Sunday, October 8, 2023

अनुभव संपन्नता वाढविणारे पर्यटन ...

Sept. 27, 2023 अनुभव संपन्नता वाढविणारे पर्यटन ...
चालणे हे आरोग्यासाठी लाभदायक, तसे फिरणे म्हणजे पर्यटन हे शिकण्यासाठी उपयोगाचे. फिरत रहा. आपला परिसर व जग पालथे घाला म्हणजे आपण नेमके कुठे आहोत याची जाणीव होते. आपण इतर परिसर बघतो, अन्य माणसांमध्ये वावरतो; त्यांचे राहणे- वागणे बघतो, त्यांची संस्कृती संस्कार बघतो, तेव्हा त्यातून खूप शिकायला मिळते. आपण घडण्याची प्रक्रिया त्यातून गतिमान होते, असा माझा तरी अनुभव आहे. यानिमित्ताने नव्यांशी मैत्री तर होतेच, शिवाय आहे त्यांची मैत्री घट्टही होते. 'लोकमत' समूहाने आम्हाला वेळोवेळी अशी संधी उपलब्ध करून दिली हे यानिमित्ताने आवर्जून सांगावेसे वाटते.
Today is World Tourism Day... यानिमित्त खास आजवरच्या सहकारींसमवेत पर्यटनाच्या काही मधुर आठवणी... #KiranAgrawal

No comments:

Post a Comment