Thursday, December 21, 2023

Saraunsh published in Akola Lokmat on DEC, 17, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231217_2_13&fbclid=IwAR3K3SW-NtnMb3v237BQXbdvi46osrx489z5TUp_JxbZBHdjAxuwkUmETkI

Vietnam Tour ...

Dec, 2023 Vietnam Tour ... Picx @ Da Nang, Coconut vilage, Huion
Halong Bay..
Hanoi / coconut vilage

Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 10, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231210_2_4&fbclid=IwAR30SGgnbagkrFJa7kIOV34_mMiqoV_uvRWORN4dpjMwXxrS6mGc-5YAuPs
https://www.lokmat.com/editorial/the-questions-in-the-west-should-be-fixed-a-a520-c310/?fbclid=IwAR0YiE5LKz1Ujy1-MeneDuCWjuLwGBsbKwsWx4SPkfDBD98aTbXjhfU7HwM

खरेदीदारांचे भाग्यही उजळले...

07 Dec. 2023 खरेदीदारांचे भाग्यही उजळले...
दिवाळीत अकोल्यातील विविध आस्थापनांमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 'ये दिवाली इनामोवाली...' या टॅग लाईनने लोकमत फेस्टिवल बोनांझा 2023 योजना घोषित करण्यात आली होती. विविध व्यवसायातील 23 आस्थापनांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडून दिवाळीची खरेदी करणाऱ्या बंधूंसाठीचा लकी ड्रॉ काल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय ठमके व महाबीजच्या मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक श्री प्रकाश ताटर यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सेंटर पॉईंट येथे एका सोहळ्यात काढण्यात आला. टीव्हीएस ज्युपिटरसह तब्बल 300पेक्षा अधिक बक्षीसांची लयलूट असलेल्या या योजनेतील भाग्यवंतांची नावे जाणून घेण्यासाठी लोकमत वाचायला हवा. या कार्यक्रमादरम्यान अतिथी व अकोल्यातील जाहिरात एजन्सीजचे संचालक सर्वश्री श्याम सारभुकन, विजय रांदड, बबनराव ठाकरे, माई, युवराज कदम तसेच युनिट हेड आलोक कुमार शर्मा, समाचारचे प्रभारी अरुण कुमार सिन्हा व जाहिरात विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडेय आदींसमवेतचे आनंद चित्र... #LokmatAkola #KiranAgrawalLokmat

Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 03, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231203_2_3&fbclid=IwAR0e3R0mCo16Z5X5v5xKS0e3_zuc7Id_OJNm4k98sRuMHSY6u_yN8NoHpIQ
https://www.lokmat.com/editorial/the-government-announced-the-system-needs-implementation-a-a520-c310/?fbclid=IwAR0SFV9G9jyRQMTrg3nZadL50c0iRnTdy7gcjN-FPwrBgNbpDOaf8q9UFAc

Vietnam Tour Diary 2023

27 Nov. 2023 Vietnam Tour Diary...
Now enjoying in Vietnam with Unit Head Alok kumar ji Sharma n Samachar Prabhari Arun kumar Sinha ji... Ha long Bay... अतिशय सुंदर आयर्लंड. पाण्याने वेढलेल्या छोट्या छोट्या पर्वतांचा समूह. या समूहात क्रूझद्वारे भटकंती म्हणजे भन्नाट, अवर्णनीय असा अनुभव. पाण्याच्या प्रवाहामुळे आकारास आलेल्या नैसर्गिक गुंफांचा पर्यटन स्थळ म्हणून केलेला सुंदर विकास. येथे कोलंबो श्रीलंकेतून आलेले रेव्ह. रेहाना भेटले. भारतीय श्रद्धा व आस्थेबद्दल विदेशात असलेले औत्सुक्य त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
Thanks to our Young n dynamic leader, Editorial Director Hon. Karanbabuji n Lokmat management for this tour... #KATourDiary

River front of Sabarmati, Ahmadabad

26 Nov. 2023
@ River front of Sabarmati, Ahmadabad #KiranAgrawal #KATourDiary

Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 26, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231126_2_6&fbclid=IwAR1WIh1gMV2xuDix3yJO2Yiyz0LiZa7VlICSR4qktxc9dt73alf8QiFhsLo
https://www.lokmat.com/editorial/executive-jumbo-now-the-need-to-increase-party-work-a-a520-c310/?fbclid=IwAR1CRz-89jsIfxSTN5rNI5hz9_m_7MsqlRcxFnNmaisFlGAnvCfBssLS1I0

श्रद्धेय श्री जवाहरलालजी दर्डा यांचे 26वे पुण्यस्मरण.

25 Nov. 2023 श्रद्धेय श्री जवाहरलालजी दर्डा यांचे 26वे पुण्यस्मरण.
लोकमतचे आधारवड, आमचे बाबूजी स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय श्री जवाहरलालजी दर्डा यांचे आज 26वे पुण्यस्मरण. दिनदलित, उपेक्षित, वंचित घटकांचा आवाज बनण्याची प्रेरणा देणाऱ्या आणि सोबतच काळानुरूप नवनवीन बदल अंगीकारून सर्वोत्तम ते देण्याची शिकवण देणाऱ्या बाबूजींच्या स्मृतीचा सुगंध आमच्यासाठी प्रेरणा व स्फूर्तीदायी आहे. त्यांची शिकवण हीच आमची शिदोरी. शत शत नमन... #Lokmat #LokmatAkola #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 19, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231119_2_3&fbclid=IwAR0e3R0mCo16Z5X5v5xKS0e3_zuc7Id_OJNm4k98sRuMHSY6u_yN8NoHpIQ
https://www.lokmat.com/editorial/fireworks-are-needed-for-wildlife-conservation-a-a520-c310/?fbclid=IwAR3J70D1ruH3dW7kM8cB7bb5cP28XeEb1ih1dGwZmVE0bssh91H8L3urJbU

दिवाळी 2023 ...

