At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Friday, July 31, 2020
Thursday, July 30, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 30 July, 2020
CoronaVirus : साखळी तुटतेय हे दिलासादायी!
किरण अग्रवाल
जिवाशीच गाठ घालून देणाऱ्या कोरोनाची साखळी हळूहळू तुटू पाहते आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या बाधितांची संख्या कमी होत असून, योग्य त्या उपचाराअंती कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरवापसी होत असलेल्यांचे प्रमाणही वाढले आहे; त्यामुळेच देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊ घातला आहे हे दिलासादायकच असले तरी, याबाबत बाळगावयाच्या सावधानतेबद्दल दुर्लक्ष होऊ न देणेही गरजेचे आहे; पण अनेक ठिकाणी होणारी गर्दी पाहता, यासंबंधीची चिंता दूर होऊ नये.
कोरोनाबद्दल निर्माण झालेल्या भयाची स्थिती आता काहीशी निवळत आहे. शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतर गेल्या दोन आवर्तनात अटी-शर्तींवर काही व्यवहार सुरू करून जनजीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न चालविला आहे, याच मालिकेत अनलॉक-३ची घोषणा झाली असून, त्यात जिम्स काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदीही उठणार आहे. अर्थात काही ठिकाणची रुग्णसंख्या अजूनही वाढतीच असली तरी लॉकडाऊन हा त्यावरील उपाय व पर्याय ठरू शकत नाही हे आता सर्वांनीच समजून घेतले आहे. डॉ. मिलिंद वाटवे यांच्यासारख्या संशोधक तज्ज्ञांनी तर हे सांगितले आहेच, शिवाय लॉकडाऊनमध्ये होणारे नुकसानही सर्वांनी सोसून झाले आहे; तेव्हा तसे होऊ द्यायचे नसेल व अर्थचक्र आता रडतखडत का होईना जे सुरू झाले आहे, ते पुन्हा थांबवायचे नसेल तर सावधानता बाळगत वाटचाल करण्याचीच भूमिका घेणे इष्ट आहे. अनलॉक-३कडे त्याचदृष्टीने सकारात्मकतेने बघितले जावयास हवे. मिळालीय मान्यता म्हणून अनिर्बंधता किंवा बिनधास्तपणा अनुभवास येऊ नये हे यात महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर न पडण्याचा व बाहेर पडले तरी सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचा मनोनिग्रह यासाठी गरजेचा ठरणार आहे. पण ते होत नसल्यामुळे राज्यात लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवावा लागला आहे.
खरे तर आतापर्यंत कोरोनाबाधित व बळींची संख्या प्राधान्याने समोर येत होती; परंतु अलीकडे काही दिवसांपासून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही समोर येऊ लागल्याने मनातील भीतीचे वातावरण दूर होण्यास मदत घडून येत आहे. जगभरातील एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केल्याचे वृत्त आहे तसेच देशातील बरे होणाऱ्यांचा आकडाही दहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता दिवसाला दहा हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचाही टप्पा गाठला गेला आहे. मृत्युदर हा दिवसेंदिवस कमी होत चालला असून, रुग्ण बरे होण्याचा टक्का वाढत चालला आहे, ही सारी दिलासादायक चिन्हे आहेत. लवकरच विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे आगमन होऊ घातले आहे, त्यामुळे बाप्पा येईपर्यंत कोरोनाचे संकट ब-यापैकी दूर झालेले असेल अशी अपेक्षा करता यावी.
महत्त्वाचे म्हणजे, चाचण्या वाढविल्यामुळेच कोरोनाची साखळी तोडणे शक्य झाले आहे. शासनाबरोबरच सामाजिक व सेवाभावी संस्था पुढे आल्याने आता सर्वत्रच मोठ्या प्रमाणात चाचण्या होऊ लागल्या आहेत. त्या करून घेण्याची निकड सामान्यांनाही जाणवू लागल्याने भय न बाळगता लोक चाचण्या करून घेत आहेत. दिल्लीत प्रतिदिनी वीस हजार चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत दिवसाला दहा हजार चाचण्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर नाशिकसारख्या ठिकाणी प्रतिदिनी हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यातून होणारे ट्रेसिंग हे पुढील संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी ठरत आहे. यातील लक्षवेधी बाब अशी, की आता आतापर्यंत कोरोनाच्या भयामुळे कॉरण्टाइन राहिलेले अनेक लोकप्रतिनिधी आता घराबाहेर पडलेले दिसून येत आहेत. खासदार व आमदारच नव्हे, तर महानगरपालिका व नगरपालिकांमधील नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सरपंचदेखील आपापल्या परिसरात कोरोनाच्या चाचण्या करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असून, प्राथमिक तपासणीसाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना सोबतचे हे युद्ध केवळ एकटे शासन-प्रशासन तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना लढून चालणार नाही तर त्यांच्या साथीला लोकसहभाग लाभणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कोरोनाच्या चाचण्यांसाठी लोकसेवकांकडून घेतला जात असलेला पुढाकार लोकचळवळीचे स्वरूप धारण करताना दिसत आहे. जागोजागी तसे झाले तर उत्तमच, कारण कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तपासणी म्हणजे ट्रेसिंग होणे गरजेचे आहे.
