At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Saturday, January 27, 2024
लोकमत विदर्भ टॅलेंट सर्च एक्झाम ...
लोकमत विदर्भ टॅलेंट सर्च एक्झाम ...
लोकमत कॅम्पस क्लब व फिटजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच विदर्भ टॅलेंट सर्च एक्झाम घेण्यात आली. यात अकोला जिल्ह्यातील अकरा शाळांमधील 4000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
फिटजी नागपूर सेंटरचे सीनियर मॅनेजर निशिकांत ओझा व विविध विभागांचे प्रमुख विनीत चौधरी, मानवींद्र वर्मा तसेच लोकमत मार्केटिंगचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडेय यांच्या उपस्थितीत या परीक्षेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी #KiranAgrawal #LokmatAkola #Feetjee
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
Jan. 26, 2024
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
लोकमत भवन अकोला कार्यालयातील ध्वजारोहण प्राप्ती विभागाचे व्यवस्थापक श्री वासुदेव तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी...
#KiranAgrawal #LokmatAkola
गो-पालन व तृष्णा तृप्तीचे शिल्प..
Jan 22, 2024
गो-पालन व तृष्णा तृप्तीचे शिल्प..
गोरक्षण संस्थानला लागून गोरक्षण रोडवर साकारलेल्या गोमुख शिल्प व कारंजाचे लोकार्पण करण्याचा मान संस्थेचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया यांच्यामुळे लाभला.
प्रख्यात कलाप्रेमी सतीशजी पिंपळे यांच्या कल्पकतेतून सुमारे तीन महिन्यांच्या परिश्रमातून हे शिल्प साकारले असून, गोकुळातील श्रीकृष्णाचे गोपालन व तृष्णा तृप्तीची सेवा याचा सुरेख मेळ यात साधण्यात आला आहे.
1868पासून गोधन सेवेत कार्यरत गोरक्षण संस्थेतर्फे गोमातांचे रक्षण, पालन, पोषण, सेवा, चिकित्सा व उपचार अशा विविध पातळ्यांवर कार्य केले जात असून, दूध व खिचडी वाटपासारखे अन्य सेवा कार्यही अव्याहत सुरू आहे.
गोरक्षण रोडवरून जातांना क्षणभर थांबुन न्याहाळावे, असे हे शिल्प आहे.
Thanks to Shri. Deepakkumarji Bhartiya ...
#kiranAgrawal #GorakshanAkola
कण कण मे है राम...
Jan. 22, 2024
कण कण मे है राम...
राम हे फक्त नाव नाही, तर ती शौर्य, स्नेह, मर्यादा, उत्तमोत्तम, आत्मविश्वासाची अनुभूती, प्रेरणा, ऊर्जा आहे.
आयोध्या नगरीत प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या आजच्या ऐतिहासिक दिनी संपूर्ण भारतभर जणू दिवाळी साजरी होत आहे. अवघा देश राम रंगी रंगला आहे. कणकण मे है राम.. ची प्रचिती यातून येत आहे.
याचनिमित्त अकोल्यातील प्रख्यात व 155 वर्षांची परंपरा असलेल्या पुरातन श्री गोरक्षण संस्थेत प्रभू श्रीराम पूजनाचे सौभाग्य लाभले.
प्रख्यात कथावाचक, आचार्य प. पु. डोंगरे महाराज स्थापित श्री व्यंकटेश्वराची आरती, गोपूजन केले. तुलादानाने गोखाद्य दिले गेले. यानिमित्त या परिसरात वावरताना एका वेगळ्याच अनामिक ऊर्जेची अनुभूती लाभली.
योगायोग असा की, अकोल्यातील प्रख्यात समाजसेवी, दानशूर स्व. चिमनलालजी भरतिया व काळूरामजी रुहाटीया यांच्यासोबत युवावस्थेत काम करण्याची संधी मला लाभली होती. या दानशूरांच्या दातृत्वाच्या खुणा अकोल्यात ठायीठायी दिसतात. त्यांचीच पुढची पिढी गोरक्षण संस्थेची धुरा वाहत असून त्यांनी आज आठवणीने बोलावून हा सन्मान दिला.
गोरक्षणचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया, उपाध्यक्ष श्री महेशकुमारजी खंडेलवाल, सचिव श्री विजयकुमारजी जानी, विश्वस्त श्री श्रीप्रकाशजी रूहाटिया, श्री अंकुशजी भरतिया, सुदीपजी नैवेटिया, व्यवस्थापक मनीष विश्वकर्मा, समाजसेवी पुरुषोत्तम शिंदे, अमोल कडू,प्रवीण राउत,नितिन मोडक, प्रवीण काले, गजेंद्र कानकिरड़, जयेश अग्रवाल, मयूरजी सिंघानिया, गोविंदजी केडिया, सतीशजी पीम्पले, पंडित कैलाशनाथ मिश्रा आदि यावेळी उपस्थित होते.
#KiranAgrawal #GorakshanAkola
Saraunsh published in Akola Lokmat on 21Jan. 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240121_4_2&fbclid=IwAR12tNqBcLYzCka_fS6gKsb8cG9uCkmSf3hoQvHVwYxu3Jmk3aJxabeqgmk
https://www.lokmat.com/editorial/it-is-necessary-to-get-public-participation-in-the-campaign-of-cleanliness-a-a520-c310/?fbclid=IwAR23htdDgBHs-YFOfHC88d1NTIid3IrURDWTaDn7VrmmjIBXO1jX4tXPNhE
Saraunsh published in Akola Lokmat on 14 Jan. 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240114_2_9&fbclid=IwAR0UN8KJ6x6VuPWYd-omHP_HZcob1cR24xiRzmjBUi4226O6fOsqqhQVRpw
Saraunsh Published in Akola lokmat on Jan. 07, 2024
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240107_2_4&fbclid=IwAR3QlKzEAmniftG8T-1SSU829pxWQuALB-RGFKdI6w3USWPVro9x6FxFb-s
https://www.lokmat.com/editorial/it-is-necessary-to-stop-the-growing-fearlessness-and-arrogance-a-a520-c310/?fbclid=IwAR1gGiX6O26H8tNP1ISX-M16ANTHnDZ9_Ya3v2t_1MhhNo6tm3CQuUacPd4
Tuesday, January 2, 2024
Vietnam Tour Diary 4
ढगात झुलायचेय तर 'या' ठिकाणी जायलाच हवे!
बाथरूम एवढे सुंदर, तर बाकी काय विचारायचे?
किरण अग्रवाल /
विमानात बसून आकाशात वा ढगात फिरण्याचा आनंद आपणास घेता येतो, त्याप्रमाणे झोपाळ्यात बसल्यासारखे ढगात झुलायचे असेल तर त्यासाठी व्हिएतनाममधील बाना हिल्सवरच जायला हवे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या येथील केबल कारमध्ये बसून कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा विलक्षण अनुभव काय असतो, हे तो अनुभव घेणाऱ्यासच कळू शकेल.
------------
पर्यटकांना रोप -वे / केबल कारच्या प्रवासाची नवलाई आता राहिलेली नाही. आपल्याकडे भारतातही अनेक ठिकाणी केबल कारने प्रवास करण्याची व्यवस्था झालेली आहे, परंतु व्हिएतनाममधील बाना हिल्स या समुद्र सपाटीपासून 1487 किलोमीटर उंचीवर असलेल्या ठिकाणी केबल कारने जाताना ढगात झुलण्याचा जो अनुभव येतो तो अवर्णनीयच ठरतो. एका केबिनमध्ये सहा ते आठ प्रवासी बसू शकतील अशा सुमारे शंभरेक केबिन्सद्वारे एका तासात जवळजवळ सहा हजार पर्यटकांची वाहतूक येथे केली जाते. तब्बल 16 किलोमीटर लांबीचा हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत पार पडतो. जमिनीवरून निघताना प्रारंभी नद्या नाले, खालील रम्य परिसर न्याहाळता येतो व ढगात झेपावल्यावर आपणच स्वतःला हरवून बसतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या विविध 4 कॅटेगरीत येथील केबल कारची नोंद झाल्याची माहिती आमच्या गाईडने दिली.
-------------
व्हिएतनाममध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांचे शासन होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या उन्हाळी सुटीसाठी 'बाना हिल्स'चा शोध घेऊन आरामाची जागा विकसित केली. सुमारे 1945 पर्यंत फ्रेंच या देशात राहिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येथील भव्य दिव्य इमारतींवर फ्रेंच वास्तूशास्त्र, कलेच्या खुणा प्रामुख्याने आढळतात. 'सन वर्ल्ड'ने डोंगर न पोखरता अतिशय अप्रतिमपणे या हिल्सचा विकास करून हाताच्या पंजातून जाणारा 'गोल्डन ब्रिज' साकारताना 'फ्रेंच व्हिलेज' जतन केले आहे. या गोल्डन ब्रिजवर फोटो काढणे प्रत्येक पर्यटकांसाठी संस्मरणीय ठरत असते, परंतु याठिकाणी कधी कधी पाऊस व वाऱ्याचा वेग इतका असतो की स्वतःला व हातातील कॅमेरा सांभाळणे कसरतीचे ठरते. त्यामुळे या ठिकाणी भेट देऊ इच्छिणाऱ्यांनी रेनकोट घेऊन जाणे विसरू नये. असे एकदा वापरून फेकून देण्यासारखे रेनकोट्स तेथेही विकत उपलब्ध असतात. छत्री असून उपयोगाची नसते, कारण वाऱ्याच्या वेगामुळे ती उघडताच मोडून, उडून गेल्याखेरीज राहात नाही.
--------------
हिल्सवर बहुमजली 'फॅन्टसी पार्क'ही विकसित करण्यात आला असून त्यात सांस्कृतिक शो, 360 सिनेमा, बॅक टू जुरासिक, डिजिटल गेम्स आदी संपूर्ण दिवस कमी पडावा इतक्या गोष्टी पाहण्या व खेळण्यासाठी आहेत. या ठिकाणी पोहोचल्यावर तेथील निसर्ग सानिध्यात पर्यटक हरवून बसतात व पुन्हा खाली, म्हणजे ज्या जमिनीवरून केबल कारने हिल्सवर आपण आलेले असतो तेथून उतरण्याची इच्छाच होत नाही.
-------------
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अक्षरशः हजारो पर्यटक येथे प्रतिदिनी भेट देतात, पण ना केबल कारसाठी वेटिंग करावे लागत; ना कुठे कशासाठी रांगेत उभे राहावे लागत. जागोजागी स्वयंचलित जिने आहेत, त्यामुळे थकायला होत नाही. बरे आपल्याकडे अशा ठिकाणी शिस्त पाळा हे सांगण्यासाठी जागोजागी दंडुके घेऊन सुरक्षारक्षक उभे दिसतात, परंतु तेथे तेही कुठे आढळत नाहीत. सीसीटीव्हीच्या निगराणीत सारे शिस्तीत राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे, बाना हिल्सवरचे सार्वजनिक स्वच्छतागृह भल्या मोठ्या पेंटिंग्स व आकाश कंदीलांनी सजलेली आहेत, त्यामुळे येथील सार्वजनिक स्वच्छतागृह इतके भारी तर बाकी काय विचारायचे? असे कौतुकोद्गार बाहेर पडल्याखेरीज राहत नाहीत.
(कार्यकारी संपादक, लोकमत अकोला)
https://www.lokmat.com/travel/explore-vietnam-bana-hills-golden-bridge-fantasy-park-and-many-more-tourist-spots-a-a520-c573/
Vietnam Tour Diary 3
अजबच! 'येथे' आनंदाला कुलूप लावून लॉक केले जाते..
आपल्याकडे पोराबाळांसाठी नवस करतात, तेथे आनंदी राहण्यासाठी...
किरण अग्रवाल
----------------------
पर्यटन हे अनुभव देऊन जाणारे व बरेच काही शिकवून जाणारे असते हेच खरे, कारण फिरता फिरता काही ठिकाणी काही बाबी अशा आढळून येतात की त्यामुळे आश्चर्य तर होतेच; पण अंतर्मुख व्हायलाही संधी मिळून जाते. व्हिएतनामच्या दौऱ्यात एके ठिकाणी असेच बघायला मिळाले. तेथे परस्परांना आनंद मिळावा व असलेला आनंद टिकून राहावा यासाठी चक्क कुलूप लावून आनंदाला लॉक केले जाते.. आहे की नाही अजब प्रकार !
