At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Thursday, August 6, 2026
Saraunsh in Jalgaon Lokmat on 02 August, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260802_4_1&fbclid=IwY2xjawThT9BwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeMqKmcvgYbo3nFMi5YmR2AiYNlLbA73PwL0fsAT_ouR10-Owe24JpBfoDSg8_aem_AzZwd7ynQIhCrkoYwqlXGg
नंदुरबार 'लोकमत'चा वर्धापन दिन 2026
30 July, 2026
नंदुरबार 'लोकमत'चा वर्धापन दिन...
लोकमतच्या नंदुरबार विभागीय कार्यालयाचा 29वा वर्धापनदिन सोहळा नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी 'तीन दशकातील नंदुरबार' या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाची पताका फडकविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
****
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा आमदार चंद्रकांत भैय्या रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, काँग्रेसचे नेते राजेंद्रकुमार गावित, शहादा नगराध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ऍड संजय पुराणिक, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
नंदुरबार लोकमतचे हॅलो हेड रमाकांत पाटील, सहकारी मनोज शेलार, भूषण रामराजे, सायसिंग पाडवी व जिल्ह्यातील वार्ताहर बंधूंनी यासाठी परिश्रम घेतले.
लोकमतवर प्रेम करणाऱ्या नंदुरबारकर वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद ! Kiran Agrawal
#LokmatNandurbar #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 26 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260726_4_1&fbclid=IwY2xjawThTGBwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEemaEfAthk8Mh1RUGeJfiW0Qk7O_5KOG3yC8Us-5RnYSD71eLMRPAwpsH0xMk_aem_nq9VtstgQLJmVjV5PzGL8A
Saraunsh in Jalgaon Lokmat on 19 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260719_4_1&fbclid=IwY2xjawThS9NwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEewoJNT_xiwSXTCYwVuR5rKlOY5grvxHaEaxn1_Bn0d2d1CCcg3saQlDgD5iQ_aem_svoPtgownsCVRKQOI2ImnQ
Lokmat Principals Meet 2026
08 July, 2026
Lokmat Principals Meet 2026
शिक्षणाचे प्रवाह कितीही बदलले किंवा गुगल व एआय गुरुचे तंत्र त्यात अवलंबिले गेले तरी माणसातला माणूस घडवण्याची / त्यात संवेदना जागवण्याची प्रक्रिया गुरुजींनाच पार पाडावी लागणार आहे...
नवीन शैक्षणिक पर्वाच्या प्रारंभानिमित्त लोकमत कॅम्पस क्लब तर्फे आयोजित 'प्रिन्सिपॉल्स मिट 2026' मध्ये विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधता आला.
माजी खासदार व गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी व्यासपीठावर समवेत होते Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatCampusClub #LokmatPrincipalsMeet #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 12 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260712_2_2&fbclid=IwY2xjawThSk9wZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeh7hm58-mg09Knif0Wx8BBmqx3h8Xltb-5u_05NKymLjExWEZZ7L66q33NCE_aem_oU8VhClr5yDwqm3wBT0_EA
लोकमत भारत रत्नमाला योजनेस उस्फुर्त प्रतिसाद ..
07 July, 2026
लोकमत भारत रत्नमाला योजनेस उस्फुर्त प्रतिसाद ..
हल्ली मुले पुस्तकांऐवजी मोबाईलमध्ये अडकून बसल्याची पालकांची तक्रार आहे. ते खरेही आहे.
स्वाभाविकच 'व्हाट्सअप यूनिवर्सिटी' मध्ये जे येते तेच ज्ञान समजून त्यांची घडणूक होत आहे. हे टाळून आपला इतिहास, संस्कृती काय; आपले राष्ट्रपुरुष, आदर्श कोण? त्यांच्या कर्तृत्व आणि कार्याचा वारसा कोवळ्या मुलांच्या मनात बिंबवण्यासाठी व त्यांना मोबाईलमधून बाहेर पडून वाचनाची गोडी लागावी याकरिता लोकमतने 'भारत रत्नमाला' नामक योजना आणली आहे.
