12 जुलै रोजी 5:05 PM वाजता ·
थोडे पॉझिटिव्ह होऊया...
कोरोनाने उत्पात घडवला, नुकसान घडविले हे तर खरेच; पण त्यातून लॉकडाऊन झाल्याने घरात बसल्या बसल्या काही आनंदाचे क्षण अनेकांना अनुभवायला मिळाले हे देखील तितकेच खरे.
आमच्याकडचेच घ्या, दोन्ही कन्या श्रुती व कृती यांचे एरव्ही जरा जमत नाही असेच दिसे. त्यावरून पूर्वीच्या जन्मी त्या उंदीर मांजर असाव्यात असा शेरा त्यांची आई नेहमी मारत असते, पण या लॉकडाऊन काळात अनेकदा असेही बघावयास मिळाले की जणू त्या जुळ्या असाव्यात. अर्थात यात छोटीकडून मुद्दाम केला जाणारा अल्हड, अवखळ कॉपी कॅटपणा अधिक असतो; पण त्यावरून नंतर होणाऱ्या भांडणाचाही आनंद काय वर्णावा! असेच काही क्षण कॅच करून ठेवण्याचा मोह म्हणूनच आवरला गेला नाही.
यानिमित्ताने मोबाईलच्या फोटो गॅलरीत जाऊन जरा मागे वळून पाहिले, तर त्या दोघींमधील प्रेमभावाचे बरेच क्षण हाती लागले. आपण उगाच त्यांच्यातील क्षणिक भांडणाचा बाऊ करतो असे ते पाहून जाणवले. त्या भांडणापेक्षा स्नेहाचे प्रसंग किती तरी अधिकच. शेवटी आयुष्य तरी काय व कसे, एखाद्या विविधरंगी फुलांच्या बुकेसारखेच की. त्यातील फुल वेगळे, त्यांचा रंग व गंधही वेगळा. मध्येच एखादा काटा आढळला म्हणून काय बुके फेकून द्यायचा?
कोरोनामुळे अनुभवयास मिळालेल्या संधीतून सहज विचारांच्या पडदयावर चितारून गेलेले हे क्षण. आनंददायी व उर्जादायीही!
मग का म्हणून कोरोनाकडेही केवळ उत्पातकारी म्हणून बघायचे, जरा सकारात्मक होऊया की...
कोरोना पॉझिटिव्हचा धसका घेण्यापेक्षा मनाने, विचाराने पॉझिटिव्ह होऊया ...
#CoronaDiary #ShrutiKruti #SweetFamily #LekLadki

No comments:
Post a Comment