At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Tuesday, June 20, 2023
रौप्य वर्षपूर्तीच्या आनंद सोहळ्यातील वारकरी...
रौप्य वर्षपूर्तीच्या आनंद सोहळ्यातील वारकरी...
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सव वर्षपूर्तीचा भव्य दिव्य सोहळा साजरा करताना या आनंदाच्या वारीत आमचे सर्वच सहकारी सहभागी झालेत. त्यांच्या बळावरच असा गौरवशाली कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
कार्यालयीन सहकारी तसेच अकोला, बुलढाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यातील वार्ताहर, वितरक अशा सर्वांच्याच परिश्रमातून लोकमतची वाटचाल वर्धिष्णू झाली आहे.
सोहळ्या दरम्यान मा. राज्यपाल श्री रमेश बैस जी, कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार जी, लोकमतचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, संचालक (परिचालन) श्री अशोकबाबूजी जैन, समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर आदि मान्यवर व या सहकारीं समवेतची ही काही आनंद चित्रे...
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat
माजी संपादकांचा अनोखा सन्मान...
माजी संपादकांचा अनोखा सन्मान...
लोकमत अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती आनंद सोहळा साजरा करताना या आवृत्तीच्या संपादकत्वाची धुरा सांभाळलेल्या आजवरच्या सर्व माजी संपादकांचा व युनिट हेड्सचा मा. राज्यपाल श्री रमेश बैस जी यांच्याहस्ते सन्मान करवून लोकमत व्यवस्थापनाने संपूर्ण माध्यम जगतात एक नवा आदर्श घालून दिला.
यानिमित्ताने कधी नव्हे तो, सर्व आजी-माजी संपादक एकत्र येण्याचा अनोखा व पत्रसृष्टीत दुर्मिळ ठरणारा योग घडून आला.
विशेष म्हणजे लोकमतच्या प्रारंभ काळातील संपादक दिवंगत पत्रपंडित पा. वा. गाडगीळ व पत्रमहर्षी बाबा दळवी यांच्या स्मृत्यर्थ शोध पत्रकारिता व उत्कृष्ट लेखनासाठी दरवर्षी लोकमत तर्फे पुरस्कार दिले जातात. आपल्या प्रथम संपादकांच्या नावे पुरस्कार देणारा लोकमत एकमेव वृत्तपत्र समूह मानला जातो. संपादकांचा सन्मान राखण्याची ही भूमिकाच लोकमतमधील पारिवारिक कार्य संस्कृतीचा परिचय देणारी आहे, जिची रुजूवात लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी केली आणि एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्यासह नव्या नेतृत्वानेही मनःपूर्वक जपली, जोपासली आहे.
चालू वर्ष हे श्रद्धेय बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. बाबूजींनी आम्हास काय दिले, तर पत्रकारिता परमो धर्माची शिकवण दिलीच, शिवाय आम्ही अभिमानाने सांगतो की हे जाणिवेचे, कृतज्ञतेचे संस्कार दिलेत.
अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळा साजरा करताना हाच आदर्श जपला गेला. सर्वश्री योगेंद्र जुनागडे, संजय आवटे, बाळ कुलकर्णी, गजानन जानभोर, अविनाश दुधे, प्रेमदास राठोड, रवी टाले तसेच युनिट हेड राहिलेले सुशांत दांडगे व रमेश डेडवाल यांचा यावेळी सन्मान केला गेलाच, शिवाय स्व. प्रभाकर पुराणिक यांच्या कन्या अनिमा कुलकर्णी व युनिट हेड राहिलेले स्व. तेजकिरण दर्डा यांच्या कन्या सौ. भक्ति यांनाही आठवणीने बोलावून सन्मानित केले गेले. अकोला लोकमतच्या वाटचालीत पहिल्या दिवसापासून म्हणजे 25 वर्षांपासून सेवारत असलेले प्रकाश वानखेडे, संदीप दिवेकर, शैलेश येंडे व विनायक जोशी यांचाही गौरव केला गेला. या सर्वांच्या परिश्रमाच्या पायावरच आज अकोला आवृत्तीच्या यशाची इमारत उभी आहे.
... ही आहे 'लोकमत'ची आपले संपादक व कर्मचाऱ्यांप्रतीची पारिवारिक भावना व कृतज्ञता. म्हणूनच तर सर्वांच्या मनामनातून व रोमा रोमातून उद्घोष होतो... My Lokmat, जय लोकमत!
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat
लोकमत अकोला रौप्य वर्षपूर्ती सोहळा ... कव्हरेज
लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळा ... कव्हरेज व मान्यवरांची मांदियाळी
http://epaper.lokmat.com/articlepage.php...
http://epaperlokmat.in/.../ArticleImages/648e3ffc23571.jpg
Saraunsh published in Akola Lokmat on June 18, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230618_4_5&fbclid=IwAR3c473n-CkdyhwGJ9_sxCVnC3DeNxkZOHoCM9S7WOSja2XLw-OkU9D771s
https://www.lokmat.com/editorial/delayed-rains-expose-failure-of-drought-relief-a-a520-c719/?fbclid=IwAR3Pd3O15wBg8sejOn-iRpuwezrDPoUxLIIGBvcbJuFTL173cCB6-AkcNos
Article published in Akola Lokmat on June 10, 2023
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यातील गेल्या पंचवीस वर्षातील विकासात्मक वाटचालीचा संक्षिप्त आढावा... लोकमत रौप्य महोत्सव वर्षपूर्ती निमित्त 'पंचविशी' पुरवणीतील मुखपृष्ठावरील लेख
http://epaper.lokmat.com/articlepage.php...
आनंद, अभिमान व भाग्याचा क्षण...
आनंद, अभिमान व भाग्याचा क्षण...
लोकमत अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा मा. राज्यपाल श्री. रमेश बैस जी, राज्याचे कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार जी, लोकमत चेअरमन श्री. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा, संचालक श्री अशोकबाबू जैन, समूह संपादक श्री विजय बाविस्कर जी आदींच्या उपस्थितीत पार पडला. संस्मरणीय असा हा सोहळा झाला.
अकोला आवृत्तीचा कार्यकारी संपादक म्हणून अशा या दिमाखदार व गौरवशाली सोहळ्याच्या आयोजन, नियोजनात सहभागी व्हायला मिळाले ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची, भाग्याची व अभिमानाची बाब आहे. हे क्षण आयुष्यभर स्मरणात राहतील.
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat
Wednesday, June 14, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on June 11, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230611_2_2&fbclid=IwAR2CxmTyuv6x-wesZg-3koELn-a_NoD6SnmDGO4AxZX_LVlqiXbVKRp4ga0
https://www.lokmat.com/editorial/what-is-bjps-game-of-mann-ki-baat-and-vanchit-a-a520-c310/?fbclid=IwAR2j3PN3i0r0UlAUUSmuEJBUcNQoyihhQpbntmQHw1ghoVSPBp0aJyllsqs
अकोला 'लोकमत'ची पंचविशी...
June 10, 2023
अकोला 'लोकमत'ची पंचविशी...
कोणतीही संस्था वा आस्थापनेसाठी 25 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण होणे ही मोठी बाब असते. एकूण वाटचालीतील दशकपूर्ती नंतरचा तो एक आश्वासक टप्पा म्हटला जातो.
लोकमत अकोला आवृत्तीने हाच टप्पा यावर्षी पार केला. तारखेनुसार 16 मार्च 2023 रोजी येथल्या वाटचालीला 25 वर्ष पूर्ण झाले. अतिशय वर्धिष्णु व यशस्वी राहिलेल्या या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीचा आनंद सोहळा दि. 10 जून रोजी मा. राज्यपाल महोदय श्री. रमेश बैस जी, राज्याचे कृषी मंत्री श्री अब्दुल सत्तार जी, लोकमतचे कुटुंब प्रमुख श्री विजयबाबूजी दर्डा व श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, समूह संपादक श्री विजय बाविस्कर जी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी, लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी दिलेली 'पत्रकारिता परमो धर्मा'ची शिकवण घेऊन लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी वऱ्हाडच्या मातीत, राजराजेश्वर नगरी अकोल्यात लोकमतची रुजुवात केली. सर्वश्री देवेंद्र दर्डा, ऋषी दर्डा व करण दर्डा या नव्या पिढीच्या नेतृत्वकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे व त्यांनी राबविलेल्या नवनवीन संकल्पनांमुळे यशाची शिखरे ओलांडत आज अकोला आवृत्तीही वाचकप्रिय ठरली आहे.
नाशिक आवृत्तीचा रौप्य महोत्सव करून अकोल्यात कार्यकारी संपादक म्हणून आल्यावर तेथील रौप्यमहोत्सवी योगही माझ्या वाट्यास यावा हा माझ्यासाठी सन्मानाचा, भाग्याचा व अभिमानाचाच क्षण आहे.
या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती सोहोळ्याच्या निमित्ताने मायबाप वाचक परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद ...
#LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat
Monday, June 12, 2023
Tuesday, June 6, 2023
ऐश्वर्यवतीच नव्हे, आरोग्यवतीही व्हा!
June 02, 2023
ऐश्वर्यवतीच नव्हे, आरोग्यवतीही व्हा!
स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2 जून रोजी तिशी ते साठीतील महिलांच्या मासिक पाळी व मेनोपॉज या आरोग्याशी निगडित समस्यांविषयी 'आरोग्यवती' हा चर्चासत्रात्मक उपक्रम घेण्यात आला.
प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा घाटे, डॉ. भारती राठी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुप राठी व योगा तज्ज्ञ मनीषा कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अकोला आयएमए महिला विंगच्या अध्यक्ष डॉ. सुजाता कोरपे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
- संबंधित विषयाशी निगडित समस्या या अधिकतर संकोचातून निर्माण होतात, त्यामुळे सर्वप्रथम कुटुंबात याबाबत मोकळेपणा आणून निसंकोच चर्चा करायला हवी.
- सुखी, समाधानी व आनंदी आयुष्यासाठी केवळ ऐश्वर्यवती असून चालणार नाही, तर आरोग्यवतीही व्हायला हवे.
- मासिक पाळीकडे विटाळ म्हणून पाहण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्त्रीत्वाच्या परिपूर्णतेची जाणीव करून देणारा हा 'पिरियड' असतो, त्यामुळे निसर्गधर्माशी निगडित शरीरशास्त्र व आरोग्य विज्ञान मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे... इति मुद्दे यावेळी बोलतांना मांडले.
#LokmatAkola #LokmatAarogyavati #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on June 04, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230604_2_2&fbclid=IwAR0EeOqEUQ0Skc53h_4Zy6hhbsi1bYU93yxRzsHVcOK85abE5NVTdKpZfKs
https://www.lokmat.com/editorial/a-new-journey-in-childrens-life-begins-now-a-a520-c310/?fbclid=IwAR29_YqukJK6HdiL4G1Tc3mphxAib67c4BrICxVJTYSlrJlLANgaECdQfxg
Subscribe to:
Posts (Atom)