Monday, July 27, 2020
डॉक्टरही शेवटी माणूसच आहे ना!...
21 July, 2020 Nashik ·
डॉक्टरही शेवटी माणूसच आहे ना!...
आजच्या कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकालाच आपल्या जीवाची पडली आहे, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे काय?
डॉक्टरांच्या बरोबरच रूग्णालयातील नर्सेस, वार्ड बाय, मावश्या असे सर्वच घटक अक्षरशः मृत्युच्या दाढेत राहून सेवा बजावत आहेत, परंतु कुठेतरी अपवादात्मक एखादी चुकीची घटना घडते आणि संपूर्ण समाज या सेवार्थींकडे संशयाने पाहू लागतो.
चुकीचे व कृतघ्नतेचेच आहे हे...
शेवटी डॉक्टरचे देखील कुटुंब असते, त्याला देखील भावना असतात, भीती असते; कोरोनाचा रुग्ण तपासताना व त्याच्या सानिध्यात राहताना डॉक्टरला भीती वाटत नसेल का, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात किती कालवाकालव होत असेल? पण ते जीवाची बाजी लावून आपला सेवाधर्म बजावत असतात. याकडे समाज डोळसपणे बघतच नाही.
एकीकडे कोरोना योद्धे म्हणून त्यांना संबोधायचे, त्यांच्यासाठी टाळ्या व थाळ्या वाजवायच्या आणि दुसरीकडे एखाद्या खलनायकासारखे त्यांच्याकडे संशयाने पहायचे; हे केवळ अन्यायकारकच नाही तर त्यांना व्यथित व निरूत्साही करणारे किंवा त्यांच्यात निगेटिव्हिटी आणणारेच आहे.
माध्यमे व विशेषतः सोशल मिडियातही त्यांची चुकीची प्रतिमा चितारली जातांना दिसून येते.
शासन, समाज, माध्यमे असे सारेच घटक केवळ दोषच लादणार असतील तर मग डॉक्टरांनी करायचे काय आणि कुणासाठी?
... हे बदलायलाच हवे, कारण ही मेडिकल इमर्जन्सी आहे.
सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील हा संपूर्ण घटक प्लेगच्या साथीनंतर कोरोनाविरुद्ध रणांगणात झोकून देऊन लढाई लढत आहे
तेव्हा ही लढाई जिंकायची असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटकांचा सन्मान ठेवून त्यांचेही मनोबल उंचावणारे वर्तन व व्यवहार समाजाकडून अपेक्षित आहे.
....................
ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लोकमत संवाद सत्रात नाशकातील प्रथितयश डॉक्टर्सनी कोरोनाशी संबंधित आव्हाने याबद्दल मार्गदर्शन करताना केले मन मोकळे ...
Dr Sameer Chandatre (IMA President), Dr Vijay Kakatkar, Dr. Satish Patil, Dr. Raj Nagarkar, Dr Sharad Patil, Dr Manoj Chopada, Dr Nivedita Pawar, Dr Aniruddha Dharmadhikari, Dr Sushil Parakh, Dr Dinesh Wagh, Dr Mangesh Jadhav, Dr Prajakata Lele (IMA Voice President) participated in this session.
या संवाद सत्राचे वृत्तांकन वाचा उद्याच्या लोकमत #हॅलो_नाशिक मध्ये...
आजच राखून ठेवा सोमवारचा (दि 27) आपला #लोकमत
#LokmatIMA #CoronaIMA #LokmatSamvad #Doctors #NashikIMA

Thursday, July 23, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 23 July, 2020
आत्मनिर्भरतेबरोबरच आत्मविश्वासही गरजेचा !
किरण अग्रवाल
संकटे येतात व जातात; परंतु त्यावर मात करण्याची जिद्द व त्याबाबतचा विश्वास मनात असला तर कोणतेही संकट कुणालाही अडवू शकत नाही. कोणाचे जगणे मुश्कील करू शकत नाही, की कोणाची प्रगती रोखू शकत नाही. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात व्यावहारिकदृष्टीने दिल्या गेलेल्या आत्मनिर्भरतेच्या संदेशाला आत्मविश्वासाची जोड लाभणे त्यासाठीच गरजेचे आहे. या आजारातून आपण बरे होऊ शकतो, यासंबंधीचा विश्वास जागविण्यासाठी भारतीय जैन संघटनेसारख्या संस्थांनी योजिलेल्या ‘मिशन झिरो’सारख्या उपक्रमांचे महत्त्व म्हणूनच मोठे आहे.
