Monday, April 19, 2021

सुन्न, हतबल सारे ...

17 एप्रिल 2021 रोजी १:११ PM वाजता · सुन्न, हतबल सारे ...
लोकमतमध्ये प्रकाशित सोबतची छायाचित्रे केवळ वस्तुस्थितीदर्शकच नव्हे तर सुन्न करणारीही आहेत. कोरोनामुळे जीवनाचा संघर्ष अशा स्थितीत येऊन पोहोचला आहे, की मन व मस्तिष्क बधिर व्हावे. शासकीय रुग्णालयांमध्ये बेड्स नसल्याने खुर्चीवर बसवून रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर लावावे लागत आहेत, कुण्या भगिनीला अभ्यागतांसाठी असलेल्या वेटिंग रूम मधील खुर्च्यांवर जागा शोधावी लागते तर कुण्या मातेला रिक्षाच्या मागील सीटवरच पडून राहण्याची वेळ येते. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, मावश्या.. जीव धोक्यात घालून अहोरात्र राब राब राबत आहेत, पण वाढती रुग्णसंख्या व साधने यांचा मेळ घालणे अवघड ठरले आहे. गरीब वा सामान्यच नव्हे, सारेच परेशान आहेत. पद, पैसा, प्रतिष्ठा सारे असणाऱ्यानाही बेडसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. वशिले, ओळखपाळख कुचकामी ठरत आहे. भय दाटले आहे, हतबलता वाढली आहे ... **** अश्या स्थितीत एकच करूया, खऱ्याअर्थाने देवदूत ठरलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील योद्ध्यांचे मनोमन आभार मानतांना त्यांना पाठबळ पुरवूया. स्वतःच स्वतःची काळजी घेत निर्बंध कटाक्षाने पाळूया... मास्क वापरा, डिस्टन्स ठेवा, हात धुवा । #विचारप्रवर्तक #BeAware_TakeCare

No comments:

Post a Comment