------------
व्हिएतनाममधील 'दा नांग' शहर हे ड्रॅगन ब्रिज व स्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी प्रख्यात आहे. या शहरातून हान (व्हिएतनामी नाव - सोंग हान) नदी वाहते. भारताच्या गुजरातेतील अहमदाबादच्या साबरमती किनारी जसे रिव्हर फ्रंट डेव्हलप केले आहे, तसे डेव्हलपमेंट हान किनारी करण्यात आले आहे. सकाळी भल्या पहाटे व्यायाम करण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत या नदीकिनारी पर्यटकांची गर्दी असते. या नदीवर एक ड्रॅगनच्या आकारातील पूल दहा वर्षांपूर्वी 2013 मध्ये उभारण्यात आला आहे. 666 मीटर लांबीच्या या सहा पदरी पुलावर दर शुक्रवार, शनिवार व रविवारी रात्री नऊ वाजता आतषबाजी केली जाते. यासाठी पर्यटकांना क्रुझद्वारे नदीतून पुलाजवळ नेले जाते व क्रूजवर उभे राहून या आतिषबाजीचा आनंद घेता येतो.
-------------
'हान'च्या किनारीच एक लहानसा पादचारी पुलही उभारण्यात आला असून रेड हार्ट लाईट्सने त्यावर सजावट करण्यात आली आहे. या पुलावरच लोकांकडून परस्परांच्या आनंदासाठी कुलूपे बांधली जातात असे आमचा गाईड रॅन एन युऑन (Tran Van Vuon)ने सांगितले. आपल्याकडे म्हणजे भारतात काही मंदिरांमध्ये मनोकामना पूर्तीसाठी घंटी अर्पण करण्यात येत असल्याने त्या मंदिराबाहेर हजारो घंट्या बांधलेल्या दिसतात. काही मजारवर धागे बांधले जातात, तसे ही कुलूपाची लॉकिंग ट्रॅडिशन. मुला बाळांसाठी नवस नव्हे, तर एकमेकांना आनंद लाभावा म्हणून ही कुलपे लावली जातात. या पुलावर अशी हजारो कुलपे बांधली गेलेली बघावयास मिळाली. विविध प्रकारच्या कुलपांचे प्रदर्शनच जणू.
-------------
विशेष म्हणजे, आपल्याकडे गाडीच्या बोनेटवर श्री गणेशाची मूर्ती लावलेली असते तसे तेथे प्रत्येक गाडीच्या बोनेटवर, घरातल्या मंदिरात तसेच दुकानाच्या काउंटरवर 'हॅप्पी मॅन' असतात. आहे त्या स्थितीत समाधान व आनंद मानणारी लोकं येथे असल्याने वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्समध्ये 137 देशांच्या यादीत या देशाचा नंबर 65वा आहे. या हॅप्पीनेसची लॉकिंग सिस्टीम 'दा नांग'च्या या पुलावर पहावयास मिळते. भारतीय अध्यात्म व श्रद्धेला समांतर ठरणारी ही भाव व्यवस्था अंतर्मुख व्हायला भाग पाडणारीच म्हणता यावी.
https://www.lokmat.com/travel/vietnam-a-country-where-people-pray-for-each-others-happiness-by-putting-a-lock-on-bridge-a-a520-c573/
Vietnam Tour Diary 2
Dec, 2023
दुचाकीची गर्दी, हिंदी गाणी आणि आदरातिथ्य ... 'या' देशात परकेपण वाटतच नाही!
किरण अग्रवाल /
आग्नेय आशियातील व्हिएतनाम हा देश शीतयुद्धाच्या जखमा बाजूस सारून 'फिनिक्स'प्रमाणे भरारी घेत पर्यटकीय नकाशावर आला आहे. भारताशी सांस्कृतिक व व्यावसायिक साम्य असलेल्या या देशात 90% वाहतूक दुचाकीवर होताना दिसते. पण हे सारे दुचाकीस्वार हेल्मेट घालून शिस्तीत वाहन चालविताना दिसतात. पर्यटक म्हणून आपण दुचाकी राईड घेतली तर चालक आपल्यासाठीही एक्स्ट्रा हेल्मेट घेऊनच येत असल्याचा अनुभव आम्ही घेतला. रात्री रस्ते सुनसान झालेले असले तरी सिग्नल टाळून कोणी गाडी दामटत नाही. विशेष म्हणजे सिग्नलवर पोलीस नसतानाही अशी शिस्त पाळली जाते.
