At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, October 20, 2022
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ... 2022
Oct 11, 2022
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ...
सेवा, समर्पण आणि सद्भावाच्या बळावर जग बदलायला निघालेल्या सत्वशील असामान्यत्वाला सलाम करणारा सोहळा म्हणजे #LMOTY
विविध कॅटेगिरीमधून निवडल्या गेलेल्या 22 गौरवार्थींच्या या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत सर्वसामान्यांच्या मनाला भिडून गेली.
अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह उद्योग जगतातील मान्यवरांनी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सन्मान सोहळ्यास हजेरी लावली. अभिनेते रणवीरसिंह, कियारा आडवाणी यासारख्या फिल्मी दिग्गजांच्या उपस्थितीने कार्यक्रमात जान आली.
लोकमतचे संयुक्त प्रबंधक तथा संपादकीय संचालक, तरुण नेतृत्व श्री ऋषीबाबू दर्डा यांच्या संकल्पनेतून या गौरव सोहळ्याची सुरुवात झाली, जी महाराष्ट्रातील कर्तृत्ववान, सन्मानार्थिंसाठी एक माइलस्टोन बनली.
हा भव्य दिव्य व सर्व क्षेत्रीय दिग्गजांच्या उपस्थितीतील सोहळा प्रत्यक्ष अनुभवणे हेदेखील आनंद व अभिमानाचेच असते.
यंदाच्या या सोहळ्यात लोकमत समूहाचे चेअरमन मा. श्री. विजय बाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ मा. श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा व श्री. ऋषी बाबूंसह राज्यातील लोकमतच्या अन्य सहकारी, संपादकांसमवेतची ही आनंद चित्रे...
#LokmatMaharashtrianOfTheYear2022
Sunday, October 16, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 16, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221016_4_2&fbclid=IwAR26OOPfmzX2KJDynvbCms0-eez05tpD5kCf7HeS_ylFA2VS__dOygfIoR0
https://www.lokmat.com/editorial/the-rain-brought-tears-to-the-eyes-again-a520-c310/?fbclid=IwAR3m1wj36Ht9Xvq61BtMY8GpGzAjItq_MQRZZ-iKkoKeaM2_M-Xc0zSh2Lo
सिंदखेड राजा...
Oct.14, 2022
सिंदखेड राजा...
स्वराज्यप्रेरीका माँसाहेब जिजाऊंची प्रेरक भूमी, मातृतीर्थ. येथे आल्यावर क्षणभर का होईना चांदणी तलावाच्या काठावर रेंगाळल्याशिवाय मन भरत नाही. #kiranAgrawal
लोणारमध्ये रंगला गप्पांचा फड...
Oct. 14, 2022
लोणारमध्ये रंगला गप्पांचा फड...
सभा संमेलनात, कार्यक्रमात अनेक नेते कार्यकर्ते भेटतात, पण तेथे मनमोकळ्या गप्पा होत नाहीत. छोटेखानी बैठकीत मात्र सारेजण दिलखुलासपणे व्यक्त होतात, हा माझा नेहमीचा अनुभव आहे. लोणारमध्येही त्याचाच प्रत्यय आला.
उल्कापातामुळे तयार झालेले बेसॉल्ट खडकातील खाऱ्या पाण्याचे आघाती विवर अशी ख्याती असलेल्या लोणार दौऱ्यानिमित्त आमच्या लोकमतच्या स्थानिक प्रतिनिधींनी तेथील विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत गप्पांचा योग जुळवून आणला.
यात राजकारण, समाजकारणापासून लोणार सरोवर विकासातील अडचणींपर्यंत अनेक विषयांवर छान गप्पांचा फड रंगला. पक्षीय अभिनिवेश न बाळगता आजचे राजकारण कसे गढूळ होत चालले आहे, यावर सारे नेते मोकळेपणे बोललेत.
लोकमतचे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख( शिंदे गट) प्रा. बळिराम मापारी, भा.रा.कॉं. लोणारचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी, ओबीसी सेल भा.रा.काँ बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा गजानन खरात, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर, प्रसिद्ध कला शिक्षक प्रा जगन राठोड, कला शिक्षक प्रा गोपाल वाकोडे (मराठी स्वाक्षरीक़ार), जेष्ठ कॉंग्रेस नेते साहेबराव पाटोळे यांच्यासह लोकमतचे जाहिरात उप व्यवस्थापक संदीप दिवेकर, स्थानिक प्रतिनिधी मुयर जैन व रेहमान नौरंगाबादी चर्चेत सहभागी झाले.
#LokmatAkola #LokmatLonar #KiranAgrawalLokmat
संवेदना जागविणाऱ्या साहित्याचे सृजन व्हावे...
Oct. 09, 2022
संवेदना जागविणाऱ्या साहित्याचे सृजन व्हावे...
मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाचे 7वे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यवतमाळचे प्रख्यात साहित्यिक विनय मिरासे अध्यक्ष होते, तर समीक्षक डॉ. चिंतामण कांबळे यांनी उद्घाटन केले. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, कथाकार सुरेश पाचकवडे यांच्या समवेत संमेलनास जाण्याचा योग आला.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना वर्तमान साहित्यावर विचार मांडले. मी व माझ्यात गुंतलेल्या स्वकेंद्री, स्वमग्न साहित्याच्या निर्मितीपेक्षा माणसातील माणुसकी तसेच संवेदना जागवणारे, समाजाला पुढे नेण्यासाठी दिशादर्शन करणारे व जगण्याची नवी उभारी देतानाच वंचित, शोषितांच्या भूमिकांना बळ देणाऱ्या साहित्याचे सृजन होणे आज गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
शिक्षकी पेशात असलेल्या रवींद्र जवादे यांच्या धडपडीतून हा साहित्य संघ व संमेलन आकारास आले. डामडौलापासून दूर राहत पार पडणाऱ्या अशा संमेलनांमधून साहित्य व मराठी मातृभाषेला अधिक समृद्ध करण्याचे प्रयत्न होत आहेत हे सर्वाधिक आनंददायी आहे.
#SrujanSahityaSammelan #SrujanMurtijapur #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 09, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221009_4_2&fbclid=IwAR0EYHK1ktkDrJLBcT7QnjfnlTpI0PuypXAKV-Zn0a-VpVDyYHpJZfLF75A
https://www.lokmat.com/editorial/the-development-backlog-is-expected-to-be-filled-a520-c310/?fbclid=IwAR3i4P2spH5WBUn9N7_YCUE2Ma7As7xU5wUN5sGPt-stuudsgIxGaPVq55o
Friday, October 7, 2022
Saraunsh published in Akola Lokmat on Oct. 02, 2022
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20221002_2_2&fbclid=IwAR2RiRi43fqj7IA8C9eGW5wXALM3HoQjMZpkckKjgFcc8EAU-r9wKcBqkR0
https://www.lokmat.com/editorial/the-chaos-of-the-akola-zilla-parishad-is-exposed-a520-c310/?fbclid=IwAR0nw2xvXZVPOrprhsWjfMoUeCzUDyTGdYIPMyzySu7ldRs_WPTrKlhDTxQ
Subscribe to:
Posts (Atom)