Tuesday, February 27, 2024

'गेटवे ऑफ इंडिया'वर लोकमत...

Feb. 15, 2024 'गेटवे ऑफ इंडिया'वर लोकमत...
महाराष्ट्रातील गुणरत्नांचा गौरव सोहळा म्हणजे लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस. यंदाचा #LokmatMaharashtrianOfTheYear Awards 2024चा सोहळा 15 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर रंगला. यानिमित्ताने वाचकांच्या मनामनात पोहोचलेला व महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेला 'लोकमत' गेटवेवर धडकला. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम सिंघानिया, अजय पिरॅमल यांच्यापासून ते राजकारणातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींपर्यंत आणि बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेते जितेंद्र, चॉकलेट बॉय रणबीर कपूर, महेश मांजरेकरजी पासून ते आयएएस, आयपीएस आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत यंदाचा हा संस्मरणीय सोहळा रंगला, जो 'गेटवे'च्या साक्षीमुळे ऐतिहासिकही ठरला. लोकमतची लोकप्रियता व लोकमान्यता यातून पुन्हा अधोरेखित झाली.
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, कार्यकारी संचालक श्री देवेंद्रबाबूजी दर्डा व या अवॉर्ड्सचे संकल्पक, लोकमतचे सह व्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक श्री ऋषीबाबूजी दर्डा यांनी अगत्याने सर्वांचे स्वागत केले. लोकमतचे तरुण नेतृत्व श्री. ऋषी बाबूजींच्या कल्पकतेतून विविध अवॉर्ड्सची ही शृंखला सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुणरत्नांचा शोध घेऊन त्यांचा गौरव करणारा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स हा त्यातील मुकुटमणीच! याच सोहळ्यातील संपादक मित्रांसोबतच्या सहभागाची ही काही आठवण चित्रे.. #LMOTY #KiranAgrawalLokmat

No comments:

Post a Comment