Monday, February 15, 2021

Pheta.. Thanks

14 Feb, 2021
यु तो लिखता रहता हू बहुत कुछ आसनी से, भावनाओ को लफ्जो मे समेटना है मगर मुश्किल... मला जे वाचून, जाणून व ओळखून आहेत त्यांना हे माहीत आहे की माझ्या लेखनाची मुस कोणती आहे आणि स्वभाव कोणता आहे तो. तुम्हाला चांगलं काही दिसतच नाही का हो किंवा कुणाबद्दल काही चांगलं लिहिताच येत नाही का, अशा प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ त्यामुळेच माझ्यावर येते; अर्थात त्याबद्दल ना खेद, ना खंत. पण म्हणतात ना, कधीकधी आपत्ती ही इष्टापत्ती ठरून जाते तसे झाले म्हणायचे. कोरोनाने सर्वांची जीवनशैली बदलून ठेवली, तशी मला त्यानिमित्ताने वेगळा विचार करायला व भावनांना मोकळी वाट करून द्यायला संधी मिळाली. त्यातूनच फेसबुकच्या या भिंतीवर प्रसंगोत्पात वेगळं काहीबाही खरडत असतो. धर्मांतर, पक्षांतर, स्थलांतर, वेषांतर, भाषांतर होते वा असते; तसे हे माझे लेखांतर म्हणूया ... मूळ स्वभाव व पिंडापेक्षा वेगळे. पण वेळोवेळी आपण त्यावर कौतुकाची, पसंतीची मोहोर उमटवित असता; ती प्रत्येकवेळी नवी प्रेरणा देऊन जाते. माझ्या गेल्या फेटा / पगडी वरील पोस्टलाही आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मित्रांनो... #MajhaPhetaMajhiJababdari #KirananandNashik #KiranAgrawalNashik

No comments:

Post a Comment