Tuesday, June 6, 2023

ऐश्वर्यवतीच नव्हे, आरोग्यवतीही व्हा!

June 02, 2023 ऐश्वर्यवतीच नव्हे, आरोग्यवतीही व्हा!
स्वतंत्रता संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2 जून रोजी तिशी ते साठीतील महिलांच्या मासिक पाळी व मेनोपॉज या आरोग्याशी निगडित समस्यांविषयी 'आरोग्यवती' हा चर्चासत्रात्मक उपक्रम घेण्यात आला. प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा घाटे, डॉ. भारती राठी, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुप राठी व योगा तज्ज्ञ मनीषा कुलकर्णी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अकोला आयएमए महिला विंगच्या अध्यक्ष डॉ. सुजाता कोरपे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. - संबंधित विषयाशी निगडित समस्या या अधिकतर संकोचातून निर्माण होतात, त्यामुळे सर्वप्रथम कुटुंबात याबाबत मोकळेपणा आणून निसंकोच चर्चा करायला हवी. - सुखी, समाधानी व आनंदी आयुष्यासाठी केवळ ऐश्वर्यवती असून चालणार नाही, तर आरोग्यवतीही व्हायला हवे. - मासिक पाळीकडे विटाळ म्हणून पाहण्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्त्रीत्वाच्या परिपूर्णतेची जाणीव करून देणारा हा 'पिरियड' असतो, त्यामुळे निसर्गधर्माशी निगडित शरीरशास्त्र व आरोग्य विज्ञान मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे... इति मुद्दे यावेळी बोलतांना मांडले. #LokmatAkola #LokmatAarogyavati #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment