Tuesday, September 26, 2023

'ती'चा गणपती...

Sept 19, 2023 'ती'चा गणपती...
'ती' म्हणजे भक्ती व शक्तीही. संस्कार व संस्कृतीची खरी वाहकही 'ती'च. म्हणूनच सर्वच क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या 'ती'च्या हाती आरतीचे ताट देत यंदा लोकमत कार्यालयात 'ती'चा गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली.
दहा वर्षांपूर्वी पुणे येथे या अभिनव संकल्पनेची रुजुवत केली गेली, जी आज एक चळवळ बनली आहे. सौ. ज्योत्स्नाभाभीजी दर्डा यांनी लोकमत सखी मंचची स्थापना करीत महिला भगिनींच्या स्वयं सिद्धतेला बळ देण्याचे जे प्रयत्न आरंभिले, त्याला पुढे नेण्यासाठीच लोकमत व्यवस्थापनाने 'ती'चा गणपतीच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अकोल्यात स्वराज भवन ते लोकमत कार्यालयापर्यंत वाजत गाजत बाईक रॅली काढून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली. प्रतिदिनी भगिनींच्याच हस्ते श्रींची पूजा आरती होणार आहे. ।। गणपती बाप्पा मोरया ।। #LokmatAkola #TichaGanapati

No comments:

Post a Comment