Tuesday, September 12, 2023

आस्थेचा उत्सव, श्रद्धेचा पूर ...

sept. 11, 2023 आस्थेचा उत्सव, श्रद्धेचा पूर ...
अकोल्याची कावड यात्रा म्हणजे आस्थेचा उत्सव असतो, ज्यात श्रद्धेचा पूर आलेला पहावयास मिळतो. ग्रामदैवत श्री राज राजेश्वरास जलाभिषेकासाठी होणाऱ्या या कावड महोत्सवाचे सर्वोत्कृष्ट महाकव्हरेज करण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने केला, त्याचा मनस्वी आनंद आहे.
यंदाही या उत्सवात सक्रियपणे सहभागी झालो. गांधी चौकात मानाच्या श्री राज राजेश्वर पालखीचे लोकमत तर्फे स्वागत केले. सार्वजनिक उत्सव समितीचे राजेश भारती, पप्पू मोरवाल, भाजपा नेते डॉ. अशोक ओलांबे तसेच शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार तुकाराम बिडकर, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीकिशनजी बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी महापौर मदन भरगड, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आदींच्या यात भेटी झाल्या. भक्तीचा गुलाल उधळून घेत 'हर बोला महादेव'च्या निनादात हा सोहळा अनुभवणे विलक्षण समाधानाचे असते. #LokmatAkola #AkolaKawad #KiranAgrawal

No comments:

Post a Comment