Friday, December 26, 2025

क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ .. लोकमत महागेम्स! 2025

29 Nov, 2025 क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ .. लोकमत महागेम्स!
शालेय स्तरावरील क्रीडा नैपुण्याला संधी देण्यासाठी 'लोकमत'तर्फे राज्यातील पहिल्या व सर्वात मोठ्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचा महाकुंभ ठरणाऱ्या 'लोकमत महागेम्स'चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जळगाव येथे तब्बल 14 विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या. लोकमत कॅम्पस क्लबच्या फाऊंडर रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून व अभय भुतडा फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित 'लोकमत महागेम्स'चा जळगावमधील शुभारंभ जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यामध्ये सुमारे 4000पेक्षा अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जळगाव जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण खान्देशात विविध क्रीडा प्रकारातील विद्यार्थ्यांची सहभागीता कशी वाढीस लागली आहे याचे प्रत्यंतर यानिमित्ताने आले.
लोकमत महामॅरेथॉन प्रमाणेच लोकमत महागेम्सना संपूर्ण राज्यात भरभरून सहभाग लाभत असून, क्रीडा संवर्धनात लोकमत बजावत असलेली भूमिका खेळाडू व क्रीडा शिक्षकांनाही बळ देणारी ठरत आहे. या स्पर्धेचे जळगावमधील उदघाटन व कराटे, बॉक्सिंग, कबड्डी आदी खेळाच्या बक्षीस वितरणाप्रसंगीची ही काही आनंद चित्रे... #LokmatJalgaon #LokmatMahaGames #LokmatEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment