Sunday, September 25, 2022

आदिशक्तीच्या जागरासाठी सज्जता...

Sept 24, 2022 आदिशक्तीच्या जागरासाठी सज्जता...
उद्यापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. विविध सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळांनी मोठा खर्च करून आदिशक्तीच्या जागराची तयारी चालवली आहे. दिवसभरातील नोकरी, कामधंदा आटोपून रात्री उशिरा भाविक दर्शनासाठी बाहेर पडतात, त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून देखावे आदि कार्यक्रमांसाठी रात्री वेळ वाढवून मिळावा अशी अपेक्षा या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्तच्या संवाद सत्रात शहरातील विविध नवदुर्गा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या असता सदर मुद्दा पुढे आला.
या संवाद सत्रात याेगायाेग नवदुर्गा महाेत्सव नाना उजवने परिवाराचे दादा उजवने, आई भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ काैलखेडचे पदाधिकारी पंकज गावंडे, तुकाराम महाराज नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष शिवा माेहाेड, उपाध्यक्ष गणेश घाेगरे, माॅ काली नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष शरद ढगे, प्रा़ विजय बाेरकर, प्रा़ मनीष फाेकमारे, जवाहर नगर परिसरातील नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष रुपम घाटाेळ, कमलकीशाेर राठी, मा शक्ती गृपचे अध्यक्ष गाैरव शर्मा, सचिव आशीष राेहडा, न्यु मीलन नवदुर्गा मंडळाचे राहुल पांडे, अभीनंदन ठाकूर, आदर्श नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष संदिप पवार, गणेश गांडाळ सहभागी झाले हाेते़ #LokmatAkola #LokmatSamvadAkola #AkolaNavratroutsav #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment