Sunday, October 8, 2023

निर्माल्य संकलनासाठी अभिनव कलश रथ...

Sept, 27, 2023 निर्माल्य संकलनासाठी अभिनव कलश रथ...
बाप्पा श्री गणरायाला उद्या निरोप दिला जाणार आहे. बाप्पांचे विसर्जन करताना सोबतचे निर्माल्यही नदीत टाकून दिले जाते, ज्यामुळे जल प्रदूषण होते. बरेच जण रस्त्यातही निर्माल्य टाकून देतात, जे पायदळी येऊन अनावधानाने अनादर घडून येतो. हे टाळण्यासाठीच ऍड. धनश्री देव स्मृती सेवा प्रतिष्ठान व लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन गोल्ड तर्फे अकोल्यात आजपासून निर्माल्य कलश रथ गल्लोगल्ली पोहोचून निर्माल्य संकलन करणार आहे. या निर्माल्यातुन खत निर्मिती करून नंतर ते घरगुती कुंडी धारकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रतिष्ठानचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांच्या संकल्पनेतून ही अभिनव व काळाची गरज बनलेली मोहीम साकारली. या कलश रथाला झेंडी दाखवून रवाना करण्याची संधी मला लाभली, याचा मनस्वी आनंद आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे महासचिव श्री सिद्धार्थ जी शर्मा, एकपात्रीकार दिलीप देशपांडे, जयंतराव सरदेशपांडे, डॉ. राजकुमार हेडा, अनिता उपाध्याय, अंशु जैन आदी. यावेळी उपस्थित होते. #KiranAgrawal

No comments:

Post a Comment