Friday, December 26, 2025

तपस्वी व्यक्तिमत्त्वाची एक्झिट...

18 Dec 2025 तपस्वी व्यक्तिमत्त्वाची एक्झिट...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांच्या 'एक्झिट'ने समस्त कलाक्षेत्राचे एक पर्व निमाले आहे. शिल्पसृष्टीतील तपस्वी कलाकार असलेल्या राम काकांनी नर्मदा सरोवराकाठच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह विविध राष्ट्रपुरुषांचे शिल्प देश विदेशात साकारले आहेत. पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण अशा अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित या व्यक्तिमत्वास मुंबईत झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2019'च्या कार्यक्रमात भेटण्याचा योग आला होता. इतके उत्तुंग व्यक्तिमत्व, पण त्यांनी ज्या आपलेपणाने विचारपूस केली व संवाद साधला ते कदापी विसरता येणार नाही. त्यांचे जन्मगाव धुळे जिल्ह्यातील, त्यामुळे तेथले हालहवाल त्यांनी जाणून घेतले होते. त्यांच्यातील साधेपणा व हळवेपणाचा तो प्रत्यय भारावून टाकणाराच होता. राम काकांना भावपूर्ण अभिवादन... #RamSutar

No comments:

Post a Comment