अंधाराला भेदणाऱ्या प्रकाशाच्या मागावर... #दिवाळी2023 #KiranAgrawal

Diwali Article in Akola Lokmat on Nov. 12, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HAKL_20231112_5_2&fbclid=IwAR0_cFN2dWdmWI3k4AxwpYHZ39cxaRO-EeGp_4OiKnQCjkEFgBSi8MYKFfU

Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 12, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231112_5_1&fbclid=IwAR1zpcxz9GErgLPOCD_7nPCPOoyj5jx0M7BLUWxiGFjWcBS4Ss4CZaIL8Zg

मातीचा गंध अन शौर्याची गाथा...

11 Nov. 2023 मातीचा गंध अन शौर्याची गाथा...
दिवाळीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही लोकमत कॅम्पस क्लब व समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. विविध शाळकरी मुलांनी यात 75 किल्ले साकारले. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा यानिमित्ताने मुलांनी गायीली. गौरवशाली गड किल्ल्यांचा अभ्यास केला. यातूनच तर होणार शिवप्रभूंच्या जाज्वल्य इतिहासाची व आपल्या कणखर, अभिमानी व स्वाभिमानी मराठी बाण्याची जपणूक. हल्लीची मुले मोबाईलच्या आहारी गेली म्हणून पालक वर्ग चिंतित असतो, शिवाय शहरी मुलांच्या अंगाला माती लागतेच कुठे?, पण किल्ले साकारताना बच्चे कंपनी संपूर्ण दिवस मोबाईलपासून दूर राहिली व छान मातीत खेळली. त्यांचे अवघे अंग मातीच्या गंधाने माखले. दिवाळीच्या सुट्टीचा त्यांचा पहिला दिवस असा मातीच्या संस्काराने समृद्ध झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. परीक्षक शरद कोकाटे, स्कुल कमिटीचे किशोर वाकुडकर, राजेश बाठे, लोकमतचे युनिट हेड आलोककुमार शर्मा आदी व्यासपीठावर समवेत होते. शक्तीच्या या उत्सवाशी भक्तीची नाळ जोडून 'रामायणा'तील प्रसंगही मुलांनी साकारून वातावरण भारून टाकले. समर्थ एज्युकेशन संस्थेचे प्रमुख प्रा. नितीन बाठे व त्यांच्या सर्व स्टाफने ऐन वसुबारसेच्या दिवशी परिश्रम घेऊन मुलांच्या कलागुणाला विकसित होण्याची संधी दिली. Thanks to Bathe Sir.. #LokmatAkola #KiranAgrawal #LokmatCampusClubAkola

एक पणती अशीही...

एक पणती अशीही...
विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समर्पित भावाने काम करणारे तरुण जेव्हा भेटतात, तेव्हा सारेच काही अंधारलेले नाही याची जाणीव होऊन आशावाद जागून जातो. प्रा राजेश पाटील ताले हा असाच एक युवक, अकोला जिल्ह्यातील माझोड गावचा. स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून या तरुणाची युवा सक्षमीकरण व साक्षरतेसाठीची धडपड सुरू आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत 75 वाचनालये त्यांनी सुरू केली आहेत. आजवर एक लाखावर पुस्तके जमा करून ती गरजूंपर्यंत पोहोचविली आहेत. भिलार प्रमाणे महाराष्ट्रातील दुसरे पुस्तकांचे गाव म्हणून माझोडला विकसित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आपल्याकडील पुस्तके हवीत म्हणून राजेशचा एके दिवशी फोन आला व तो राहुल ताले सोबत भेटायला कार्यालयात आला. त्याच्याशी चर्चा करताना त्याची धडपड जाणून खूप आनंद झाला. युवाशक्तीचा वापर विधायक कामांसाठी करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. ही अशी तरुण मुलच उद्याची नव्हे, तर आजची आशा आहे. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजय बाबूजी दर्डा यांनी लिहिलेल्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखांचे 'कुछ जख्म कुछ आवाज' व एडिटर इन चीफ श्री राजेंद्र बाबूजी दर्डा यांच्यावरील 'आमचं विद्यापीठ' ही पुस्तके देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. दिवाळीतील एक पणती साक्षरतेसाठी म्हणून अश्या प्रयत्नांना समाजाचे पाठबळ लाभयला हवे ... #LokmatAkola #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on Nov. 05, 2023

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231105_2_3&fbclid=IwAR1zpcxz9GErgLPOCD_7nPCPOoyj5jx0M7BLUWxiGFjWcBS4Ss4CZaIL8Zg
https://www.lokmat.com/editorial/dont-give-up-on-the-hope-of-the-rabbi-sir-a-a520-c310/?fbclid=IwAR3WlG16FGhdacHnscsHtyh-RZsc7U5nfHIfAp6FoUHllhjwszGYM9sxqI4