Friday, December 26, 2025

'लोकमत सखी'साठी कार्यक्रम ...

Dec 2025
'लोकमत सखी'साठी कार्यक्रम ...
आजच्या धावपळीच्या रहाटगाड्यात व कुटुंबाची जबाबदारी पेलता, पेलता भगिनींना स्वतःसाठी आनंदाचे वा करमणुकीचे क्षण शोधणे अवघडच होऊन बसते. म्हणूनच 'लोकमत सखी'च्या माध्यमातून 'तुमच्यासाठी कायपण..' हा खास लावणीचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. त्यास नेहमीप्रमाणे भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. जळगावचे बालगंधर्व खुले नाट्यगृह ओसंडुन वाहिले. निहारिकाज फॅशन हबच्या संचालिका डॉ. शीतल भोळे, तसेच डॉ. शीतल भोसले, डॉ निलेश चांडक, कार्यक्रमाचे दिग्दर्शक योगेश देशमुख, उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी याप्रसंगी समवेत होते. #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #LokmatEvent

No comments:

Post a Comment