Monday, July 15, 2024

निसर्गाच्या सानिध्यातील योगा...

June 21, 2024 निसर्गाच्या सानिध्यातील योगा...
सतत कामाच्या व्यापात किंवा विचाराच्या तंद्रीत राहणाऱ्यांना जेव्हा निसर्गाचे सानिध्य व निवांतता लाभते तेव्हा स्वतःला हरवून बसावे असेच वाटते. जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावर असलेल्या विश्रामगृहात एकदा मुक्काम करावा लागला. त्यावेळी पहाटेचा वारा अंगावर घेत पशुपक्षांच्या किलबिलाटात असाच अनुभव घेता आला. वाऱ्याचाही एक नाद असतो व त्यात पशुपक्षी आणि वृक्षांच्या पानांचाही, म्हणजे थोडक्यात निसर्गाचा मंजुळ स्वर जेव्हा मिसळतो तेव्हा जी अलौकिक अनुभूती लाभते ती शब्दातीतच असते. यावेळी सरोवराच्या काठावर निळ्या आकाशाखाली छान योगासनेही केली होती. माझ्या नकळत त्या मुद्रा आमचे वार्ताहर श्री रहेमान नवरंगाबादी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपुन मला नंतर पाठविल्या होत्या. आज #जागतिकयोगदिन निमित्ताने त्या क्षणांची आठवण जागी झाली...
#InternationalYogaDay #KiranAgrawal

No comments:

Post a Comment