Tuesday, June 20, 2023

माजी संपादकांचा अनोखा सन्मान...

माजी संपादकांचा अनोखा सन्मान...
लोकमत अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती आनंद सोहळा साजरा करताना या आवृत्तीच्या संपादकत्वाची धुरा सांभाळलेल्या आजवरच्या सर्व माजी संपादकांचा व युनिट हेड्सचा मा. राज्यपाल श्री रमेश बैस जी यांच्याहस्ते सन्मान करवून लोकमत व्यवस्थापनाने संपूर्ण माध्यम जगतात एक नवा आदर्श घालून दिला. यानिमित्ताने कधी नव्हे तो, सर्व आजी-माजी संपादक एकत्र येण्याचा अनोखा व पत्रसृष्टीत दुर्मिळ ठरणारा योग घडून आला. विशेष म्हणजे लोकमतच्या प्रारंभ काळातील संपादक दिवंगत पत्रपंडित पा. वा. गाडगीळ व पत्रमहर्षी बाबा दळवी यांच्या स्मृत्यर्थ शोध पत्रकारिता व उत्कृष्ट लेखनासाठी दरवर्षी लोकमत तर्फे पुरस्कार दिले जातात. आपल्या प्रथम संपादकांच्या नावे पुरस्कार देणारा लोकमत एकमेव वृत्तपत्र समूह मानला जातो. संपादकांचा सन्मान राखण्याची ही भूमिकाच लोकमतमधील पारिवारिक कार्य संस्कृतीचा परिचय देणारी आहे, जिची रुजूवात लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी केली आणि एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्यासह नव्या नेतृत्वानेही मनःपूर्वक जपली, जोपासली आहे. चालू वर्ष हे श्रद्धेय बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. बाबूजींनी आम्हास काय दिले, तर पत्रकारिता परमो धर्माची शिकवण दिलीच, शिवाय आम्ही अभिमानाने सांगतो की हे जाणिवेचे, कृतज्ञतेचे संस्कार दिलेत.
अकोला आवृत्तीचा रौप्य महोत्सव वर्षपूर्ती सोहळा साजरा करताना हाच आदर्श जपला गेला. सर्वश्री योगेंद्र जुनागडे, संजय आवटे, बाळ कुलकर्णी, गजानन जानभोर, अविनाश दुधे, प्रेमदास राठोड, रवी टाले तसेच युनिट हेड राहिलेले सुशांत दांडगे व रमेश डेडवाल यांचा यावेळी सन्मान केला गेलाच, शिवाय स्व. प्रभाकर पुराणिक यांच्या कन्या अनिमा कुलकर्णी व युनिट हेड राहिलेले स्व. तेजकिरण दर्डा यांच्या कन्या सौ. भक्ति यांनाही आठवणीने बोलावून सन्मानित केले गेले. अकोला लोकमतच्या वाटचालीत पहिल्या दिवसापासून म्हणजे 25 वर्षांपासून सेवारत असलेले प्रकाश वानखेडे, संदीप दिवेकर, शैलेश येंडे व विनायक जोशी यांचाही गौरव केला गेला. या सर्वांच्या परिश्रमाच्या पायावरच आज अकोला आवृत्तीच्या यशाची इमारत उभी आहे. ... ही आहे 'लोकमत'ची आपले संपादक व कर्मचाऱ्यांप्रतीची पारिवारिक भावना व कृतज्ञता. म्हणूनच तर सर्वांच्या मनामनातून व रोमा रोमातून उद्घोष होतो... My Lokmat, जय लोकमत! #LokmatAkola #LokmatAkolaSilverJubilee2023 #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment