Wednesday, September 14, 2022

लोकमतची टीम नंबर One...

लोकमतची टीम नंबर One...
कुटुंब असो, की कोणती संस्था; एकटा माणूस काही करू शकत नाही. यशाचे तोरण बांधायचे तर टीमवर्कच कामी येते. लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल जी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी दिलेल्या मंत्रानुसार 'पत्रकारिता परमो धर्मा'स जागून व समूहाचे चेअरमन, राज्यसभेतील माजी खासदार श्री विजय बाबूजी दर्डा तसेच एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा व संपूर्ण व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनात अकोला लोकमत वाचकप्रियतेचे जे टप्पे गाठत आहे त्यामागेही सर्व सहकारींचे परिश्रम आहेत. म्हणूनच मला अभिमान आहे माझ्या सर्व सहकारींचा.
लवकरच दिवाळी येऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वार्ताहर बंधूंच्या एका बैठकीनिमित्त कार्यालयातील संपादकीय सहकारीं समवेत एक फोटो सेशन झाले... यातील माझा प्रत्येक सहकारी असा आहे, की ज्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अकोला लोकमतच्या रौप्य महोत्सवी वाटचालीत या सहकारींचे लाभणारे पाठबळ महत्वाचे आहे. सर्व वार्ताहर, वितरक बांधवांच्या मेहनतीच्या बळावर ही वाटचाल अविरतपणे सुरू आहे. नंबर One टीम आहे आमची... #LokmatAkola #LokmatEditorialAkola

No comments:

Post a Comment