Friday, December 26, 2025

'लोकमत सखी'साठी कार्यक्रम ...

Dec 2025
'लोकमत सखी'साठी कार्यक्रम ...
आजच्या धावपळीच्या रहाटगाड्यात व कुटुंबाची जबाबदारी पेलता, पेलता भगिनींना स्वतःसाठी आनंदाचे वा करमणुकीचे क्षण शोधणे अवघडच होऊन बसते. म्हणूनच 'लोकमत सखी'च्या माध्यमातून 'तुमच्यासाठी कायपण..' हा खास लावणीचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यास नेहमीप्रमाणे भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. जळगावचे बालगंधर्व खुले नाट्यगृह ओसंडुन वाहिले. निहारिकाज फॅशन हबच्या संचालिका डॉ. शीतल भोळे, तसेच डॉ. शीतल भोसले, डॉ निलेश चांडक, कार्यक्रमाचे दिग्दर्शक योगेश देशमुख, उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी याप्रसंगी समवेत होते. #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #LokmatEvent

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 21 Dec 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251221_2_1&fbclid=IwY2xjawO7QrpleHRuA2FlbQIxMABicmlkETFoWVoxdHJaRW1TOHRqbnRhc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHh7ebGFFiYQW1ypwrrwDp7iFaFq4CIQkbhQSGgnBfm7-46adaos0G15cp5ax_aem_xPbbW-4dHaU7UIbmkq0owQ

तपस्वी व्यक्तिमत्त्वाची एक्झिट...

18 Dec 2025 तपस्वी व्यक्तिमत्त्वाची एक्झिट...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांच्या 'एक्झिट'ने समस्त कलाक्षेत्राचे एक पर्व निमाले आहे. शिल्पसृष्टीतील तपस्वी कलाकार असलेल्या राम काकांनी नर्मदा सरोवराकाठच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह विविध राष्ट्रपुरुषांचे शिल्प देश विदेशात साकारले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण अशा अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित या व्यक्तिमत्वास मुंबईत झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2019'च्या कार्यक्रमात भेटण्याचा योग आला होता. इतके उत्तुंग व्यक्तिमत्व, पण त्यांनी ज्या आपलेपणाने विचारपूस केली व संवाद साधला ते कदापी विसरता येणार नाही. त्यांचे जन्मगाव धुळे जिल्ह्यातील, त्यामुळे तेथले हालहवाल त्यांनी जाणून घेतले होते. त्यांच्यातील साधेपणा व हळवेपणाचा तो प्रत्यय भारावून टाकणाराच होता. राम काकांना भावपूर्ण अभिवादन... #RamSutar

ऊर्जादायी सोहळा ! Jalgaon Lokmat Anniversary 2025

15 Dec 2025 ऊर्जादायी सोहळा !
लोकमत जळगाव आवृत्तीने 15 डिसेंम्बर रोजी 48 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 49व्या वर्षात म्हणजे सुवर्ण महोत्सवी उंबरठ्यावर पाऊल ठेवले. यानिमित्त आयोजित स्नेह सोहळ्यात कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कडाक्याच्या थंडीतही रात्री उशिरापर्यंत स्नेहींची वर्दळ सुरूच होती, हे अपूर्व पाठबळ व त्यातून लाभलेली ऊर्जा हीच लोकमतची खरी शक्ती. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा तसेच लोकमतचे नेतृत्वकर्त्या नवीन पिढीचे सर्वश्री. देवेन्द्रबाबूजी, ऋषीबाबूजी, करणबाबूजी दर्डा व संपूर्ण व्यवस्थापनानेही वाचकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. धन्यवाद वाचक, हितचिंतक मित्रांनो ...
#LokmatJalgaon #LokmatJalgaonAnniversary2025 #LokmatJalgaonAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 14 Dec 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251214_7_1&fbclid=IwY2xjawO7PN9leHRuA2FlbQIxMABicmlkETFoWVoxdHJaRW1TOHRqbnRhc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHhnxwdWDwF2WtgUIpv21zi0U55YccYffx1mezuDWRwYPSHRZ-j5dVIIX01Cr_aem_CTy1LA94AEQJ7RROtxqsiw

लोकमत शिलेदार सन्मान सोहळा Jalgaon 2025

08 Dec 2025 लोकमत शिलेदार सन्मान सोहळा...
विविध क्षेत्रात समर्पण भावाने कार्य करून एक प्रकारे समाजासाठी शिलेदारी करणाऱ्या कर्तबगार मान्यवरांचा लोकमत शिलेदार सन्मान सोहळा जळगावी उत्साहात पार पडला. आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे, माजी खासदार व गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, राज्याच्या पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, जिल्हाधिकारी रोहन घुगे, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगला.
ent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEidrIKftPPvxVj-Hs6ynRPJiVYFMhJuUJ8iYMTUpA44as8x_jvt6Op0eT3mxapPQkerdE-xTRppf3Bf-YQErV2SO_h33IYKIZIl9TBOO2kWUh2Nz2Zea3AmK2keWlxJz3ryKm8EzFwsbe-HoP_lDvHuGT392znaWFHMAvEnpI4NKa1rJ22RoAf7u2Wi7Sk/s1369/597560451_846004198168334_2261860686601246330_n.jpg" style="display: block; padding: 1em 0; text-align: center; ">
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatShiledarSanman2025 #KiranAgrawalLokmatJalgaon

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 07 Dec 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251207_4_1&fbclid=IwY2xjawO7Os1leHRuA2FlbQIxMABicmlkETFoWVoxdHJaRW1TOHRqbnRhc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHrBiUoylP-RU2K9NjgoitYq4zjf_G1EV2kBIY4vcbA5tHDh9dhMTqfLhhwSo_aem_6zchPlZIsCDnZUcCean80Q

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 30 Nov 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251130_2_1&fbclid=IwY2xjawO7OhpleHRuA2FlbQIxMABicmlkETFoWVoxdHJaRW1TOHRqbnRhc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHlquNNk9NUFXMLD95zcStmYlyyZzHllI5-vS055G29frxJemUXvmuhkxUidN_aem_G2v9ivacrt_4hGtim0Qi-Q

क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ .. लोकमत महागेम्स! 2025

29 Nov, 2025 क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ .. लोकमत महागेम्स!
शालेय स्तरावरील क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठी 'लोकमत'तर्फे राज्यातील पहिल्या व सर्वात मोठ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ ठरणाऱ्या 'लोकमत महागेम्स'चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जळगाव येथे तब्बल 14 विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. लोकमत कॅम्पस क्लबच्या फाऊंडर रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून व अभय भुतडा फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित 'लोकमत महागेम्स'चा जळगावमधील शुभारंभ जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यामध्ये सुमारे 4000पेक्षा अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जळगाव जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण खान्देशात विविध क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांची सहभागीता कशी वाढीस लागली आहे याचे प्रत्यंतर यानिमित्ताने आले.
लोकमत महामॅरेथॉन प्रमाणेच लोकमत महागेम्सना संपूर्ण राज्यात भरभरून सहभाग लाभत असून, क्रीडा संवर्धनात लोकमत बजावत असलेली भूमिका खेळाडू व क्रीडा शिक्षकांनाही बळ देणारी ठरत आहे. या स्पर्धेचे जळगावमधील उदघाटन व कराटे, बॉक्सिंग, कबड्डी आदी खेळाच्या बक्षीस वितरणाप्रसंगीची ही काही आनंद चित्रे... #LokmatJalgaon #LokmatMahaGames #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

Lokmat Jalgaon Diwali Edit - 2025

Lokmat Jalgaon Diwali Edit - 2024

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 23 Nov 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251123_3_1&fbclid=IwY2xjawO7NxRleHRuA2FlbQIxMABicmlkETFoWVoxdHJaRW1TOHRqbnRhc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHmauIYxbiZTZaAmT1t_Te_np7ae5AIGeBVA4ZG16hAuNIEQiEY7Uls639rRs_aem_AO63fsP3pJHHQV8aG5wFpA

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 16 Nov 20225

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251116_2_1&fbclid=IwY2xjawO7NjRleHRuA2FlbQIxMABicmlkETFoWVoxdHJaRW1TOHRqbnRhc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHlT2HBSeqMQo4f-QyflU4jgFia4g1DWdcunUb01FpR0aCil7cNMxbuUSk_d-_aem_hPPHhyPtJAxKG2Y-wTrKdQ