At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Tuesday, September 26, 2023
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 24, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230924_4_7&fbclid=IwAR1UC3bLiR7bxcNFFg9_5jg5WG7YG-QufHDlqzetE4FhMx5wPUw_fI4kcXA
https://www.lokmat.com/editorial/there-are-many-rats-in-the-distribution-system-a-a520-c310/?fbclid=IwAR2jTdnDftlkSPwIqZ6kxxUeKxdGNQfy2PubXiJLIKNGgRgu1myOwjMBgY4
'ती'चा गणपती...
Sept 19, 2023
'ती'चा गणपती...
'ती' म्हणजे भक्ती व शक्तीही. संस्कार व संस्कृतीची खरी वाहकही 'ती'च. म्हणूनच सर्वच क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणाऱ्या 'ती'च्या हाती आरतीचे ताट देत यंदा लोकमत कार्यालयात 'ती'चा गणपतीची प्रतिष्ठापना केली गेली.
दहा वर्षांपूर्वी पुणे येथे या अभिनव संकल्पनेची रुजुवत केली गेली, जी आज एक चळवळ बनली आहे. सौ. ज्योत्स्नाभाभीजी दर्डा यांनी लोकमत सखी मंचची स्थापना करीत महिला भगिनींच्या स्वयं सिद्धतेला बळ देण्याचे जे प्रयत्न आरंभिले, त्याला पुढे नेण्यासाठीच लोकमत व्यवस्थापनाने 'ती'चा गणपतीच्या माध्यमातून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.
अकोल्यात स्वराज भवन ते लोकमत कार्यालयापर्यंत वाजत गाजत बाईक रॅली काढून महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात श्रींची प्रतिष्ठापना केली. प्रतिदिनी भगिनींच्याच हस्ते श्रींची पूजा आरती होणार आहे.
।। गणपती बाप्पा मोरया ।।
#LokmatAkola #TichaGanapati
Saraunsh published in Akola lokmat on Sept 17, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230917_10_6&fbclid=IwAR0NUQhfGl2AA_051OjKLx2N6Smerj2mbWp0xFkLmSuKn5rsXg_bJp5yaog
https://www.lokmat.com/editorial/the-growth-of-agitations-in-the-prosperity-of-festivals-a-a520-c310/?fbclid=IwAR2WmBYyaWRv8Jh9EY3ZSnPNCU2ItAg3X7dMT32XMTC5KLzt2vcInKLnFNY
दिवाळी तयारीचा बिगुल वाजला...
Sept 14, 2023
दिवाळी तयारीचा बिगुल वाजला...
दिवाळी अंकांच्या परंपरेत लोकमतच्या 'दीपोत्सव'ने दर्जा व विक्री या दोन्ही बाबतीत विक्रम स्थापित केले आहेत. याचसोबत स्थानिक आवृत्ती पातळीवरही लोकमतचे दिवाळी अंक प्रकाशित होत असतात.
अकोला आवृत्तीच्या यंदाच्या दिवाळी अंकाच्या तयारीलाही प्रारंभ होऊन गेला आहे. यासाठी अकोला, बुलढाणा, खामगाव व वाशिम येथे सहकारी वार्ताहर मित्रांच्या बैठका नुकत्याच पार पडल्या. यात गतवर्षीच्या दिवाळी अंकात अभिनंदनीय कार्य करणाऱ्या सहकाऱ्यांना बक्षिस वाटप व वर्षभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
ही टीम हीच आमची शक्ती...
#LokmatAkola
Tuesday, September 12, 2023
आस्थेचा उत्सव, श्रद्धेचा पूर ...
sept. 11, 2023
आस्थेचा उत्सव, श्रद्धेचा पूर ...
अकोल्याची कावड यात्रा म्हणजे आस्थेचा उत्सव असतो, ज्यात श्रद्धेचा पूर आलेला पहावयास मिळतो. ग्रामदैवत श्री राज राजेश्वरास जलाभिषेकासाठी होणाऱ्या या कावड महोत्सवाचे सर्वोत्कृष्ट महाकव्हरेज करण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने केला, त्याचा मनस्वी आनंद आहे.
यंदाही या उत्सवात सक्रियपणे सहभागी झालो. गांधी चौकात मानाच्या श्री राज राजेश्वर पालखीचे लोकमत तर्फे स्वागत केले. सार्वजनिक उत्सव समितीचे राजेश भारती, पप्पू मोरवाल, भाजपा नेते डॉ. अशोक ओलांबे तसेच शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा, राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार तुकाराम बिडकर, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते गोपीकिशनजी बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी महापौर मदन भरगड, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आदींच्या यात भेटी झाल्या.
भक्तीचा गुलाल उधळून घेत 'हर बोला महादेव'च्या निनादात हा सोहळा अनुभवणे विलक्षण समाधानाचे असते.
#LokmatAkola #AkolaKawad #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 10, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230910_2_2&fbclid=IwAR0mEv--PAzOhKcqE94bVQYqB_wDR5ie-Ic7jmWm4e9j917Yafd-Fa8Saeo
https://www.lokmat.com/editorial/communication-with-the-public-but-discord-among-themselves-a-a520-c310/?fbclid=IwAR3z-Uf4JlNsqNRy-Zcga6qGqk9QbXtB3__lJ0UpZqeNPkk8lxdXi1iCA4I
लोकमत सखी मंचचा श्रावण सोहळा...
Sept. 02, 2023
लोकमत सखी मंचचा श्रावण सोहळा...
लोकमत सखी मंच म्हणजे महिला भगिनींचे माहेरच जणू, आणि या माहेरातील आनंद सोहळा म्हणजे श्रावण सोहळा.
अकोला येथील श्रावण सोहळ्यात छान हिरव्या साड्या नेसून, केसात गजरा माळून व नाकात नथ लेवून भगिनींनी मोठ्या संख्येत हजेरी लावली आणि विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आनंद लुटला. झी टीव्हीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मराठी मालिकेतील कलाकार (उमा) खुशबू तावडे व (रघुनाथ) अशोक शिंदे यांच्या विशेष उपस्थितीने यात रंग भरला.
याप्रसंगी कलावंत व एवरेस्ट मसाला, अदानी फॉर्च्यून, मलाबार गोल्ड अँड डायमंडचे स्थानिक अधिकारी तसेच लोकमतचे युनिट हेड आलोक कुमारजी शर्मा यांच्यासमवेत... #KiranAgrawal
#LokmatSakhiManch #LokmatAkola #ShrawanSohla
Saraunsh published in Akola Lokmat on Sept 03, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230903_2_4&fbclid=IwAR0mEv--PAzOhKcqE94bVQYqB_wDR5ie-Ic7jmWm4e9j917Yafd-Fa8Saeo
https://www.lokmat.com/editorial/lets-light-a-lamp-on-the-pillow-of-those-orphans-a-a520-c310/?fbclid=IwAR1CyBTBxLwP1iMEgT6Z0ZjSwWZ5myEt4hUrpLJudEeESMWT3TqEMXH-kSU
आमची दाढी ...
Sept 02, 2023
आमची दाढी ...
आज जागतिक दाढी दिवस. World beard day
त्यानिमित्त आमची ओळख, आमची दाढी ...
Subscribe to:
Posts (Atom)