--------------------
खाण्यात सी फूड्स अधिक वापरले जात असलेत तरी, भारतीय फळे व भाजीपालाही मुबलक प्रमाणात मिळतो. तो मीठ - मिरची न वापरता उकळून खाऊ घातला जातो इतकेच, पण उपासमार होत नाही. असे खाणे असल्यामुळेच तेथील लोक अगदी तुकतुकीत दिसतात. पोटाखाली पॅन्ट सरकलेले गुबगुबीत फक्त भारतीय पर्यटक आढळतात. तेथील तुलनेने छोट्या व स्लीक इलेक्ट्रिक बाइक्सवर बसून फिरताना मग अशांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे बघून हसू आवरत नाही. जीवन व आचार पद्धतीत बौद्ध धर्माचे अनुसरण तेथे मोठ्या प्रमाणात आहे. जागोजागी भगवान बुद्धांच्या मोठमोठ्या मूर्ती व पॅगोडाज दिसतात.
----------------------
आपल्याकडे गल्लीत भाजीपाल्याचा ठेला येतो तसे तेथे सकाळी सकाळी हॉटेलच्या बाहेर पडणाऱ्या पर्यटकांसाठी टू व्हीलरवर पर्यटन उपयोगी सामान घेऊन विक्रेते उभे असतात. पर्स, हॅट्स, खेळणी, शोभेच्या वस्तू आदी भरपूर काही असते त्यांच्याजवळ, पण खूप बार्गेनिंग करावी लागते. लाजला किंवा संकोचला तो फसला अशी स्थिती आहे. विशेषतः महिला यात मोठ्या प्रमाणात असतात. दिवसभर कॉलेज किंवा नोकरी करायची आणि सकाळी सकाळी हे फिरते दुकान घेऊन फिरायचे असा त्यांचा दिनक्रम असतो. विशेष म्हणजे या देशाला एवढा निसर्ग लाभला आहे, प्रचंड हिरवाई आहे; तरी काही इमारती वृक्षवेलींनी अच्छादिलेल्या बघावयास मिळतात. आपल्याकडे गच्चीवर परसबाग असते तसे तेथेही दिसते, त्यामुळे आपल्याला व्हिएतनाममध्ये फिरायला गेल्यावर परकेपण म्हणून जाणवतच नाही.
---------------------------
राजधानी हनोईमध्ये आम्ही इंडियन रेस्टॉरंट माशाअल्लाह मध्ये जेवायला गेलो. दिल्लीच्या नोएडातून शेफ म्हणून आलेल्या अली नामक तरुणाने येथे स्वतःच्या रेस्टॉरंटसची शृंखला सुरू केली आहे. या रेस्टॉरंटमध्येच त्याचा मित्र संदीप गायकवाड भेटला. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा येथील हा मराठी तरुण भारतीय दूतावासाच्या सिक्युरिटी विभागात सेवारत आहे. भारतीय पर्यटक आल्यावर त्यांचे अतिशय आपलेपणाने आदरातिथ्य करून गप्पा मारण्यात या तरुणांना होणारा आनंद स्पष्टपणे जाणवत होता. कोरोनापूर्वी या शहरात फक्त चार भारतीय रेस्टॉरंट्स होते, आता भारतीय पर्यटक वाढल्याने त्यांची संख्या 40 वर गेल्याचे संदीपने बोलताना सांगितले. दा नांग मध्येही भरपूर इंडियन हॉटेल्स आहेत. तेथे गेल्यावर अगदी जुन्या जमान्यातील राजेश खन्ना, राजकुमार व मधुबालाच्या चित्रपटातील जुनी गाणी ऐकायला मिळतात. एका हॉटेलमध्ये आम्ही लेडी वेटरला 'ओनियन' आणायला सांगितले, तर तिने स्माईल देत ' यु मीन कांडा' (कांदा) म्हणून विचारले. अशावेळी होणारा आनंद काही वेगळाच असतो.
