Thursday, February 3, 2022

पंचविशीच्या उंबरठ्यावर...

Feb 03, 2022 पंचविशीच्या उंबरठ्यावर...
अकोला लोकमतला बघता-बघता 24 वर्षे पूर्ण होत आलीत. आता पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आवृत्ती 25व्या वर्षात पाऊल ठेवणार. या वर्षात काय काय करायचे याबाबत संपूर्ण टीम उत्साहित आहे. वर्धापन दिनाच्या तयारीलाही प्रारंभ झाला आहे.
नागरिकांच्या प्रबळ ईम्युनिटी व सावधगिरीपुढे गुडघे टेकून कोरोना पराभूत होऊन परतीला लागला आहे. त्यामुळे अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील सहकारींच्या बैठका घेतल्या. कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्याआधीच वाशिम व खामगावमधील सहकारी मित्रांच्याही बैठका घेऊन झाल्या होत्या. नव्या उमेदीने सारे सज्ज व सिद्ध आहेत रौप्य पर्वाच्या आरंभासाठी... यातही वाचक, जाहिरातदारांचे पाठबळ व प्रेम नेहमीप्रमाणे लाभेल याची खात्री आहे...
#LokmatAkola #KiranAgrawal

No comments:

Post a Comment