राज्याच्या काही शहरांमध्ये कोरोनाचा असा काही कहर सुरू आहे, की त्यामुळे भीतीच वाटावी. अशा ठिकाणी सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयातील खाटाही कमीच पडत असल्याने हाउसफुल्लचे बोर्ड लागल्याच्या वार्ता आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्ती अधिकच घाबरून जाणे स्वाभाविक ठरले आहे. अर्थात शासन प्रशासनातर्फे ठिकठिकाणी कोविड सेंटर्सची उभारणी करून काळजी घेण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेतच, मात्र बाधितांची संख्या अशा वेगाने वाढते आहे की, या यंत्रणा अपुऱ्या पडाव्यात. परिणामी कोरोनाची तपासणी व त्याचे निदान सोडाच; परंतु अन्य आजारांसाठी रुग्णालयाची पायरी चढणेदेखील अनेकांसाठी मुश्कील बनले आहे. कसे होईल आपले, अशी भीती अनेकांच्या मनात दाटली आहे. या भीतीमधून रक्ताच्या नातेसंबंधातील रुग्णांकडेसुद्धा काही ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यामुळे सामाजिक पातळीवरील संबंधांचे नवेच प्रश्न आकारास येऊ पहात आहेत. अशा स्थितीत सामाजिक भान जपत प्रत्येकच अडीअडचणीच्या वा संकटाच्या काळात मदतीसाठी धावून येणाºया भारतीय जैन संघटनेने पुन्हा पुढे येत व शासनाला मदतीचा हात देत सेवा कार्यास जुंपून घेतले आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
खरे तर अलीकडच्या काळात अनेक सामाजिक संघटना या केवळ त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वासाठी अस्तित्वात असल्याचे प्रकर्षाने दिसून येते, त्यामुळे सामाजिक कामांचे संदर्भही बदलून गेलेले दिसून येतात; परंतु भारतीय जैन संघटनेने आपल्या सेवाकार्याच्या बळावर निस्पृहतेचा वेगळा ठसा उमटविण्यात यश मिळविले आहे. या संघटनेचे अर्ध्वयू शांतिलाल मुथा या व्यक्तीची या संघटनेमागील प्रेरणा व ऊर्जा स्तिमित करणारीच आहे. मनाची संवेदनशीलता काय असू शकते व त्यातून ‘एैसी कळवळ्याची जाती’ याचा प्रत्यय कसा येऊ शकतो, हे मुथा यांच्याकडे पाहून कळावे. त्यामुळेच जिथे शासन प्रशासनही एकटेच पडताना किंवा त्यांना मर्यादा आलेल्या दिसून येतात, तिथे मुथा यांची संघटना धावून जाताना दिसून येते. सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यांपासून ते लातूरच्या किल्लारी व सास्तूरमध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेनंतर तेथील मदतकार्यासाठी धावून जाण्यापर्यंतची या संघटनेच्या सेवेची उदाहरणे देता येणारी आहेत. दूर कशाला जायचे, गेल्या दोनेक वर्षापूर्वी दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागू नये म्हणून अभिनेते आमीर खान यांच्या पानी फाउण्डेशनच्या सहकार्याने व स्थानिक नागरिकांच्या श्रमदानाने या संघटनेने अनेक ठिकाणी तलावांमधील गाळ उपसून पाणी साठवण्यासाठीची जी मोहीम हाती घेतली होती व त्यासाठी शेकडो जेसीबी उपलब्ध करून दिले, ते अजूनही जनतेच्या विस्मृतीत गेलेले नाही. कोरोनाचेच घ्या; लॉकडाऊन झाल्यावर स्थलांतरितांचे जे लोंढे गावाकडे परतू लागले होते त्यांच्या जेवणा-खाण्यासाठी व हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी या संघटनेने जागोजागी अन्नछत्र चालवून लाखोंच्या तोंडी जो घास भरवला ते तर ताजे उदाहरण आहे.
एवढ्यावर न थांबता भारतीय जैन संघटना आता कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठीही पुढे आली असून, फोर्स मोटर्सच्या सहकार्याने या संघटनेने सुमारे ४९ शहरांमध्ये २७९ मोबाइल डिस्पेंसरी व्हॅन्सच्या माध्यमातून कोरोनामुक्तीसाठीचा ‘मिशन झिरो’ उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य सामाजिक संस्थांना सोबत घेऊन सुरू करण्यात आलेल्या या मिशनमुळे संशयित रुग्णांचे ट्रेसिंग होऊन व त्यांना वेळेवर उपचार मिळून कोरोनामुक्तीकडील त्यांची वाटचाल सुलभ होण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे निदान व उपचार वेळेवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात असलेली भीती दूर होऊ शकेल. आजच्या संकटसमयी कोरोनाबाबत मनामनात घर करून असलेली भीती दूर होणेच प्राधान्याचे आहे. भीतीने मनुष्य खचतो, म्हणून संकटाशी लढण्याची जिद्द व आत्मविश्वास त्यामध्ये जागवणे गरजेचे आहे. त्याचसाठी कोरोनाला घाबरू नका तर त्याला धैर्याने सामोरे जा असा संदेश देत आत्मविश्वास जागविण्याकरिता हे मिशन हाती घेण्यात आल्याचे शांतिलाल मुथा यांनी म्हटले आहे. तेव्हा हे मिशन तडीस जावो आणि शासन तसेच सामाजिक संस्था-संघटनांच्या परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या भयापासून मुक्ती मिळो याच अपेक्षा.
https://www.lokmat.com/editorial/confidence-needed-along-self-reliance-a309/

Monday, July 20, 2020
Thursday, July 16, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 16 Jully, 2020
समाजमाध्यमांवरील सुशिक्षित अंगठेबहाद्दर...
किरण अग्रवाल
मनुष्याचे वर्तन वा व्यवहार त्याच्या शिक्षणानुसार असतेच असे नाही, किंबहुना बऱ्याचदा सामाजिक व्यवहारात अनेकजण अशिक्षितच राहिल्याचे प्रत्ययास येते. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञान महत्त्वाचे असते ते याच संदर्भाने. अर्थात काळ बदलतो तसे संदर्भही बदलतात. अलीकडच्या काळात शिक्षित व अशिक्षिततेचा विचार न करता संप्रेषणाला महत्त्व देण्याची भूमिका त्यामुळेच बळावली आहे. बोलण्यावर किंवा शब्दांवर जाऊ नका, भावना लक्षात घ्या असे याबाबत म्हटले जाते. हे बोलणे वा लिहिणेही कमी करण्यासाठी काही रेडिमेट पर्याय उपलब्ध असले तर अधिकच सोयीचे होते. भौतिक प्रगतीचे टप्पे ओलांडताना मनुष्याचे श्रम कमी करण्याकडेही लक्ष पुरविले जात असतेच, त्यामुळे शब्दांऐवजी भावनांची प्रतीके वापरण्याकडे कल वाढला आहे. सध्याच्या अपरिहार्य व अविभाज्य ठरलेल्या आणि विशेषत: तरुण पिढी ज्यावर पडीक असते त्या समाजमाध्यमात तेच होताना दिसत आहे.
कोरोनापासून बचावण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व त्यानंतरच्या घराबाहेर पडण्यावरील निर्बंधांमुळे अनेकांच्या हाताला जे काम लाभले आहे, त्यात सोशलमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण पिढी तर यात माहीर आहेच व दिवसभर ती त्यात गुंतलेली असतेच, परंतु घरातील ज्येष्ठ मंडळीही आता सक्तीने लाभलेल्या रिकामपणातून समाजमाध्यमांकडे वळलेले दिसत आहेत. एरव्ही बागेत किंवा जॉगिंग ट्रॅकवर फिरायला जाण्यात त्यांची सकाळ-संध्याकाळ आनंदात जात असे; पण आता बाहेर पडणे धोक्याचे असल्याने तेदेखील घरात मोबाइल गेमिंग व त्यातील समाजमाध्यमांमध्ये लक्ष पुरवू लागले आहेत. आधुनिक वा प्रगत तंत्राची कास धरणे जे काही म्हटले जाते, तेच या माध्यमातून घराघरात आढळत आहे. स्वाभाविकच या तंत्रासोबत येणा-या संवाद, संप्रेषणाच्या नवीन पद्धतीही सर्वांना आत्मसात कराव्या लागत आहेत. यात शब्दांचे लघु किंवा संक्षिप्त रूप वापरण्याचे म्हणजे, गुड मॉर्निंग असा पूर्ण शब्द वापरण्याऐवजी इंग्रजीतील अवघा ‘जीएम’ (Gm) एव्हढेच किंवा काळजी घ्या असे म्हणताना संपूर्ण टेक केअर म्हणण्याऐवजी ‘टीसी’ (Tc) म्हटले की काम भागते; पण काही बाबतीत तेव्हढेही करायचे नसेल तर प्रतीकांचा वापर केला जातो, आणि असे होताना कधी कधी जे प्रत्ययास येते ते पाहता संबंधितांच्या साक्षरतेबाबतचा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक ठरून जाते.
व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमाचा वापर करताना त्यात स्वत:च्या संदेशाची भर न घालता केवळ फॉरवर्डिंगवर विसंबून राहणाऱ्यांच्या बाबतीत अनेक गमती घडतात, पण आलेल्या संदेशांना पोच देताना जेव्हा प्रतीकांचा वापर केला जातो तेव्हा अधिक करामती घडतात. यात संदेशाचे गांभीर्य जाणणा-यांकडून काळजी घेतली जाते; परंतु ब-याचदा विपरीत अनुभव येतो तेव्हा संबंधितांच्या सुशिक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाल्याखेरीज राहात नाही. उदाहरणार्थ, अपघाताची अगर निधनाची वार्ता देणा-या संदेशाला प्रतिसाद दर्शवताना हात जोडलेले प्रतीक टाकण्याऐवजी अंगठा दर्शविणारी किंवा हास्यमुद्रा (सिम्बॉल) टाकली जाते तेव्हा आश्चर्य वाटते. कार्यालयीन पातळीवरील सहका-यांमध्ये संदेशांचे जे आदान-प्रदान होते त्यात आणखीच वेगळ्या गमती घडून येतात. ज्यांच्याकडून कामाची अपेक्षा असते त्या काम करणा-या सहका-यांकडून प्रतिसाद लाभण्याऐवजी रजा घेऊन घरीच कॉरण्टाइन असलेले सहकारी जेव्हा अंगठे दर्शवित तात्काळ प्रतिसाद देताना दिसून येतात तेव्हा त्यातून वेगळे अर्थ काढले जाणे क्रमप्राप्त ठरते. इतकेच नव्हे तर नाकळतेपणातून मुका घेणारी प्रतीके भलत्यास पाठविली गेल्यावर होणारी फजितीही अनेकांच्या वाट्यास येते.
लॉकडाऊनमुळे घरी बसून नव्यानेच सोशलमाध्यमांकडे वळलेल्या नवशिक्यांकडून असे घडले तर त्याचे फारसे आश्चर्य वाटून घेता येऊ नये; परंतु या माध्यमाला व त्याद्वारे होणा-या संप्रेषणाला सरावलेले शिक्षितही नको तिथे अंगठेबाजी करताना आढळून येतात तेव्हा अशा अंगठेबहाद्दरांचे वर्तमान कोणत्या भविष्याकडे नेणार याची चिंता वाटून गेल्याशिवाय राहात नाही. समाजमाध्यमांवरील प्रतीकांचे वापर व त्याची उपयोगिता तपासणारी काही व्यवस्था आकारास आणता आली असती तर किती बरे झाले असते, असे या संदर्भाने कुणास वाटेलही; परंतु ते शक्य नाही, कारण भाषा जगवणारी व अक्षर चळवळीतील व्याकरण तपासणारी जमातही हळूहळू कालबाह्य होत चाललेली असताना व त्याबाबत कुणास हळहळ वाटत नसताना, इकडे कुणाचा कुणाला पायपोस नसलेल्या समाजमाध्यमांच्या चावडीकडे कोण लक्ष देणार?
https://www.lokmat.com/editorial/educated-ignorant-social-media-a301/

Tuesday, July 14, 2020
#BPositive houya...
12 जुलै रोजी 5:05 PM वाजता ·
थोडे पॉझिटिव्ह होऊया...
कोरोनाने उत्पात घडवला, नुकसान घडविले हे तर खरेच; पण त्यातून लॉकडाऊन झाल्याने घरात बसल्या बसल्या काही आनंदाचे क्षण अनेकांना अनुभवायला मिळाले हे देखील तितकेच खरे.
आमच्याकडचेच घ्या, दोन्ही कन्या श्रुती व कृती यांचे एरव्ही जरा जमत नाही असेच दिसे. त्यावरून पूर्वीच्या जन्मी त्या उंदीर मांजर असाव्यात असा शेरा त्यांची आई नेहमी मारत असते, पण या लॉकडाऊन काळात अनेकदा असेही बघावयास मिळाले की जणू त्या जुळ्या असाव्यात. अर्थात यात छोटीकडून मुद्दाम केला जाणारा अल्हड, अवखळ कॉपी कॅटपणा अधिक असतो; पण त्यावरून नंतर होणाऱ्या भांडणाचाही आनंद काय वर्णावा! असेच काही क्षण कॅच करून ठेवण्याचा मोह म्हणूनच आवरला गेला नाही.
यानिमित्ताने मोबाईलच्या फोटो गॅलरीत जाऊन जरा मागे वळून पाहिले, तर त्या दोघींमधील प्रेमभावाचे बरेच क्षण हाती लागले. आपण उगाच त्यांच्यातील क्षणिक भांडणाचा बाऊ करतो असे ते पाहून जाणवले. त्या भांडणापेक्षा स्नेहाचे प्रसंग किती तरी अधिकच. शेवटी आयुष्य तरी काय व कसे, एखाद्या विविधरंगी फुलांच्या बुकेसारखेच की. त्यातील फुल वेगळे, त्यांचा रंग व गंधही वेगळा. मध्येच एखादा काटा आढळला म्हणून काय बुके फेकून द्यायचा?
कोरोनामुळे अनुभवयास मिळालेल्या संधीतून सहज विचारांच्या पडदयावर चितारून गेलेले हे क्षण. आनंददायी व उर्जादायीही!
मग का म्हणून कोरोनाकडेही केवळ उत्पातकारी म्हणून बघायचे, जरा सकारात्मक होऊया की...
कोरोना पॉझिटिव्हचा धसका घेण्यापेक्षा मनाने, विचाराने पॉझिटिव्ह होऊया ...
#CoronaDiary #ShrutiKruti #SweetFamily #LekLadki

Monday, July 13, 2020
Thursday, July 9, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 09 Jully, 2020
कोरोनाकाळात आळवूया आशेचे सूर !
किरण अग्रवाल
मन चंचल असणे स्वाभाविक आहे, त्यामुळे ते वाऱ्यासारखे वेगाने इकडून तिकडे कुठेही वाहणारच; पण विवेकाचे भान असले की या भरकटणाºया मनाला आवर घालणे शक्य होते. जीवनाचे वा जगण्यातले हे तसे साधे-सोपे अध्यात्मच आहे. पुस्तके वाचा, की कोणत्याही गुरुंचा हितोपदेश घ्या; त्यातही हेच सांगितले गेलेले आढळून येईल, पण अनेकांना ते उमजत नाही असेच म्हणायला हवे. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळातही तेच होताना दिसत आहे. कोरोनाने खूप नुकसान केले, जगणे मुश्कील होऊन बसले आहे असा विचार करून निराश मनाने अनेकजण जगण्यातील अडचणींकडे बोट करताना दिसून येतात; परंतु वेगळ्या अर्थाने बघितले तर या संकटानेही जगणे सुंदर करण्याचाच धडा घालून दिला आहे हेदेखील लक्षात येईल.
कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाच्याच जगण्याची परिमाणे बदलून ठेवली आहेत. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत; प्रत्येकालाच याची झळ बसली असून, नवीन आव्हाने सर्वांसमोरच उभी ठाकली आहेत. कोरोना कधी व कसा जाईल हे आज खात्रीने कोणालाही सांगता येणारे नाही, उलट तो दिवसेंदिवस कसा घातक ठरतोय हेच समोर येताना दिसत आहे. यापूर्वी कोरोनाचा विषाणू हा खोकल्याने, शिंकल्याने श्वासावाटे शरीरात प्रवेश करून त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले जात होते, आता तो हवेतूनही प्रसारित होतो असे संशोधन पुढे आल्याने चिंता वाढून गेली आहे. यासंदर्भात नित्यनवे संशोधन पुढे येत असल्याने भयात भरच पडत चालली आहे; परंतु त्याने निराश व उदास होण्याचे कारण नाही. यापुढे कोरोनासोबतच जगणे निश्चित आहे, त्यामुळे त्याच्याशी ओळख करून घेऊनच जगावे लागणार आहे. एकदा ही ओळख झाली, की त्यातून भय वा भीतीचे वातावरण दूर होईल आणि आपसूकच जगणे सुलभ होऊ शकेल. यासंबंधीच्या भीतीने दूर पळणे किंवा घाबरून घरात बसणे हा त्यावरील उपाय होऊच शकत नाही. टाळता न येणा-या शत्रूशी वैर घेण्यापेक्षा त्याच्याशी हात मिळवणी करून राहण्यात जसा फायदा असतो तसेच हे आहे. कोरोनाला जाणून घेतले तर वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे येण्याचे म्हणजे संसर्गाचे मार्ग आपल्याला लक्षात येतील व ते लक्षात आले म्हणजे सावधानता बाळगून त्यापासून दूर राहणे शक्य होईल इतका साधा हा मैत्रीचा मार्ग आहे. पण भीतीने मनात घर केले की आपल्याला सुटकेचे मार्ग सापडत नाहीत. कसल्याही बाबतीत असो, भीतीने डोळे मिटतात. खरे तर अशा काळात डोळे उघडे ठेवून वावरले व निर्णय घेतले तर भीतीला पळवून लावून संकटावर मात करणे सहज शक्य असते. कोरोनाच्या बाबतीतही हाच इलाज उपयोगी पडणारा आहे.