----------------------
भारत व व्हिएतनामचे संबंध अगदी दुसऱ्या शतकापासूनचे जुने सांगितले जातात. भारत कायम व्हिएतनामचा पाठीराखा राहिला आहे. अगदी अलीकडेच म्हणजे जुलै 2023 मध्ये भारताने आपली आयएनएस कृपाण ही युद्धनौका व्हिएतनाम नेव्हीला दिली. भारताने आपली मिसाईल्सयुक्त युद्धनौका दुसऱ्या देशाला देण्याचा हा इतिहासातील पहिलाच प्रकार असल्याचे पाहता दोन्ही देशातील प्रगाढ द्विपक्षीय संबंध स्पष्ट व्हावेत. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी व्हिएतनामला भेट देऊन 2030 पर्यंतच्या दोन्ही देशांमधील संरक्षण विषयक करारावर स्वाक्षरी केली होती. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही गेल्या वर्षी व्हिएतनामला भेटी देऊन वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या होत्या. अलीकडेच मे 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर संमेलन दरम्यान हिरोशिमा येथे व्हिएतनामच्या पंतप्रधानांसोबत भेट घेतली. तत्पूर्वी 2016 मध्ये मोदी यांनी हनोई येथे भेट देऊन कुआन सु पगोडा येथे भिक्खुंसोबत चर्चा केली होती. यावरून व्हिएतनामसोबतचे आपले राजकीय मित्रत्वाचे संबंधही लक्षात यावेत.
--------------------------
व्हिएतनामी चलन डॉन्ग भारताच्या रुपयापेक्षा खूपच कमजोर असल्याने तेथे गेल्यावर आपल्याला करोडपती होण्याचा आनंद अनुभवता येतो खरा व हजार मूल्याच्याच नोटा तेथे असल्याने सर्व खरेदी त्या तुलनेनेच होते. टॅक्सीचे बिल लाखात होत असले तरी ते भारतीय रुपयात चार-पाचशेच असतात. तेव्हा एकदा व्हिएतनाम जाऊन बघायलाच हवे...
https://www.lokmat.com/travel/two-wheelers-hindi-songs-and-hospitality-indians-dont-feel-like-strangers-in-vietnam-a-a520-c573/
Vietnam Tour Diary 1
Dec, 2023
व्हिएतनाममध्ये फिरायला जाताय?
अवघ्या पाचशे रुपयातच व्हाल मालामाल...
किरण अग्रवाल /
विदेशात जायचे म्हटले की सर्वात पहिले चिंता सतावते ती तेथील भाषेची व खर्चाची. यातही भाषेची अडचण आता निकाली निघाली आहे कारण परस्परांचा संवाद हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करून देणारे ॲप्स आता निघाले आहेत. राहिला प्रश्न खर्चाचा, तर एक देश असाही आहे जेथे तुम्ही आपले अवघे पाचशे रुपये घेऊन जरी गेलात तरी तेथील चलनात तुम्ही मालामाल होतात व लखोपती ठरतात. व्हिएतनाम हे त्या देशाचे नाव.
---------------
अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीला युद्धात झुंजवून हरवणारा देश म्हणून व्हिएतनामकडे पाहिले जाते. सुमारे वीस वर्षे चाललेल्या युद्धात अमेरिकेचे 50 हजाराहून अधिक सैनिक बळी गेले. अखेर अमेरिकेने युद्धातून माघार घेतली व 1975 मध्ये दक्षिण व उत्तर व्हिएतनाम एकत्र झाले. त्यामुळे अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते व व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात.
