह्यातील माझोड गावचा. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून या तरुणाची युवा सक्षमीकरण व साक्षरतेसाठीची धडपड सुरू आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 75 वाचनालये त्यांनी सुरू केली आहेत. आजवर एक लाखावर पुस्तके जमा करून ती गरजूंपर्यंत पोहोचविली आहेत. भिलार प्रमाणे महाराष्ट्रातील दुसरे पुस्तकांचे गाव म्हणून माझोडला विकसित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आपल्याकडील पुस्तके हवीत म्हणून राजेशचा एके दिवशी फोन आला व तो राहुल ताले सोबत भेटायला कार्यालयात आला. त्याच्याशी चर्चा करताना त्याची धडपड जाणून खूप आनंद झाला. युवाशक्तीचा वापर विधायक कामांसाठी करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. ही अशी तरुण मुलच उद्याची नव्हे, तर आजची आशा आहे. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजय बाबूजी दर्डा यांनी लिहिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांचे 'कुछ जख्म कुछ आवाज' व एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांच्यावरील 'आमचं विद्यापीठ' ही पुस्तके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दिवाळीतील एक पणती साक्षरतेसाठी म्हणून अश्या प्रयत्नांना समाजाचे पाठबळ लाभयला हवे ... #LokmatAkola #KiranAgrawal

No comments:

Post a Comment