महत्त्वाचे म्हणजे, कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या नुकसानीला व अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागले हे खरेच, अनेकांना रोजगार गमवावा लागला, अनेकांना पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे. अन्यही अनेक बाबींचा पाढा येथे वाचता येऊ शकेल; परंतु त्यापलीकडे जाऊन विचार करता आतापर्यंत अशक्य वा अवघड वाटणारे अनेक मार्ग यानिमित्ताने अंगवळणी पडून जी सुविधा पर्याय म्हणून पुढे आली आहे त्याकडे ‘न्यू नॉर्मल’ म्हणून सकारात्मकतेने बघता यावे. काटकसर शिकवणारी, प्रत्येक बाबतीतली पारंपरिकता बदलणारी ही नवीन जीवनशैलीच आहे. उदाहरणच द्यायचे तर, प्रत्यक्षातील प्रवासाची कटकट टाळून आता नवीन प्रगत माध्यमाद्वारे मोबाइलवर होणा-या बैठका व भेटी या वेळेची व पैशाचीही बचत करणाºयाच ठरल्या आहेत की नाही? लग्नादी समारंभ म्हटले की त्यातील मानपान व खर्चाने अनेकांवर चक्कर येऊन पडण्याची वेळ येते; पण आता कोरोनामुळे घातल्या गेलेल्या निर्बंधातून ही बाबही अनेकांसाठी सोयीस्करच ठरली आहे.अनेकांनी आताच्या फावल्या काळात कुटुंबातील उपवर मुला-मुलींसाठी स्थळ संशोधनाचे कामही प्राधान्याने हाती घेतल्याचे दिसत आहे. अशा अन्यही अनेक मुद्द्यांचा येथे ऊहापोह करता येईल, की संकटातील संधी म्हणून त्याकडे पाहता यावे. कोरोनाने जे काही बदलून ठेवले आहे त्यात जी नावीन्यता लाभली आहे ती काळाची गरज म्हणून उपयोगाचीच असून, तीच आता सर्वमान्यही होऊ पाहत आहे.
व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मानवी संबंध व नात्याचे बंध या दृष्टिकोनातून कोरोनाकडे बघायचे तर हे नाते अधिक दृढ करण्याची संधीच कोरोनाने दिली आहे. कोणतीही व्यक्ती ही त्याच्या कामात व्यस्त राहणारी असो, की फालतू बसून राहणारी; प्रत्येकालाच असे वाटते की आपल्याकडे वेळच नाही. कोरोनाने सक्तीने घरात बसावयास भाग पाडल्यानंतर आता प्रत्येकालाच वेळ मिळाला असून, घरात मुलाबाळांसोबत वा कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यातील आनंद अनेकांना अनुभवयास मिळत आहे. अनेक आईबाबा आपल्या मुलांच्या अभ्यासात लक्ष घालू लागल्याने व त्यांच्या समवेत खेळूही लागल्याने त्या मुलांचा आनंद काय वर्णावा असाच आहे. एरवी घरात अडगळीत पडल्यासारखे झालेल्या ज्येष्ठांकडे आता अनेकजण लक्ष देताना दिसत आहेत. यातून त्या संबंधितांच्या चेह-यावर व त्यांच्या अंतरआत्म्यातून उमटणा-या समाधानाची तुलनाच कशाशी करता येऊ नये. पूर्वी आपापल्या कार्यालयीन व मुलाबाळांच्या शाळेच्या वेळा सांभाळून वेगवेगळ्या वेळी होणारी जेवणे आता घरात एकत्र बसून होऊ लागली आहेत, त्यानिमित्ताने सुखदु:खाच्या गोष्टी घडून येतात, मन हलके व्हायला मदत होते; नात्यांचे परस्परातील बंध घट्ट होऊन निराशावादी सूर दूर व्हायलाही आपसूकच मदत होते. जगणे सुंदर होण्यासाठीचे सहचर्य यातून घडून येते म्हटल्यास वावगे ठरू नये. या काळात अनेकांनी अनेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली, परस्परांना हिम्मत दिली. म्हटले तर संकटात बळ पुरविणारे, उभारी देणारे हे अध्यात्म आहे, ज्यातून लाभावी जगण्याची सोपी वाट. अर्थात या वाटेवरून चालताना निराशेचे सूर आळवायचे, की आनंदी-समाधानी मनाने आशेचे, नावीन्याच्या ऊर्जेचे सूर, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
https://www.lokmat.com/editorial/try-hope-corona-period-a629/

Wednesday, July 8, 2020
Thursday, July 2, 2020
#EditorsView published in Online Lokmat on 02 Jully, 2020
परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली
किरण अग्रवाल
मनात भाव असला तर देवळाच्या दारात जाण्याची गरज नसते असे म्हणतात, तरी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करीत भक्तिभावाने दरवर्षी पंढरीला जात असतात; कारण पांडुरंगाच्या भेटीची आस व ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यंदा मात्र कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाला आपापल्या गावी व घरीच थांबून राहणे भाग पडले, त्यामुळे मनामनातील पांडुरंगाचे अनोखे दर्शन प्रत्येक कुटुंबात बघावयास मिळाले, अर्थात श्रद्धेने ओथंबलेली संवेदना व त्यातून आकारास आलेली विठूमाउली मनामनात अनुभवली जात असताना शासनाच्या परिवहन महामंडळाने त्यांच्यातील असंवेदनशीलतेचा प्रत्यय आणून द्यावा हे अचंबित करणारेच ठरले.