अमळनेर तालुक्यातील मारवडच्या सु. ही. मुंदडे हायस्कूल व श्रीमती द्रौ. फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय येथे या लोकमत भारत रत्नमाला उपक्रमानिमित्त नुकतीच भेट दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांशी यानिमित्त संवाद साधता आला. या योजनेस विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
लोकमतचे एडिटर इन चीफ मा. श्री. राजेंद्रबाबूजी दर्डा यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणूनही प्रभावीपणे जबाबदारी निभावली आहे. एकूणच शिक्षणाबाबत त्यांच्या मनात असलेल्या आत्मीयता व सजगतेतून मुलांचे भविष्य घडवण्याबाबत ते नेहमीच आग्रही असतात. बाल्यावस्थेतील पिढीवर संस्कार घडवण्याबाबतची त्यांची संवेदनशीलता आमच्यासाठी प्रेरणा ठरत आली आहे. त्याच अनुषंगाने इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरता लोकमतमध्ये 'भारत रत्नमाला' ही विशेष मालिका सुरू करण्यात आली असून, यामध्ये भारतरत्न व पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री यासारख्या सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेल्या महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची ओळख करून दिली जात आहे. ज्ञान व मनोरंजनासोबतच बक्षिसे जिंकण्याची संधीही या विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यानिमित्ताने मुलांनी पुस्तकांकडे व वाचनाकडे वळावे हाच यामागील हेतू आहे.
लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी, वितरण विभागाचे उप व्यवस्थापक राजेश सूर्यवंशी यावेळी समवेत होते. मारवडचे वार्ताहर डी. व्ही. पाटील यांच्या पुढाकारामुळे हा योग घडून आला.
#LokmatJalgaon #LokmatEvent #LokmarBharatRatnamala #KiranAgrawalLokmatJalgaon
ाडळसरे निम्न तापी प्रकल्पाला भेट
07 July, 2026
ाडळसरे निम्न तापी प्रकल्पाला भेट
अमळनेरनजिक तापी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पाडळसरे निम्न तापी प्रकल्पाला भेट देऊन सुरू असलेले काम बघितले.
जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या सिंचनाला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. खूप विस्तीर्ण पात्र असून, 24 गेट असलेला प्रकल्प साकारतो आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींचा सततचा पाठपुरावा व मा. अजितदादा पवार असताना त्यांनी लक्ष घातल्याने या प्रकल्पाला गती मिळाली. केंद्रानेही मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे बऱ्यापैकी काम पुढे गेले आहे.
नेहमी या प्रकल्पासंबंधीत बातम्या येतात. त्यामुळे साइटवर नेमके काय चालू आहे हे प्रत्यक्ष बघण्याची इच्छा होती. अमळनेर दौऱ्याच्या निमित्ताने ते बघता आले.
#PadalsareProject #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 05 July, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260705_2_11&fbclid=IwY2xjawThRrNwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEewoJNT_xiwSXTCYwVuR5rKlOY5grvxHaEaxn1_Bn0d2d1CCcg3saQlDgD5iQ_aem_svoPtgownsCVRKQOI2ImnQ
Dr. Dhole visit 2026
04 July, 2026
आपल्या नेहमीच्या कामकाज क्षेत्रापलीकडील व्यक्तींच्या भेटी या खूप काही शिकवून तर जातातच, शिवाय त्यातून नवे मित्र जोडल्याचा आनंदही लाभून जातो. प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक व भौतिकशास्त्रज्ञ, प्रोफेसर डॉ. संजय ढोले यांच्याशी झालेली भेट ही त्यापैकीच एक.
जळगाव येथील विद्यापीठाच्या कामानिमित्त आलेले डॉ. ढोले हे लोकमतचे विज्ञान कथा लेखक म्हणून असलेली नाळ जपत खास भेटीसाठी आले. पुणे येथील ज्ञान प्रसार ग्लोबल विद्यापीठात संचालकपदी कार्यरत असलेले डॉ ढोले यांच्या 14 विज्ञानकथा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून सुमारे चारशेच्या आसपास संशोधन निबंध विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाले आहेत.
तसे ते मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील. अमळनेरमध्येही शिक्षण झालेले, त्यामुळे इकडची ओढ व भावनिकता पदोपदी जाणवत होती. सध्याची एकूणच शैक्षणिक व्यवस्था व त्यातील आव्हाने याविषयी त्यांच्याशी खूप छान चर्चा झाली.
जळगाव येथील डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्रा. डॉ. रवींद्र बावने यांच्यामुळे हा योग घडून आला.
#LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon
रक्तदान शिबिराद्वारे आदरांजली...
02 July, 2026
रक्तदान शिबिराद्वारे आदरांजली...
लोकमतचे संस्थापक संपादक, स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या 103व्या जयंतीनिमित्त लोकमत व रेडक्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करून बाबूजींना आदरांजली..
जळगावच्या महापौर सौ दीपमाला काळे, रेडक्रॉस चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव सुभाष साखला, राजकुमार वाणी, डॉ. उल्हास तासखेडकर, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदि याप्रसंगी समवेत होते
#LokmatJalgaon #Babuji #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
लोकमत Icons of Nandurbar 2026 ...
26 June, 2026
लोकमत Icons of Nandurbar 2026 ...
नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून इतरांपुढे आदर्श ठेवणाऱ्या मान्यवरांचा लोकमत माध्यम समूहातर्फे 'आयकॉन्स ऑफ नंदुरबार' म्हणून गौरव करण्यात आला.
लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी समाजातील चुकीच्या बाबींवर प्रहार करताना चांगल्याचे कौतुक करण्याचा संस्कार आम्हाला दिला. लोकमत माध्यम समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्यासह सर्व संचालकांनी पत्रकारिता परमो धर्माच्या जाणिवा खोलवर रुजवत समाजातील सकारात्मकता व आदर्शांच्या पाठीशी बळ उभे करण्याची शिकवण दिली. त्यातूनच सरपंच ते संसद सदस्यांपर्यंतचे सन्मान सोहळे व ठिकठिकाणचे आयकॉन्स शोधून त्यांच्या गौरवाचे कार्यक्रम घेतले जात असतात.
नंदुरबारमधील अशाच आयकॉन्सच्या गौरव सोहळ्यास केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव राजेंद्र गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवर व उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदीं समवेतची ही काही आठवण चित्रे... Kiran Agrawal #किरणअग्रवाल
#LokmatJalgaon #LokmatNandurbar #IconsOfNandurbar #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 28 June, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260628_2_1&fbclid=IwY2xjawThQMJwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEewoJNT_xiwSXTCYwVuR5rKlOY5grvxHaEaxn1_Bn0d2d1CCcg3saQlDgD5iQ_aem_svoPtgownsCVRKQOI2ImnQ
Yoga Day 2026
21 June, 2026
तन व मनाच्या सुदृढतेसाठी योगा...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज लोकमत सखी व श्री श्री रविशंकर जी प्रणित द आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र, श्री श्री स्कूल ऑफ योगाच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
यापूर्वी दि.15 ते 20 जूनपर्यंत प्रतिदिनी 3 सेशनमध्ये लोकमत व 'आर्ट ऑफ लिव्हिंग'तर्फे ऑनलाइन योगा शिबिर घेण्यात आले, यात देश विदेशातील लाखो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
तन व मनाच्या सुदृढतेबरोबरच आरोग्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे योगा असल्याने विविध शहरांमध्ये असंख्य बंधू-भगिनींनी या योगोत्सवात सहभाग घेतला.
जळगावमध्ये या योगात्सवाचा शुभारंभ संत बाबा हरिदासराम समाज मंदिर येथे झाला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, योगा ट्रेनर डॉ. रंजना बोरसे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील सिविल हॉस्पिटल, ला. ना. हायस्कूल, नूतन मराठा महाविद्यालय, डॉ अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, रोझ गार्डन या ठिकाणच्या योगोत्सव कार्यक्रमाला उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांच्यासमवेत सदिच्छा भेटी दिल्या. याप्रसंगीची काही छायाचित्रे... Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #LokmatYoga #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 21 June, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260621_2_1&fbclid=IwY2xjawThPnhwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEeGJnlRCBz8DhJx7kXfuNq8o27t7VOHWpW8KBgvP1aOnU7rHzYEd42S-_nywA_aem_og0Ikzc8-PBILQXSefj4Wg
नेतेपदाच्या घडवणुकीची पहिली पायरी..
नेतेपदाच्या घडवणुकीची पहिली पायरी..
ग्राम पातळीवरील विकासाचे शिलेदार असणाऱ्या सरपंचांना राज्यात ठिकठिकाणी लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026ने सन्मानित केले जात आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून केल्या जाणाऱ्या नेतृत्वाच्या घडवणुकीचा हा पहिला टप्पा म्हणता यावा, म्हणून या टप्प्यावरील सन्मान खासच!
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबारमध्ये नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडलेत. या सोहळ्यांमध्ये बोलतांनाची ही आठवण चित्रे... Kiran Agrawal #किरणअग्रवाल
#LokmatJalgaon #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh in Jalgaon Lokmat on 14 June, 2026
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260614_4_1&fbclid=IwY2xjawThL-VwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEe5ctsOev7Ei3rfQqwQ2VN6P9AvAi_QIIOJpYcacIu2og82SIuTAUc0R2Idg8_aem_jzL_ndcsT4-Tqb8fM0ldqw
लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ नंदुरबार
07 June, 2026
लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ नंदुरबार
नंदुरबार येथे झालेल्या लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 वितरण समारंभास आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, भाजपचे प्रांतीय सदस्य शशिकांत वाणी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatNandurbar #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ धुळे
06 June, 2026
लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 @ धुळे
धुळे येथे झालेल्या लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 वितरण समारंभास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार काशीराम पावरा, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatDhule #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Subscribe to:
Posts (Atom)

















