---------------
भारतीय रुपयाच्या तुलनेत व्हिएतनामी चलन 'डॉन्ग'चे मूल्य खूपच कमजोर आहे. भारतीय एक रुपया म्हणजे व्हिएतनामचे 280 ते 285 डॉन्ग होतात. या हिशेबाने विचार करता अवघे पाचशे रुपये जरी आपण तेथे घेऊन गेलोत तरी एक लाख 40 हजार 400 डॉन्ग आपल्या खिशात येतात. दहा हजाराचे तब्बल 28 लाख होतात. त्यामुळे आम्हीही व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेलो असता तेथील राजधानी हनोईच्या विमानतळावर उतरल्यावर 'मनी एक्सचेंज' करून 50 हजारात थेट करोडपती बनलो. अर्थात हे मूल्य डॉन्ग मध्ये असते, त्यामुळे खर्च करताना साधारणतः भारतीय मूल्याच्या थोड्याफार कमी अधिक फरकानेच हजारो डॉन्ग खर्चावे लागतात. या डॉन्गवर हो चि मिन्ह यांचे छायाचित्र असते. उत्तर व दक्षिण व्हिएतनाम या दोघांना एकत्र आणणारे मिन्ह यांना तेथे मोठा मान आहे. हानोई मधील 'माझोलियम'मध्ये त्यांच्या स्मृती जतन करून ठेवल्या गेल्या आहेत.
----------------
दीर्घकालीन युद्धाचा इतिहास असलेला हा देश त्यासंबंधीच्या जखमा व वेदना विसरून आता वेगाने विकासाकडे आगेकूच करीत आहे. भारतातून सुमारे पन्नासेक हजारात थायलंड, दुबई, मलेशिया, इंडोनेशिया आदि ठिकाणी विदेश वारी करू इच्छिणाऱ्या पर्यटकांना नवीन डेस्टिनेशन म्हणून अलीकडे व्हिएतनाम मोठ्या प्रमाणात खुणावू लागले आहे. सुमारे दहा कोटी लोकसंख्येच्या या देशाला तीन हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने निसर्ग सौंदर्याची जणू लयलूटच या देशात अनुभवयास मिळते.
----------------
पाण्याने वेढलेल्या पर्वतराजींचे व युनेस्को प्रमाणित 'हा लॉंग बे' व क्रूझने त्यातील फेरफटका, राजधानीचे शहर व मध्यवस्तीतून जाणाऱ्या रेल्वेचे आकर्षण असलेले 'ह नोई', सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी व ड्रॅगन ब्रिजवरील आतिषबाजीसाठी प्रख्यात असलेले 'दा नांग', पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ज्याकडे पाहता यावे असे धुक्यात हरविणारे 'बाना हिल्स', भल्या मोठ्या बास्केटच्या आकारातील गोल बोटीत बसून भ्रमंती करायला मिळणारे 'कोकोनट व्हिलेज', सा पा डोंगर, मेकाँग आयलंड, भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून असलेला 'मिसान' डोंगराळ प्रदेश, ओल्ड सिटी म्हणून युनेस्कोतर्फे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित व आकाश कंदीलांनी सजलेल्या बोटीतून प्रवासाचा आनंद देणारे 'होई अन' आदी अनेक ठिकाणे आहेत, जेथे भेटी देता येऊ शकतात. निसर्गाला जपत व त्यासोबत विकासाशी सांगड घालत हा देश प्रसन्नता व बहारदार पर्यटनासाठी वेगाने डेव्हलप होत असल्याने व्हिएतनाममधील ट्रिप संस्मरणीयच ठरते.
(कार्यकारी संपादक, लोकमत अकोला)
https://www.lokmat.com/travel/vietnam-an-emerging-tourist-destination-favourite-among-indians-as-rupee-is-bigger-than-vietnam-dong-a-a520-c573/
Saraunsh published in Akola Lokmat on Dec 31, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231231_4_1&fbclid=IwAR2TRdBFRIkYqfHQVqP2Gj1rnlOaC3yP7VlG7j4dSvdrXS4mxv5B5sl4hF4
https://www.lokmat.com/editorial/resolve-to-awaken-humanity-with-development-is-necessary-a-a520-c310/?fbclid=IwAR2KN3NQvhPNX6Lu02LeAjNXRqePLaLrRJ5r0XZx8hldTyNUUa8CyhYR9m8
चिंब भिजवणारा स्नेह वर्षाव...
27 Dec, 2023
चिंब भिजवणारा स्नेह वर्षाव...
माझ्या वाढदिवसानिमित्त काल आपण साऱ्या मित्रांनी केलेल्या स्नेह सदिच्छांच्या वर्षावात मी अगदी चिंब भिजलो. त्यासाठी धन्यवाद शब्द अतिशय तोकडा आहे.
काहींनी प्रत्यक्ष भेटून, तर काहींनी भ्रमणध्वनी, संदेशांद्वारे शुभेच्छा दिल्यात. फेसबुकची वॉल भरभरून वाहिली. प्रवाह इतका निरंतर व अथांग होता की प्रत्येकाला एकनॉलेज करणेही अवघड बनले. आपण समजून घ्याल अशी खात्री आहे.
मित्रांनो, आपल्या या सदिच्छा हीच माझी ऊर्जा व तेच माझे पाठबळ.
हा स्नेह अक्षय असू द्या हीच अपेक्षा...
Many many Thanks to everyone ...
#KiranAgrawal #FBWishes
साहित्य सेवेचा बहरलेला 'अंकुर'...
23 Dec, 2024
साहित्य सेवेचा बहरलेला 'अंकुर'...
अंकुर साहित्य संघाच्या 61व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याचा योग आला.
गेल्या वर्षी याच अंकुरच्या धुळ्यातील अधिवेशनात समारोपाच्या समारंभास गेलो होतो. तेव्हाचे माझे भाषण लक्षात ठेवून आयोजकांनी यावेळी मुद्दाम पुन्हा बोलाविले.
अकोला वाशिम संयुक्त जिल्हा असताना मालेगावमध्ये स्थापन झालेल्या व आता अकोला मुख्यालय असलेल्या अंकुर साहित्य संघाने अल्पावधीत 61 साहित्य संमेलने आयोजित करून संपूर्ण राज्यात व राज्याबाहेरही हा संघ पोहोचविला ही खरी साहित्य सेवा म्हणायला हवी.
****
61व्या संमेलनाच्या अध्यक्ष, चाळीसगावच्या प्राचार्य डॉ साधनाताई निकम आहेत. त्यांचे माझे माहेरचे नाते. संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात समाजसेवी प्रा. डॉ. संतोष हुशे यांनी केले तर स्वागताध्यक्ष प्रा. ललित काळपांडे आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज दादा गावंडे, चाळीसगावचे डॉ. विनोद कोतकर, अकोल्याचे डा. श्रीकांत काळे, डॉ. प्रमोद काकडे, श्रीमती रेखाताई शेकोकार, शीलाताई गहिलोत आदी मान्यवर व्यासपीठावर समवेत होते.
****
संवेदना व भावभावनायुक्त साहित्यच समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते, त्यातूनच जबाबदारी - कर्तव्याच्या व माणुसकीच्या जाणिवा अंकुरतात; पण हल्ली साहित्यातही स्वमग्नता आकारास येताना दिसत आहे, असे प्रतिपादित करताना आजच्या व्हाट्सअप कल्चर व वाढत्या विद्वेषी वातावरणात समाजाच्या सुदृढ व वैचारिक मशागतीला पूरक ठरणारे साहित्य प्रसविण्याची गरज असल्याची मांडणी केली.
अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष हिम्मत ढाळे, कार्यावाहक तुळशीराम बोबडे तसेच वासुदेवराव खोपडे, सदाशिव शेळके, मनोहर घुगे, प्रा संजय कावरे, प्रा मोहन काळे आदी पदाधिकाऱ्यांच्या धडपडीतून साहित्य सेवेचा 'अंकुर' आज बहरलेला दिसत आहे.
हिम्मत ढाळे व बोबडे जी यांच्या प्रेमळ आग्रहामुळे पुन्हा या साहित्य उत्सवात सहभागी होता आले,
धन्यवाद हिम्मतराव व तुळशीराम जी...
#AnkurSahityaSangh #AnkurAkola #KiranAgrawal
Saraunsh published in Akola Lokmat on Dec. 24, 2023
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20231224_2_7&fbclid=IwAR19Hwyn4n5J96NAYAKPKGRKfobzDyejLHBoYe_Tuys83TxIZD-YOjwH1Ss
https://www.lokmat.com/editorial/fight-for-space-when-will-fight-for-peoples-questions-a-a520-c310/?fbclid=IwAR2TRdBFRIkYqfHQVqP2Gj1rnlOaC3yP7VlG7j4dSvdrXS4mxv5B5sl4hF4
Subscribe to:
Posts (Atom)