वारी हा खरे तर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, लोकधारेचा व परंपरेचा हुंकार आहे. महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाच्या जीवनानुभवाचा, विचारधारेचा आचारधर्म या वारीत अनुभवयास मिळतो. विठ्ठलभक्तीचा असा निर्व्याज्य भावाने होणारा नाद इतरत्र कुठेही बघावयास मिळत नाही, म्हणून वारीकडे महाराष्ट्राचे जीवनदर्शन म्हणून बघितले जाते. कोरोनाच्या संकटामुळे यंदा मात्र वारीवर निर्बंध घालणे शासनाला भाग पडले, त्यामुळे लाखो वारकऱ्याचा काहीसा हिरमोड झाला खरा; पण संतांनीच घालून दिलेल्या शिकवणुकीनुसार ‘काया ही पंढरी आत्मा पांडुरंग’ मानून घराघरांत नामस्मरण करून माउलीला अनुभवले गेले. शासनाने राज्यातील मानाच्या अशा सात पालख्यांना मोजक्या मंडळींच्या साथीने पंढरीत प्रवेशाची अनुमती दिल्याने या पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसेसने पंढरपूरला गेल्या, पण हे होताना यंत्रणांची असंवेदनशीलता दिसून आली ती सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली. एकीकडे यंदा पायी वारीला परवानगी देता आलेली नसली म्हणून हेलिकॉप्टरने मानाच्या पालख्या पंढरपुरात नेण्याच्या चर्चा घडवल्या गेल्या असताना साध्या बसेसने या पालख्या नेण्याची वेळ आल्यावर त्यातही असे व्हावे हे आश्चर्याचे आहे.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब एकीकडे यंदा मानाच्या पालख्या व संतश्रेष्ठ यांना एसटीद्वारे पंढरपुरात नेण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत असताना व हा भाग्याचा क्षण असल्याचे सांगत असताना दुसरीकडे या विभागाकडून ज्या अश्रद्धतेचा अनुभव आला तो विषण्ण करणारा ठरला. दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे लोकडाऊन करावे लागले असताना मुंबई व इतरही शहरातून मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचे तसेच अन्य ठिकाणच्या नागरिकांचे जे स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडून आले त्यावेळी याच महामंडळाने व शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पायी गावाकडे निघालेल्या नागरिकांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पोहोचविण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी असे औदार्य दाखविणारे शासन व परिवहन महामंडळ संतांच्या पालख्या पंढरपुरात नेताना मात्र संबंधित संस्थांकडून एसटीचे भाडे आकारताना दिसून आले, याबाबत रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर सदर धनादेश परत केले गेले हा भाग वेगळा; परंतु मुळात महाराष्ट्राचे दैवत असणाºया विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाºया संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते.
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीबाबत तर आणखीनच वेगळा अनुभव आला. देहू येथून संत तुकाराम, आळंदी येथून संत ज्ञानेश्वर, सासवड येथून संत चांगवटेश्वर व संत सोपानदेव, नेवासा येथून संत मुक्ताई आदींच्या पालख्याही बसेस द्वारेच पंढरपुरात गेल्या; परंतु किमान त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने व संस्थांनी या बसेस पालख्या व नेहमीच्या रथाप्रमाणेच फुलांनी सजवून या बसेस पंढरपुराकडे रवाना केल्याचे दिसून आले; परंतु त्र्यंबकेश्वरात त्याही बाबतीत संवेदनशीलता दाखविली गेली नाही. सकाळी पालखीसाठी जी बस आली ती पुरेशी धुतलेली व स्वच्छही नव्हती. तमाम जनतेच्या श्रद्धेच्या सोहळ्याचा हा भाग असताना याबाबत प्रशासनाने, परिवहन महामंडळाने तसेच लोकप्रतिनिधींनीही जे भान राखणे गरजेचे होते ते राखले गेले नाही. एरव्ही वारीमध्ये पालख्यांच्या दर्शनासाठी व कपाळी गंध टिळा लावून गळ्यात टाळ-मृदुंग अडकवून आपल्या श्रद्धेचा परिचय देण्यासाठी चढाओढ करणारे लोकप्रतिनिधीही याबाबतीत दूरच राहिलेले दिसले. शासनाच्या निर्बंधाचा भाग यामध्ये असला तरी, जे अलंकापुरीत, देहूत वा अन्य ठिकाणी होऊ शकले ते त्र्यंबकेश्वरी का घडू शकले नाही, असा प्रश्न यातून उपस्थित होणारा आहे. अर्थात, जेणे सद्बुद्धी उपजेल, पाखंड भंगेल, विवेक जागेल.. या संत वचनावर विश्वास ठेवून संबंधितांचा विवेक जागेल अशी अपेक्षा ठेवूया आणि म्हणूया, जय जय रामकृष्ण हरी।।
https://www.lokmat.com/editorial/article-issue-take-rent-nivrutinath-nath-maharaj-palkhi-st-bus-a629/

Subscribe to:
Posts (Atom)