Monday, October 30, 2023

आकाशातील लालीही पाण्यात उतरते...

22 Oct, 2023 आकाशातील लालीही पाण्यात उतरते...
नवरात्रीचा रंगोत्सव एकीकडे साजरा होत असताना जेव्हा आकाशातील लालीही पाण्यात उतरते तेव्हा भवतालचा कॅनव्हास मनमोहक झाल्याखेरीज राहात नाही. अंतरी मलकापूर येथील श्री राधाकुंज नेचरकेअर ऍग्रो टुरिझम सेंटर व स्वयंभू महादेव मंदिर परिसरात असेच चित्र अनुभवयास मिळते. फर्टीलायझर इंजिनीयर राहिलेल्या अरविंद देठे पाटील या सद्गृहस्थाने आपल्या अफाट कल्पनाशक्तीतून अध्यात्म व निसर्ग याची अप्रतिम सांगड घालून हे कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. पाण्याने वेढलेले महादेवाचे मंदिर, तळ्याकाठी वसलेले पर्यटन केंद्र व त्यात पदोपदी प्रदर्शित राधा कृष्णाचा नामोल्लेख... अबाल वृद्धांचा थकवा घालविणारेच ठरले आहे. या परिसरातून जाताना दर्शनाच्या ओढीने मंदिरात गेलो व देठे पाटील यांची भेट झाल्यावर त्यांनी अगत्याने स्वागत करून या केंद्राच्या विकासाचा जो पट उलगडला तो थक्क करणारा ठरला. Great development by Mr. Arvindrao ... #KiranAgrawal

No comments:

Post a Comment