Monday, September 5, 2022

दाढीधारींना शुभेच्छा..!

Sept 03, 2022 दाढीधारींना शुभेच्छा..!
आजकाल मदर्स डे, फादर्स डे, डॉक्टर्स डे सारखे विविध 'डेज' मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. कुठेतरी, कशात तरी आनंद शोधण्याचा तसेच संबंधितांच्या गुण गौरवाचा, त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा हेतू यामागे असतो. याच मालिकेत सप्टेंबरचा पहिला शनिवार.. संपूर्ण जगभरात दाढी दिन / World Beard Day म्हणून साजरा केला जातो. आमच्या लहानपणी दाढीचे जाऊ द्या, साधी कटिंग जरा वाढली की आई कटिंग करायला पिटाळायची. काय लोफरसारखा दिसतो म्हणायची... नंतर अमिताभ बच्चनमुळे हीप्पी कट चलनात आला आणि मातांचेही मत परिवर्तन झाले. आता दाढीची फॅशन चलनात आहे... यापार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी मी केलेल्या FB पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये आपापली दाढीधारी छायाचित्रे टाकून काही मित्रांनी त्यांच्या आगळ्या रूपाचे दर्शन घडविले. सोबतचे छायाचित्र हे त्यांच्याच संकलित रूपांचे... यातील माझीच नाही, अनेकांची दाढी हीच त्यांची ओळख बनून गेली आहे. असो, समस्त दाढीधारक मित्रांना आजच्या विशेष दिनी खूप खूप शुभेच्छा... 🧔🏻🧔🏻🧔🏻🧔🏻 #KiranAgrawal #माझी_दाढी_माझी_ओळख! #WorldBeardDay

No comments:

Post a Comment