Monday, July 27, 2020

डॉक्टरही शेवटी माणूसच आहे ना!...

21 July, 2020 Nashik ·







डॉक्टरही शेवटी माणूसच आहे ना!... 

आजच्या कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येकालाच आपल्या जीवाची पडली आहे, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे काय?
डॉक्टरांच्या बरोबरच रूग्णालयातील नर्सेस, वार्ड बाय, मावश्या असे सर्वच घटक अक्षरशः मृत्युच्या दाढेत राहून सेवा बजावत आहेत, परंतु कुठेतरी अपवादात्मक एखादी चुकीची घटना घडते आणि संपूर्ण समाज या सेवार्थींकडे संशयाने पाहू लागतो.
चुकीचे व कृतघ्नतेचेच आहे हे...
शेवटी डॉक्टरचे देखील कुटुंब असते,  त्याला देखील भावना असतात, भीती असते; कोरोनाचा रुग्ण तपासताना व त्याच्या सानिध्यात राहताना डॉक्टरला भीती वाटत नसेल का, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात किती कालवाकालव होत असेल? पण ते जीवाची बाजी लावून आपला सेवाधर्म बजावत असतात. याकडे समाज डोळसपणे बघतच नाही.
एकीकडे कोरोना योद्धे म्हणून त्यांना संबोधायचे, त्यांच्यासाठी टाळ्या व थाळ्या वाजवायच्या आणि दुसरीकडे एखाद्या खलनायकासारखे त्यांच्याकडे संशयाने पहायचे; हे केवळ अन्यायकारकच नाही तर त्यांना व्यथित व निरूत्साही करणारे किंवा त्यांच्यात निगेटिव्हिटी आणणारेच आहे.
माध्यमे व विशेषतः सोशल मिडियातही त्यांची चुकीची प्रतिमा चितारली जातांना दिसून येते.
शासन, समाज, माध्यमे असे सारेच घटक केवळ दोषच लादणार असतील तर मग डॉक्टरांनी करायचे काय आणि कुणासाठी?
... हे बदलायलाच हवे, कारण ही मेडिकल इमर्जन्सी आहे.
सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील हा  संपूर्ण घटक प्लेगच्या साथीनंतर  कोरोनाविरुद्ध रणांगणात झोकून देऊन लढाई लढत आहे
तेव्हा ही लढाई जिंकायची असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच घटकांचा सन्मान ठेवून त्यांचेही मनोबल उंचावणारे वर्तन व व्यवहार समाजाकडून अपेक्षित आहे.
....................
ऑनलाईन कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लोकमत संवाद सत्रात नाशकातील प्रथितयश डॉक्टर्सनी कोरोनाशी संबंधित आव्हाने याबद्दल मार्गदर्शन करताना केले मन मोकळे ...
Dr Sameer Chandatre (IMA President), Dr Vijay Kakatkar, Dr. Satish Patil, Dr. Raj Nagarkar, Dr Sharad Patil, Dr Manoj Chopada, Dr Nivedita Pawar, Dr Aniruddha Dharmadhikari, Dr Sushil Parakh, Dr Dinesh Wagh, Dr Mangesh Jadhav, Dr Prajakata Lele (IMA Voice President) participated in this session.
या संवाद सत्राचे वृत्तांकन वाचा उद्याच्या लोकमत #हॅलो_नाशिक मध्ये...
आजच राखून ठेवा सोमवारचा (दि 27) आपला #लोकमत
#LokmatIMA #CoronaIMA #LokmatSamvad #Doctors #NashikIMA


No comments:

Post a Comment